Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tukaram Mundhe: ६ दिवसांत २०३ छापे, १०२ अटक; तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांवर सर्जिकल स्ट्राईक, ६८ दुकाने-हॉटेल्स सील!

एफडीआय (FDA) चे नवीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ६ दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात २०३ ठिकाणी छापे टाकून १.५८ कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे सोलापूर व इंदापूरमधील दूध भेसळ करणाऱ्या माफियांमध्ये घबराट पसरली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 04, 2026 | 07:46 PM
तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांवर सर्जिकल स्ट्राईक (Photo Credit- X)

तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांवर सर्जिकल स्ट्राईक (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • ६ दिवसांत २०३ छापे, १०२ अटक
  • तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांवर सर्जिकल स्ट्राईक
  • ६८ दुकाने-हॉटेल्स सील!
शिवाजी हळणवर/पंढरपूर: राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासोबत खेळणाऱ्या आणि केवळ पैशांच्या लालसेपोटी भेसळयुक्त अन्नाची विक्री करणाऱ्या माफियांवर आता मोठी संक्रांत आली आहे. कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर कृती आणि भ्रष्टाचार अजिबात खपवून न घेणारे राज्याचे अत्यंत डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी नुकताच अन्न व औषध प्रशासन (FDA) या महत्त्वाच्या विभागाचा पदभार स्वीकारला आहे. आपल्या शिस्तबद्ध आणि धडाकेबाज कार्यशैलीसाठी कायम ओळखल्या जाणाऱ्या या वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रशासनाची सूत्रे हाती घेताच संपूर्ण महाराष्ट्र राज्यात भेसळखोरांविरुद्ध थेट युद्धच पुकारले आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या समाजकंटक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी त्यांनी अत्यंत कडक आणि व्यापक अशी राज्यव्यापी मोहीम हाती घेतली असून, अवघ्या काही दिवसांतच या कारवाईचे अत्यंत मोठे आणि सकारात्मक परिणाम राज्यभर दिसून येऊ लागले आहेत.

​रोजच्या अन्नातून नागरिकांच्या आरोग्याला घातक असणारे आणि शासनाने कायदेशीररीत्या पूर्णपणे प्रतिबंधित केलेले पदार्थ विकणाऱ्यांवर कायमस्वरूपी वचक निर्माण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन या विभागाने ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ या एका विशेष मोहिमेची सुरुवात केली. २५ मे ते ३१ मे या कालावधीत अतिशय गुप्तपणे आणि अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण राज्यभरात ही मोठी धडक कारवाई राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विशेष पथकांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात छापे मारून अन्नभेसळ करणाऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. प्रशासनाच्या या अचानक आणि आक्रमक भूमिकेमुळे काळाबाजार करणारे, नियम मोडणारे आणि निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ ग्राहकांच्या माथी मारणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये सध्या प्रचंड घबराट पसरली आहे.

​गेल्या सहा दिवसांत राबवण्यात आलेल्या या व्यापक मोहिमेची अधिकृत आकडेवारी अतिशय थक्क करणारी आणि कारवाईची व्याप्ती दर्शवणारी आहे. या अत्यंत कमी कालावधीत अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणी पथकांनी संपूर्ण राज्यात तब्बल २०३ विविध ठिकाणी एकाच वेळी आणि अचानक छापे टाकले. या धाडी सत्रादरम्यान अधिकाऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी अतिशय सूक्ष्म आणि सविस्तर तपासणी केली. या ऐतिहासिक कारवाईत आरोग्याला अत्यंत अपायकारक असणारा आणि बेकायदेशीररीत्या लपवून साठवून ठेवण्यात आलेला तब्बल १ कोटी ५८ लाख २८ हजार रुपयांचा प्रतिबंधित तसेच भेसळयुक्त मालाचा साठा प्रशासनाने जप्त केला आहे. नागरिकांच्या ताटात थेट विष वाढणाऱ्या या प्रवृत्तींवर केवळ माल जप्त करून कारवाई थांबलेली नाही. तर, या गंभीर स्वरूपाच्या आणि बेकायदेशीर व्यवसायात प्रत्यक्ष गुंतलेल्या तब्बल १०२ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात प्रशासकीय यंत्रणेला मोठे यश आले आहे. या सर्व आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

‘मुंढे साखर आयुक्त झाल्यास कारखानदार सरळ होतील’, तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ पंढरपुरात दूध अभिषेक; शेतकऱ्यांचा मोठा दावा

