Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News : वाहतूक कोंडीने जनजीवन विस्कळीत; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिकांचा संताप

तासगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी आता नागरिकांसाठी गंभीर डोकेदुखी ठरली असून, रोजच्या प्रवासात वेळ, इंधन आणि मानसिक ताण यांचा मोठा फटका बसत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 23, 2026 | 01:00 PM
Sangali News : वाहतूक कोंडीने जनजीवन विस्कळीत; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिकांचा संताप
Follow Us
Close
Follow Us:
  • वाहतूक कोंडीने जनजीवन विस्कळीत
  • प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिकांचा संताप
सांगली :  तासगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी आता नागरिकांसाठी गंभीर डोकेदुखी ठरली असून, रोजच्या प्रवासात वेळ, इंधन आणि मानसिक ताण यांचा मोठा फटका बसत आहे. शहरातून जाणारे विटा-सांगली व तासगाव-कराड हे महत्त्वाचे राज्यमार्ग असल्याने वाहतुकीचा प्रचंड ताण निर्माण होत आहे. मात्र, नियोजनाचा अभाव आणि अतिक्रमणांमुळे ही समस्या दिवसेंदिवस अधिकच बिकट बनत चालली आहे. बसस्थानक परिसर, विटा नाका, चिंचणी नाका, सांगली नाका, भिलवडी नाका, सिद्धेश्वर चौक आणि वंदे मातरम् चौक हे शहरातील प्रमुख गर्दीचे बिंदू ठरत असून, येथे दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. विशेषतः जड वाहनांची वर्दळ वाढली की वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांवर फळ व खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी केलेली अतिक्रमणे, तसेच अनियमित पार्किंग ही कोंडीची प्रमुख कारणे ठरत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांची रुंदी कागदोपत्री असली तरी प्रत्यक्षात तसे दिसून येत नाही.

Sangali News : “…अन्यथा आंदोलन करु”; उद्यानाच्या दुरावस्थेवर सांगलीकरांचा संताप

वडाप चालकांमुळे चौकांतील परिस्थिती आणखी गंभीर
वडाप चालकांनी चौकांमध्ये वाहने आडवी उभी केल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनते, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकामध्ये तीव्र आहे. सोमवार आणि गुरुवारी भरणाऱ्या आठवडा बाजारामुळे परिस्थिती आणखी नियंत्रणाबाहेर जाते. या दिवशी शहरात दर दोन तासांनी वाहतूक कोंडी होणे ही जणू नित्याची बाब बनली आहे. रुग्णवाहिका, शालेय बस आणि आपत्कालीन सेवांनाही या कोडीचा मोठा फटका बसत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

तासगाव शहराबाहेरील रिंगरोडचा प्रश्न पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याने शहरातील वाहतूक कोंडी अधिक तीव झाली आहे. शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. मुरुमीकरण करून काही काळासाठी रस्ता सुरूही करण्यात आला; मात्र त्यानंतर काम पूर्णपणे ठप्प झाले. रिंगरोड पूर्ण झाल्यास शहरातील जड वाहने बाहेरून वळवता येणार असून, कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. त्यामुळे आमदार रोहित पाटील व माजी खासदार संजयकाका पाटील यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन रिंगरोडचे काम पूर्णत्वास नेण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Sangali News : गॅसतुटवडा की काळाबाजार? एलपीजी पंपांवर ऑडिट व्हावंं, आक्रमक रिक्षाचालकांची मागणी

चौकांमध्ये पोलिसांची संख्या वाढवणे गरजेचे
या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन व वाहतुक विभागाने समन्वय साधत तातडीने ठोस उपाययोजना राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.
अतिक्रमण हटाव मोहीम, कडक पार्किंग नियम, चौकांमध्ये कायमस्वरूपी वाहतूक नियोजन आणि पोलिसांची संख्या वाढवणे यांसारख्या उपाययोजना तातडीन राबवण्याची मागणी जोर धरत आहे.
मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे पोलिस प्रशासन यांनी स्वतः पुढाकार घेऊन व्यापक कारवाई केल्यास शहरातील वाहतूक कोंडीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळू शकते अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

 

Web Title: Traffic jam disrupts public life citizens angry over administrations laxity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 12:35 PM

Topics:  

  • navrashtra news
  • Sangali News
  • traffic jam

संबंधित बातम्या

Matheran News : हातरिक्षा चालक यांना ई रिक्षा देण्यात याव्यात अन्यथा….; माथेरानमध्ये श्रमिक रिक्षा संघटनेचं उपोषण
1

Matheran News : हातरिक्षा चालक यांना ई रिक्षा देण्यात याव्यात अन्यथा….; माथेरानमध्ये श्रमिक रिक्षा संघटनेचं उपोषण

Pune News : कुस्तीगीर संघ आणि कुस्तीगीर परिषदेच्या वादामुळे महाराष्ट्र केसरीची प्रतिष्ठा धोक्यात
2

Pune News : कुस्तीगीर संघ आणि कुस्तीगीर परिषदेच्या वादामुळे महाराष्ट्र केसरीची प्रतिष्ठा धोक्यात

Latur News :  लातूरसह पुण्याच्या सिंहगड रोड, धायरी परिसरातून चोरल्या होत्या दुचाकी
3

Latur News : लातूरसह पुण्याच्या सिंहगड रोड, धायरी परिसरातून चोरल्या होत्या दुचाकी

Satara : शशिकांत शिंदे यांची महेश शिंदे यांच्यावर बोचरी टीका
4

Satara : शशिकांत शिंदे यांची महेश शिंदे यांच्यावर बोचरी टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.