Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra News: ‘महाराष्ट्र निवडणुकीत मतचोरी कशी झाली?’ या माहितीपटाची लिंक पाठवण्यास TRAI चा नकार; काँग्रेस आक्रमक

काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, संबंधित माहितीपट महाराष्ट्र विधानसभा निवडणुका कशा “चोरल्या गेल्या” यावर आधारित असून, तो पक्ष कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 07, 2025 | 01:35 PM
Maharashtra News: ‘महाराष्ट्र निवडणुकीत मतचोरी कशी झाली?’ या माहितीपटाची लिंक पाठवण्यास TRAI चा नकार; काँग्रेस आक्रमक
Follow Us
Close
Follow Us:
  • महाराष्ट्रात निवडणुकांमध्ये मतचोरी- काँग्रेसचा दावा
  • मतचोरीच्या माहितीपटाची लिंक पाठवण्यास ट्रायचा विरोध
  • काँग्रेसचे गंभीर आरोप

गेल्या वर्षी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या.  या निवडणुकांमध्ये मतचोरी कशी झाली. निवडणूक आयोगाने मतचोरी कशी केली, यावर काँग्रेसकडून एक माहितीपट बनवण्यात आला आहे. पण महाराष्ट्रातील पक्ष कार्यकर्त्यांना माहितीपटाची लिंक असलेले एसएमएस पाठविण्याचा काँग्रेसचा अर्ज भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) फेटाळला आहे. “निषेधांशी संबंधित साहित्य” या कारणावरून हा अर्ज नाकारण्यात आल्याचे सांगण्यात  आले आहे.

काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, संबंधित माहितीपट महाराष्ट्र विधानसभा निवडणुका कशा “चोरल्या गेल्या” यावर आधारित असून, तो पक्ष कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, ट्रायच्या नकारामुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे.

Nashik Crime : सावकारांच्या त्रासाला कंटाळून कंत्राटी कामगाराची आत्महत्या, काही रक्कम परत करूनही

काँग्रेसच्या डेटा अॅनालिटिक्स विभागाचे अध्यक्ष प्रवीण चक्रवर्ती यांनी सांगितले की, पक्षाने “हाऊ द महाराष्ट्र 2024 इलेक्शन वॉज स्टोल” या युट्यूब माहितीपटाची लिंक एसएमएसद्वारे कार्यकर्त्यांना पाठविण्याची योजना आखली होती. त्यासाठी ट्रायकडे मंजुरीसाठी अर्ज दाखल करण्यात आला होता; मात्र तो नाकारण्यात आला.

चक्रवर्ती यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत विचारले की, “माहिती दडपण्यासाठी गृह मंत्रालय, निवडणूक आयोग आणि दूरसंचार नियामक यांच्यात इतका परिपूर्ण समन्वय कसा असू शकतो?” तसेच त्यांनी अधिकाऱ्यांनी पाठवलेला संदेशाचा स्क्रीनशॉट शेअर करून सरकारवर माहिती लपवण्याचा आरोप केला.

Bihar Election 2025: बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार; पुण्याच्या संस्थेचे ग्राऊंड रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे?

या संदर्भात काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील व्हीप माणिकम टागोर यांनीही ‘एक्स’वर प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर टीका केली. “गृह मंत्रालय देखरेख करत आहे, दूरसंचार मंत्रालय संप्रेषण रोखत आहे आणि निवडणूक आयोग मूक प्रेक्षक आहे. हे सर्व महाराष्ट्र 2024 निवडणूक घोटाळा लपवण्यासाठी चालले आहे,” असे ते म्हणाले.

टागोर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांना थेट लक्ष्य करत विचारले की, “जर महाराष्ट्र निवडणुका चोरीला गेल्या नसतील, तर तुम्ही YouTube लिंकला का घाबरत आहात?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या या आरोपांवर TRAI कडून त्वरित कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

 

Web Title: Trai refuses to send link to documentary how was vote rigging in maharashtra elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 01:35 PM

Topics:  

  • Congress
  • election commission of india
  • Maharashtra assemble session 2024

संबंधित बातम्या

Bihar Election 2025: बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार; पुण्याच्या संस्थेचे ग्राऊंड रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे?
1

Bihar Election 2025: बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार; पुण्याच्या संस्थेचे ग्राऊंड रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे?

Maratha Reservation: “… आरक्षण शक्य नाही”; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचे खळबळजनक विधान
2

Maratha Reservation: “… आरक्षण शक्य नाही”; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचे खळबळजनक विधान

अजित पवारांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवरुन काँग्रेसची टीका; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
3

अजित पवारांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवरुन काँग्रेसची टीका; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

EC On Bihar Election: मोठी बातमी! ‘या’ दिवशी लागणार बिहार निवडणुकीचा निकाल? कोणाच्या हातात जाणार सत्ता? वाचाच…
4

EC On Bihar Election: मोठी बातमी! ‘या’ दिवशी लागणार बिहार निवडणुकीचा निकाल? कोणाच्या हातात जाणार सत्ता? वाचाच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.