​या संपूर्ण मोहिमेत केवळ छापे टाकणे आणि अटक सत्र राबवणे एवढेच केले गेले नाही, तर सरकारी नियम पूर्णपणे धाब्यावर बसवणाऱ्या संबंधित आस्थापनांवर थेट टाळे ठोकण्याची दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. भेसळीचा आणि बेकायदेशीर प्रतिबंधित पदार्थांचा मुख्य अड्डा बनलेली आणि नियमांचे उल्लंघन करणारी तब्बल ६८ दुकाने आणि मोठी हॉटेल्स प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता तात्काळ सील केली आहेत. यापुढे राज्यातील कोणत्याही नागरिकाच्या आरोग्याशी कसलीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही आणि गुन्हेगारांना सोडले जाणार नाही, असा अत्यंत स्पष्ट आणि कडक संदेश या व्यापक कारवाईतून प्रशासनाने संपूर्ण राज्याला दिला आहे.

दूध कुठं जातंय… आणि भेसळ कुठं होतेय?

राज्यात दूध उत्पादक शेतकरी आज एक गंभीर प्रश्न विचारत आहेत .शेतकऱ्यांकडून दररोज लाखो लिटर दूध खरेदी होत असताना बाजारात विकल्या जाणाऱ्या दुधाचे प्रमाण त्यापेक्षा कितीतरी जास्त कसे?याच प्रश्नातून दूध भेसळीचा संशय अधिक गडद होत असून, राज्यभरातील शेतकरी आता केवळ चर्चा नाही तर ठोस कारवाईची मागणी करत आहेत.
सोलापूर जिल्ह्यात दररोज सुमारे २५ लाख लिटर दूध शेतकऱ्यांकडून संकलित केले जाते. जिल्ह्यातील दूध उत्पादक सहकारी संघ बंद पडल्याने हे दूध मोठ्या प्रमाणावर पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील खासगी डेअऱ्यांकडे जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे .जितके दूध गावातून निघते, त्यापेक्षा जास्त दूध बाजारात विक्रीसाठी येतेच कसे?
यामुळे दूध भेसळीचे जाळे उघड करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर परिसरातील दूध संकलन केंद्रांवर आणि डेअऱ्यांवर धडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, भेसळीचा खरा स्रोत शोधला गेला तर अनेक धक्कादायक वास्तव समोर येऊ शकते.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर सुरू केलेल्या भेसळविरोधी मोहिमेमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. अनेक वर्षे भेसळखोरांच्या फायद्यासाठी चाललेल्या व्यवस्थेला पहिल्यांदाच धक्का बसताना दिसत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांचे स्पष्ट मत आहे की, दूध भेसळ थांबली तर दूध दरासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची गरजच भासणार नाही. कारण बाजारात कृत्रिमरीत्या वाढवले जाणारे दूध कमी झाले, तर खऱ्या दूध उत्पादकाच्या दुधाला योग्य किंमत मिळेल.
आज लढाई केवळ भेसळविरोधात नाही, तर प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्याच्या हक्कासाठी आहे. त्यामुळे आता कारवाई केवळ नमुने तपासण्यापुरती न राहता, दूध संकलनापासून विक्रीपर्यंतच्या संपूर्ण साखळीचा पर्दाफाश करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. “भेसळखोरांवर हातोडा पडला तरच शेतकऱ्यांच्या दुधाला न्याय मिळेल,” अशी परखड भावना ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांच्या निशाण्यावर आता सेलिब्रिटी! भ्रामक जाहिरातींवर होणार कडक कारवाई

Web Title: Tukaram mundhe launches surgical strike against adulterators 68 shops and hotels sealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 07:46 PM

Topics:  

  • pandharpur
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…
1

Tukaram Mundhe FDA: ‘पुढची बदली…’ FDA मधून बदली झाल्यास कोणता विभाग हवा? तुकाराम मुंढे यांनी स्पष्टच सांगितलं…

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल
2

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल

अन्नातील भेसळीवर थेट वार! तुकाराम मुंढेंच्या कडक शिस्तीला पुण्याच्या गणेश मंडळांची अनोखी साथ
3

अन्नातील भेसळीवर थेट वार! तुकाराम मुंढेंच्या कडक शिस्तीला पुण्याच्या गणेश मंडळांची अनोखी साथ

Tukaram Mundhe : विमलची जाहिरात करणाऱ्या कलाकारांवर होणार कारवाई, तुमच्यासाठी सुपरस्टार पण..
4

Tukaram Mundhe : विमलची जाहिरात करणाऱ्या कलाकारांवर होणार कारवाई, तुमच्यासाठी सुपरस्टार पण..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.