Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tukaram Mundhe on Sanjay Raut : ‘पुरावे द्या,’ संजय राऊतांच्या FDA वरील आरोपांवर तुकाराम मुंढेचं उत्तर

Tukaram Mundhe on Sanjay Raut : संजय राऊतांनी FDA मधील कथित भ्रष्टाचारावरून तुकाराम मुंढेंना थेट आव्हान दिलं होतं. यावर मुंढेंनी स्पष्ट भूमिका मांडत राऊतांचं पत्र मिळालं नसल्याचं सांगितलं आणि पुरावे देण्याचं आवाहन केलं.

  • By विवेक
Updated On: Sep 29, 2026 | 03:16 PM
Tukaram Mundhe on Sanjay Raut

Tukaram Mundhe on Sanjay Raut

Follow Us
Follow Us:
  • संजय राऊतांनी FDA मधील कथित भ्रष्टाचारावर प्रश्न केले उपस्थित
  • तुकाराम मुंढेंनी राऊतांचं पत्र मिळालं नसल्याचं केलं स्पष्ट
  • भ्रष्टाचाराचे पुरावे आपल्याकडे किंवा लाचलुचपत विभागाकडे देण्याचं मुंढेंचं आवाहन
 

Tukaram Mundhe on Sanjay Raut : अन्न व औषध प्रशासनातील कथित भ्रष्टाचारावरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. खासदार संजय राऊत यांनी FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांचं कौतुक करतानाच त्यांच्याच विभागातील कथित गैरप्रकारांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. आता या आरोपांवर तुकाराम मुंढे यांनी थेट भाष्य केलं आहे.

संजय राऊत यांनी FDA च्या कारवाईबाबत बोलताना ‘मुंढे इफेक्ट’ हॉटेलच्या किचनपुरता मर्यादित न राहता FDA च्या कार्यालयातही दिसायला हवा, असं म्हटलं होतं. तसेच विभागातील अधिकाऱ्यांकडून कथितपणे सुरू असलेल्या पैशांच्या मागणीबाबत आपल्याकडे माहिती असल्याचं सांगत राऊतांनी मुंढेंना पत्र दिल्याचा दावाही केला होता.

तुकाराम मुंढेचं राऊतांना उत्तर

मात्र, तुकाराम मुंढे यांनी आपल्याला संजय राऊतांचं कोणतंही पत्र मिळालं नसल्याचं स्पष्ट केलं. माध्यमांमध्ये आलेली माहिती आपण वाचली असल्याचं त्यांनी सांगितलं. यासोबतच राऊतांनी काही ठोस माहिती किंवा पुरावे दिले तर त्यावर निश्चितपणे कारवाई करता येईल, असंही मुंढे म्हणाले.

Navi Mumbai News : किरीट सोमय्यांविरोधात बजरंग दल आक्रमक, अल्पवयीन मुलीच्या प्रकरणावरून राडा, रबाळे पोलीस ठाण्याबाहेर तणाव

“मला त्यांच्या पत्राची कोणतीही प्रत मिळालेली नाही. मी जे काही आहे ते प्रसारमाध्यमांवर वाचलं आहे. त्यांनी माझ्याकडे किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्यांच्याकडे असलेला तपशील द्यावा,” असं आवाहन मुंढेंनी केलं.

“मला फक्त पुराव्याची गरज,” राऊतांच्या आरोपांवर मुंढेंचं स्पष्टीकरण

तसंच, ज्या परवानाधारकांकडे पैशांची मागणी झाली असेल किंवा ज्यांनी पैसे दिले असतील, त्यांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा, असंही त्यांनी सांगितलं. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाते, त्यामुळे कोणतीही भीती बाळगण्याचं कारण नाही, अशी भूमिका मुंढेंनी मांडली.

“मला दुसरं काही नको, मला फक्त पुराव्याची गरज आहे,” असं म्हणत तुकाराम मुंढेंनी कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवर स्पष्ट भूमिका घेतली. त्यामुळे आता संजय राऊतांकडे नेमके कोणते पुरावे आहेत आणि ते पुढे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान, FDA मधील कथित गैरप्रकारांच्या आरोपांवरून सुरू झालेल्या या चर्चेला तुकाराम मुंढेंच्या प्रतिक्रियेमुळे नवं वळण मिळालं आहे.

Rohit Pawar : …तर समृद्धी महामार्ग जाम करू, रोहित पवारांचा राज्य सरकारला इशारा

Web Title: Tukaram mundhe on sanjay raut fda allegations mundhe reaction letter proof

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • Anti Corruption Bureau
  • FDA
  • sanjay raut
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
1

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं
2

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं

Sanjay Raut Counters Devendra Fadnavis: तुम्ही तर लोकशाहीच चोरलीय!’; संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार
3

Sanjay Raut Counters Devendra Fadnavis: तुम्ही तर लोकशाहीच चोरलीय!’; संजय राऊतांचा फडणवीसांवर पलटवार

मॅगीच्या पाकिटात किडे सापडल्याचा आरोप; Nestle India ने हात झटकले? दिलं मोठं स्पष्टीकरण
4

मॅगीच्या पाकिटात किडे सापडल्याचा आरोप; Nestle India ने हात झटकले? दिलं मोठं स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.