Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : नाल्यामुळे आदिवासी वस्तीला धोका; परिवहन मंत्र्यांनी दिले तत्काळ उपाययोजनांचे निर्देश

पावसाळा तोंडावर आला तरी नालेसफाई अद्याप पूर्ण झालेली नाही. याचपार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 02, 2025 | 04:05 PM
Thane News : नाल्यामुळे आदिवासी वस्तीला धोका; परिवहन मंत्र्यांनी दिले तत्काळ उपाययोजनांचे निर्देश
Follow Us
Close
Follow Us:

भाईंदर/ विजय काते : पावसाळा तोंडावर आला तरी नालेसफाई अद्याप पूर्ण झालेली नाही. याचपार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे. काशिमिरामधील साई पॅलेस हॉटेलच्या मागच्या बाजूने वाहणाऱ्या मोठ्या नाल्यामुळे परिसरातील आदिवासी वस्तीला दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. या नाल्याची दुरवस्था आणि पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरस्थितीच्या तक्रारी वारंवार दिल्या जात असतानाही महानगरपालिकेकडून कोणतीच ठोस कारवाई न झाल्याने आज मीरा-भाईंदरचे आमदार आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी दौरा केला आहे.

Thane News: आरोग्यम् धनसंपदा; तंबाखू विरोधी दिनानिमित्त शहरातील जनजागृती मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

परिसरातील नाला डोंगरातून वाहत येत आदिवासी पाड्याच्या शेजारून जात असल्याने जून-जुलैमध्ये पावसाचे प्रमाण वाढले की, मोठ्या प्रमाणात पाणी घरात शिरते. त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होते. अनेक वेळा तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष झाल्याने स्थानिक संतप्त होते.उल्लेखित नाला पश्चिम दिशेला महामार्गालगत स्थित आहे. सद्यस्थितीत या नाल्याच्या किनारी कोणतीही संरक्षण भिंत (प्रोटेक्शन वॉल) बांधलेली नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत हा नाला पाण्याने पूर्णतः भरून वाहतो. या ओसंडून वाहणाऱ्या पाण्यामुळे महामार्गावरील वाहतुकीस गंभीर धोका निर्माण होतो. विशेषतः भर पावसात नाल्यातील पाणी महामार्गावर येते, ज्यामुळे गाड्यांचे नियंत्रण सुटण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे अपघात होऊ शकतो.

ठाणे महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना दिलासा ! प्रशासनाकडून घेण्यात आला ‘हा’ महत्वाचा निर्णय

आजच्या पाहणी दौऱ्यात महानगरपालिकेचे आयुक्त, वरिष्ठ अधिकारी व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रताप सरनाईक यांनी नाल्याची पाहणी करून तात्काळ रुंदीकरणाचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “या नाल्यामुळे आदिवासी वस्तीला कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून तातडीने काम हाती घेण्यात यावे.”अशा सूचना देण्यात आल्या .तसे पश्चिम तिथे महामार्गाच्या बाजूला असलेला हा नाला त्याच्या बाजूला संरक्षण भिंत नसल्याने पावसामध्ये हा नाला पाण्याने तुटुंब भरून वाहत असतो. त्यामुळे बाजूला महामार्गावर असणाऱ्या गाड्यांना अपघात होऊ शकतो, अशी भिती व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: Tribal settlement threatened by drain in kashmir pratap sarnaik directs immediate measures 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 03:20 PM

Topics:  

  • Bhayander
  • Rain Update
  • thane

संबंधित बातम्या

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
1

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

उजनी धरणातून भीमा नदीत 76 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
2

उजनी धरणातून भीमा नदीत 76 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कुंभी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार अतिवृष्टी; अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी
3

कुंभी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार अतिवृष्टी; अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन
4

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.