फोटो सौजन्य: Pinterest
मजबूत डिझाइन आणि प्रीमियम फीलसह, टाटा सिएराला बाजारात जोरदार प्रतिसाद मिळतोय. परंतु टाटाकडे या एसयूव्हीसाठी एक खास प्लॅन देखील आहे, जी जाणून घेतल्यास तुमच्यासाठी एक फायदेशीर डील ठरू शकते.
टाटा सिएरा 3 वर्षांची किंवा 1,00,000 किलोमीटरची स्टॅंडर्ड वॉरंटी देते, जी या सेगमेंटमध्ये चांगली मानली जाते. ग्राहक एक्स्टेंडेड वॉरंटी निवडून हे याची मुदत आणखी वाढवू शकतात. टाटा मोटर्सच्या एक्स्टेंडेड वॉरंटीची सुरुवातीची किंमत सुमारे 20000 रुपये आहे. मात्र ही किंमत इंजिन आणि गिअरबॉक्सनुसार बदलू देखील शकते.
टाटा मोटर्सने एक्स्टेंडेड वॉरंटी मिळविण्यासाठी स्पष्ट नियम निश्चित केले आहेत. जर तुम्ही खरेदीच्या 90 दिवसांच्या आत एक्स्टेंडेड वॉरंटी घेतली तर तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. मात्र, जर तुम्ही 90 ते 180 दिवसांच्या दरम्यान वॉरंटी घेतली तर तुम्हाला 10% सरचार्ज द्यावा लागेल. जर तुम्ही 180 दिवसांनंतर एक्स्टेंडेड वॉरंटी घेतली तर तुम्हाला 20% पर्यंत जास्त पैसे द्यावे लागतील. याचा अर्थ असा की तुम्ही जितक्या लवकर निर्णय घ्याल तितके जास्त फायदे मिळतील.
Fortuner पेक्षाही महाग! भारतात Ducati ची नवीन बाईक लाँच, फक्त 1 हजार युनिट्सची होणार विक्री
Tata Sierra साठी दोन प्रकारचे एक्सटेंडेड वॉरंटी प्लॅन उपलब्ध आहेत. 1 वर्ष किंवा 1,00,000 किमीचा प्लॅन NA पेट्रोल MT व्हेरिएंटसाठी सुमारे 20,220 रुपये पासून सुरू होतो, तर डिझेल AT साठी त्याची किंमत अंदाजे 24,400 रुपये इतकी आहे. त्याचप्रमाणे 2 वर्षे किंवा 1,25,000 किमीचा प्लॅन तुलनेने महाग असून, त्याची किंमत 25,000 रुपये ते 34,000 रुपयांहून अधिक इतकी जाते. दीर्घकाळ Sierra वापरण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लॅन अधिक फायदेशीर ठरू शकतो.
आजच्या घडीला गाड्या अधिक विश्वासार्ह झाल्या असल्या, तरी एक्सटेंडेड वॉरंटी घेतल्यास दुरुस्ती खर्चाची चिंता मोठ्या प्रमाणात कमी होते. विशेषतः Tata Sierra सारख्या नव्या SUV सोबत ही वॉरंटी घेतल्यास ओनरशिप अनुभव अधिक सुरक्षित आणि तणावमुक्त होतो.






