Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav 2025: गणपतीसाठी कोकणात एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार, परिवहनमंत्र्यांची घोषणा

ST buses will run in Konkan for Ganapati : गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान 5000 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 15, 2025 | 01:57 PM
गणपतीसाठी कोकणात एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार (फोटो सौजन्य-X)

गणपतीसाठी कोकणात एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : २७ ऑगस्ट २०२५ रोजी  गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान ५००० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते  गणपती उत्सवाच्या जादा वाहतूकीच्या अनुषंगाने मंत्रालयातील आपल्या दालनात बोलावलेल्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर व एसटीचे सर्व खाते प्रमुख उपस्थिती होते.

 महापालिकेचा १९ कोटींचा ‘कचरा’ निर्णय? ३८८९ कचराकुंड्यांसाठी ८ पट दराने खरेदीचा प्रस्ताव, नागरिकांमध्ये संताप

मंत्री सरनाईक म्हणाले की, गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा , कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी नफ्या -तोट्याचा विचार न करता एसटी धावत असते. यंदा सुमार ५००० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील. सदर बसेस आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असून, सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारे, उपलब्ध होणार आहे.

नुकत्याच संपन्न झालेल्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी देखील एसटी महामंडळाने ५२०० जादा बसेस सोडल्या होत्या. त्याला भाविक – प्रवाश्यांचा अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे गणपती उत्सवासाठी देखील एसटीने तब्बल ५००० जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे निश्चित केले आहे.

२२ जुलै पासून गट आरक्षणाला सुरुवात महिला व ज्येष्ठांना सवलत

जादा बसेस मध्ये व्यक्तिगत आरक्षणा बरोबरच गट आरक्षणासाठी अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जाणार आहे.  गट आरक्षण २२ जुलै पासून सुरू होत आहे.

२३ ऑगस्ट पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गतवर्षी ४३०० बसेस सोडण्यात आल्या होत्या.

गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत.

नव्या समाविष्ट गावांतील मिळकत करासंदर्भात राज्यमंत्री मिसाळ यांचं महत्त्वाचं विधान; म्हणाल्या, ‘नवीन चार्ट तयार…’

Web Title: Transport minister pratap sarnaik announced that an additional 5000 st buses will run in konkan for ganapati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2025 | 01:57 PM

Topics:  

  • kokan railway
  • pratap sarnaik
  • ST buses

संबंधित बातम्या

Thane Election:  शिंदे यांचे जवळचे सहकारी 7 वर्षात मालामाल! ठाण्यातील ‘या’ उमेदवारांची एकूण आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!
1

Thane Election: शिंदे यांचे जवळचे सहकारी 7 वर्षात मालामाल! ठाण्यातील ‘या’ उमेदवारांची एकूण आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!

Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप
2

Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Mira Bhayandar News: मीरा भाईंदरमध्ये स्वतंत्र विद्यापीठ, मोफत वायफाय, पॉड टॅक्सी आणि अनधिकृत इमारतींचाही पुनर्विकास
3

Mira Bhayandar News: मीरा भाईंदरमध्ये स्वतंत्र विद्यापीठ, मोफत वायफाय, पॉड टॅक्सी आणि अनधिकृत इमारतींचाही पुनर्विकास

भाजप–शिवसेना शिंदे गटातील संघर्ष तीव्र, “कलंकित आमदार…” प्रताप सरनाईकांचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप
4

भाजप–शिवसेना शिंदे गटातील संघर्ष तीव्र, “कलंकित आमदार…” प्रताप सरनाईकांचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.