Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPI Payment: एसटी प्रवाशांनी ‘UPI’द्वारे तिकिटाचे पैसे द्यावेत; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

महामंडळाने परिपत्रक काढून वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी अग्रधन रकमेमध्ये १०० रुपयापर्यंत सुट्टे पैसे देण्याची निर्देश स्थानीक प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे सुट्ट्या पैशावरुन होणारे वाद टाळले जाऊ शकतात.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 31, 2025 | 10:13 PM
UPI Payment: एसटी प्रवाशांनी 'UPI'द्वारे तिकिटाचे पैसे द्यावेत; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

UPI Payment: एसटी प्रवाशांनी 'UPI'द्वारे तिकिटाचे पैसे द्यावेत; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: प्रवाशांच्या तक्रारी व वाहकांना होणारा त्रास यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेऊन सुट्ट्या पैशावरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होऊ नये, यासाठी एसटीने प्रवाशांनी यूपीआय पेमेंटद्वारे तिकिटाचे पैसे देण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून मागील काही दिवसांपासून युपीआय पेमेंट द्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे.

याबरोबरच महामंडळाने परिपत्रक काढून वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी अग्रधन रकमेमध्ये १०० रुपयापर्यंत सुट्टे पैसे देण्याची निर्देश स्थानीक प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे वाहक आणि प्रवासी यांच्यातील सुट्ट्या पैशावरुन होणारे वाद टाळले जाऊ शकतात. एस. टी. महामंडळाने प्रत्येक वाहकाकडे अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट इशू मशीन (ETIM) दिले आहेत. या मशीनच्या माध्यमातून यूपीआय पेमेंट द्वारे तिकीट काढले जाऊ शकते. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढताना या यूपीआय पेमेंटचा वापर केल्यास सुट्ट्या पैशामुळे होणारे वाद टाळता येतील, अशी सूचना मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली होती. त्यानुसार महामंळाने युपीआय पेमेंट वाढविण्यासाठी प्रयत्न केला.

गेल्या काही दिवसांमध्ये युपीआय पेमेंट द्वारे तिकीट काढणाऱ्यां प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून मागील काही दिवसांच्या तुलनेमध्ये युपीआय पेमेंट द्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे. तसेच एका परिपत्रकाद्वारे सूचना देऊन वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आग्रधन म्हणून सुट्टे पैसे देण्यात यावेत, अशा सूचना महामंडळाने स्थानिक प्रशासना दिल्या आहेत. भविष्यात वाहक आणि प्रवासी यांच्यामध्ये सुट्ट्या पैशावरून वाद उद्भभवणार नाहीत, याची काळजी महामंडळाने घ्यावी, अशी सूचना देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

एसटी भाडेवाढ विरोधात शिवसेना ठाकरे आक्रमक

एसटी महामंडळाच्या बसच्या तिकीट दरात १४.९५ टक्क्यांनी नुकतीच वाढ करण्यात आली. राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य, अतिरिक्त पोलीस वाहतूक महासंचालक आणि परिवहन आयुक्त यांच्यासह प्राधिकरणाच्या अध्यक्षतेखालील समितीने भाडेवाढीला मंजूरी दिली. मात्र या भाडेवाढीनंतर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. अशातच आता एसटी दरवाढीमुळे प्रवाशांसोबत विरोधक संतप्त झाले आहे. एसटीच्या भाडेवाढीविरोधात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: MSRTC Bus Fare Increase : एसटी भाडेवाढ विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे पेणमध्ये निदर्शने

एसटीची १५ टक्के भाडेवाढ

ग्रामीण भागातील जीवनवाहिणी असलेल्या एसटीच्या तिकीट दरात १४.९५ टक्के वाढ झाली. राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य, अतिरिक्त पोलीस वाहतूक महासंचालक आणि परिवहन आयुक्त यांच्यासह प्राधिकरणाच्या अध्यक्षतेखालील समितीने भाडेवाढीला मंजूरी दिली. पण या भाडेवाढीमुळे कोकणातून पुणे आणि बोरिवली प्रवासाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पुण्याचे प्रवासी तिकिटासाठी आधी ५४० रुपयांवरून ६२४ रुपये झालं आहे. तर रत्नागिरी बोरिवलीच्या तिकिटासाठी ५५० रुपये मोजावे लागत होते. ते आता ६३४ रुपये मोजावे लागणार आहेत.

Web Title: Transport minister pratap sarnaik appeal passengers to pay for tickets through upi payment digital india marathi msrtc news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2025 | 10:12 PM

Topics:  

  • msrtc
  • Pratap Saranaik
  • UPI payment

संबंधित बातम्या

डिजिटल पेमेंटमध्ये भारताचा डंका, दररोज UPI द्वारे होत आहे ९०,००० कोटींचा व्यवहार
1

डिजिटल पेमेंटमध्ये भारताचा डंका, दररोज UPI द्वारे होत आहे ९०,००० कोटींचा व्यवहार

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…
2

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

आता UPI ने ‘हे’ व्यवहार होणार नाहीत, NPCI ने उचलले मोठे पाऊल! जाणून घ्या नवीन नियम
3

आता UPI ने ‘हे’ व्यवहार होणार नाहीत, NPCI ने उचलले मोठे पाऊल! जाणून घ्या नवीन नियम

Pratap Sarnaik: १३६ उमेदवारांना एसटी महामंडळात नियुक्ती, प्रताप सरनाईक यांच्या सूचना
4

Pratap Sarnaik: १३६ उमेदवारांना एसटी महामंडळात नियुक्ती, प्रताप सरनाईक यांच्या सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.