Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati News: कापसाच्या दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांना! कवडीमोल विक्री, नंतर दरवाढ; शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान

विदर्भातील पांढरे सोनं म्हणून ओळखले जाणारे नगदी पीक असलेल्या कापसाची काही प्रमाणात दरवाढ झाल्याचे दिसून येते. मात्र, आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे वाती करण्यासाठीही कापसाचे बोंड शिल्लक राहिले नाहीत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 03, 2026 | 03:00 PM
कापसाच्या दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांना! कवडीमोल विक्री, नंतर दरवाढ; शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान

कापसाच्या दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांना! कवडीमोल विक्री, नंतर दरवाढ; शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान

Follow Us
Follow Us:

विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा दरवाढीचा लाभमिळू शकलेला नाही. जीवनावश्यक गरजा आणि खर्च भागवण्यासाठी चांदूर बाजार तालुक्यातील शेतकर्यांसह अनेक शेतकऱ्यांनी कापूस ७१०० ते ७६०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला. दरम्यान, सध्या बाजारात कापसाचे दर ८ ते ८५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले असून या वाढीचा फायदा मात्र व्यापाऱ्यांनाच अधिक होत असल्याची शेतकऱ्यांची खंत आहे.(फोटो सौजन्य – istock)

अमरावतील ६२७ रुग्णांना ५.२८ कोटींची मदत! आरोग्यसेवेला मिळणार गती; मुख्यमंत्री निधीतून गरजूंना दिलासा

विदर्भातील पांढरे सोनं म्हणून ओळखले जाणारे नगदी पीक असलेल्या कापसाची काही प्रमाणात दरवाढ झाल्याचे दिसून येते. मात्र, आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे वाती करण्यासाठीही कापसाचे बोंड शिल्लक राहिले नाहीत. जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठी चांदूर बाजार तालुक्यातील शेतकऱ्यांना कवडीमोल भावात कापसाची विक्री करावी लागली. यामुळे या दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांनाच अधिक होत आहे. ही नित्याची बाब झाली आहे. सध्या कापूसच नाही तर इतरही शेतमालाची दरवाढ म्हणजे वरातीमागून घोडे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

माधान, शिरजगाव कसबा, ब्राह्मणवाडा थडी, घाटलाडकी, करजगाव, शिरजगाव बंड परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागले. कापसाच्या दरात सध्या वाढ झाली असली तरी बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस यापूर्वीच कमी दरात विकल्याने दरवाढीचा त्यांना कोणताही लाभ मिळालेला नाही.

जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी कवडीमोल भावात कापूस विकावा लागला. कापसाला हमीभावाची प्रभावी नियंत्रण आणि शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबविण्याची गरज व्यक्त होत आहे, दरवर्षी अशाच प्रकारे शेतकऱ्यांचे अंमलबजावणी, बाजारातील दर नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.कापूस साठवण्यासाठी अनेक अडचणी; कापूस साठवताना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, लहान घरांमध्ये जागेअभावी खोल्या कापसाने भरून जातात. याशिवाय अधिक काळ कापूस साठवून ठेवल्यास अंगाला खाज सुटते. त्यामुळे राहणीमानावर परिणाम होतो. उंदीर, कीड व आग लागण्याचा धोका असल्याने शेतकऱ्यांना दरवाढीची वाट पाहूनही अखेरीस कमी दरात कापूस विकला. या परिस्थितीमुळे बाजार व्यवस्थेतील पारदर्शकतेचा अभाव आहे.

अवयवदानासाठी अमरावती प्रादेशिक ‘हब’! अवयव प्रत्यारोपणाला मिळणार नवे बळ, ‘हब अँड स्पोक’ मॉडेलमध्ये समावेश

खरीप हंगामात सुरुवातीला पावसाची स्थिती समाधानकारक असल्याने कापूस पिकाची वाढ चांगली झाली होती. मात्र, नंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्पन्नात घट झाली. अनेक शेतांमध्ये केवळ दोन वेचणीत उलंगवाडी झाली. उत्पादन कमी झाल्याने दर वाढतील, या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला होता. मात्र, जानेवारी अखेरही बाजारात अपेक्षित दर मिळाले नाहीत.लग्नसराई, शेती व घरगुती खर्च भागवण्यासाठी शेतकऱ्यांना ७१०० ते ७,६०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस विकावा लागला.मार्च एप्रिल महिन्यात कापसाच्या दरात वाढ होऊन सध्या ८ हजार ते ८,५०० रुपये प्रतिक्विंटल दर आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Traders benefit from the increase in the price of cotton bargain sales then price hikes double loss for farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • amaravati news
  • amravati
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Amravati News: पाण्याची टाकी असूनही कृत्रिम पाणीटंचाई! नदीवर अवलंबून राहण्याची वेळ; निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा
4

Amravati News: पाण्याची टाकी असूनही कृत्रिम पाणीटंचाई! नदीवर अवलंबून राहण्याची वेळ; निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.