Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC Fare Hike: ‘एसटी तोट्यात असली तरी…’, १५ टक्के भाडेवाढीसंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय

MSRTC Fare Hike: महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट असताना सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर केला आहे. एसटी महामंडळ आर्थिक तोट्यात असले तरी संकटाच्या काळात प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार टाकणार नाही....

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 15, 2026 | 12:02 PM
'एसटी तोट्यात असली तरी...', १५ टक्के भाडेवाढीसंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय

'एसटी तोट्यात असली तरी...', १५ टक्के भाडेवाढीसंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळाच्या संकटात जनतेला भाडेवाढीचा चटका कशाला?
  • १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर!
  • संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी उभे राहणे हेच आमचे कर्तव्य!’
मुंबई : दुष्काळाच्या झळांनी होरपळणारा शेतकरी, महागाईमुळे आर्थिक ओढाताण सहन करणारा सर्वसामान्य नागरिक आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना होणारी दमछाक, अशा परिस्थितीत जनतेवर भाडेवाढीचा अतिरिक्त भार कशासाठी, असा सवाल उपस्थित करत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिवाळीच्या गर्दीच्या हंगामासाठी प्रस्तावित केलेली १५ टक्के हंगामी भाडेवाढ नामंजूर केली.(MSRTC Fare Hike)

दरवर्षी दिवाळीच्या गर्दीच्या काळात एसटीच्या प्रवासी भाड्यात हंगामी वाढ केली जाते. यंदाही १ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रवासी भाड्यात सरसकट १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव एसटी प्रशासनाने मंत्री सरनाईक यांच्याकडे सादर केला होता. मात्र, आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जनतेवर आणखी भार टाकणे योग्य नसल्याची भूमिका घेत त्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला.
‘आधीच संकटांनी घेरलेल्या जनतेला भाडेवाढीचा चटका देऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळणे मला मान्य नाही,’ असे स्पष्ट करत त्यांनी जनहिताला प्राधान्य दिले.

Yavatmal News: जन्म-मृत्यूची नोंदणी सीआरएसवर अनिवार्य! २१ दिवसांच्या आत नोंदणी करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

भाडेवाढीचा थेट परिणाम दैनंदिन खर्चावर

एसटी महामंडळाला आर्थिक तोटा सहन करावा लागत असला, तरी त्याची भरपाई सर्वसामान्य प्रवाशांकडून करणे योग्य ठरणार नाही. एसटीची ‘लालपरी’ ही ग्रामीण महाराष्ट्रातील लाखो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि कष्टकरी वर्गासाठी ती परवडणाऱ्या प्रवासाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे भाडेवाढीचा थेट परिणाम त्यांच्या दैनंदिन खर्चावर झाला असता. विशेषतः दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना हा अतिरिक्त भार सहन करणे कठीण झाले असते.

‘हे शासन संवेदनशील आहे. संकटाच्या काळात शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही,’ असा विश्वास व्यक्त करत मंत्री सरनाईक म्हणाले की, जनतेच्या अडचणी समजून घेऊन तिला दिलासा देणे ही शासनाची जबाबदारी आहे. आर्थिक गणिते महत्त्वाची असली, तरी जनतेच्या वेदना आणि तिचा जगण्याचा संघर्ष यांचाही विचार होणे आवश्यक आहे.

दुर्गम गावांपासून शहरांपर्यंत सुरक्षित

एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी पर्यायी उपाययोजना शोधल्या पाहिजेत. दुर्गम गावांपासून शहरांपर्यंत सुरक्षित, विश्वासार्ह आणि परवडणारी प्रवासी सेवा उपलब्ध करून देणे हे महामंडळाचे मूलभूत कर्तव्य आहे. त्यामुळे आर्थिक तोट्याचे ओझे थेट प्रवाशांवर टाकण्याऐवजी त्यावर अन्य मार्गांनी तोडगा काढण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘जनतेच्या संकटाच्या काळात तिच्या खिशाला हात घालण्यापेक्षा तिच्या डोळ्यांतील अश्रू पुसणे अधिक महत्त्वाचे आहे. एसटीच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधू; मात्र अडचणीत असलेल्या जनतेला दिलासा देण्याचे कर्तव्य विसरणार नाही,’ या भूमिकेतून मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रस्तावित भाडेवाढीला नकार देत सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला.

४५ मिनिटांचा प्रवास आता २० मिनिटांत! जेव्हीपीडी उड्डाणपुलाचे काम वेगात, २०२७ मध्ये वाहतुकीसाठी खुला होणार

💡

Frequently Asked Questions

  • Que: एसटी महामंडळाची १५ टक्के हंगामी भाडेवाढ का नामंजूर करण्यात आली?

    Ans: महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर केला.

  • Que: एसटी महामंडळ तोट्यात असूनही भाडेवाढ न करण्याचा निर्णय का घेतला?

    Ans: एसटी महामंडळ आर्थिक तोट्यात असले तरी संकटाच्या काळात जनतेच्या खिशावर अतिरिक्त भार टाकणे योग्य नाही. सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे राहणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

  • Que: एसटीची १५ टक्के हंगामी भाडेवाढ नामंजूर झाल्यामुळे प्रवाशांना काय फायदा होणार?

    Ans: या निर्णयामुळे प्रस्तावित १५ टक्के हंगामी भाडेवाढ प्रवाशांना सहन करावी लागणार नाही. त्यामुळे दुष्काळाच्या संकटात एसटीने प्रवास करणारे विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

Web Title: Msrtc 15 percent seasonal bus fare hike proposal rejected sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: महामार्गांवर धावणार ‘हवाई रुग्णवाहिका’! अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार उपचार; सरनाईकांची मोठी घोषणा
1

Pratap Sarnaik: महामार्गांवर धावणार ‘हवाई रुग्णवाहिका’! अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार उपचार; सरनाईकांची मोठी घोषणा

एसटी कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेचा प्रश्न ऐरणीवर! ‘परिपत्रकांचा अर्थ समजत नसेल तर पगार कशाचा घेता?’ श्रीरंग बरगेंचा संतप्त सवाल
2

एसटी कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेचा प्रश्न ऐरणीवर! ‘परिपत्रकांचा अर्थ समजत नसेल तर पगार कशाचा घेता?’ श्रीरंग बरगेंचा संतप्त सवाल

Pratap Sarnaik: एलॉन मस्क यांच्या वक्तव्यावर प्रताप सरनाईक आक्रमक! टेस्लाला दिलेल्या सवलतींचा फेरआढावा घेण्याचे संकेत
3

Pratap Sarnaik: एलॉन मस्क यांच्या वक्तव्यावर प्रताप सरनाईक आक्रमक! टेस्लाला दिलेल्या सवलतींचा फेरआढावा घेण्याचे संकेत

Pratap Sarnaik : ॲक्शन मोडमध्ये प्रताप सरनाईक! MMRDA च्या ५५४ सुरक्षा रक्षकांना थकीत पगारासह दिवाळी बोनस मिळणार
4

Pratap Sarnaik : ॲक्शन मोडमध्ये प्रताप सरनाईक! MMRDA च्या ५५४ सुरक्षा रक्षकांना थकीत पगारासह दिवाळी बोनस मिळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.