
Ahilyanagar News: नगर-मनमाड महामार्गावर वाहतूक कोंडी! सुजय विखे पाटलांकडून आढावा
या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास डॉ. विखे पाटील यांनी राहुरी येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून नगर–मनमाड महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रस्त्यावर थांबून नागरिकांशी संवाद साधत त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली आणि संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या.
Tata Sierra खरेदी करण्याआधी ‘हे’ गुपित तुम्हाला ठाऊक हवंच! चुकीचा निर्णय ठरू शकतो महागात
मागील काही दिवसांपासून वाहतूक कोंडीमुळे राहुरीकरांना सहन करावा लागलेल्या त्रासाबद्दल डॉ. विखे पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली. “जनतेचा विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. केवळ फोटो किंवा व्हिडिओपुरते काम न करता प्रत्यक्ष समस्या सुटल्या पाहिजेत, हीच माझी भूमिका आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी देवळाली प्रवरा येथील नगरसेवक ऋषभ लोढा, अक्षय तनपुरे, मनोज गव्हाणे, महेश गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. विखे पाटील म्हणाले, “फक्त एकदा येऊन फोटो काढून लोकांना न्याय मिळाला नाही, तर लोकांचा विश्वास संपतो, याची मला पूर्ण जाणीव आहे. आज केवळ एका तासाचा अपवाद वगळता कुठेही वाहतूक ठप्प झाली नव्हती.”
Vinfast VF6 आणि VF7 ची झाली क्रॅश टेस्ट ! जाणून घ्या किती सुरक्षित आहेत ‘या’ कार
ते पुढे म्हणाले, “मी सर्वांना विश्वासात घेऊन काम करणारा माणूस आहे. निष्ठावान आणि शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची साथ मला लाभली, हे माझे भाग्य आहे. आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाहीत, तर दिलेल्या आदेशांचे पालन करतात. आज त्यांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्यक्ष मदत केली. जिथे वाहतूक कोंडी निर्माण होईल, तिथे आमचे कार्यकर्ते पुढाकार घेऊन नियोजन करतील.”