Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मॅनहोलच्या झाकणांच्या चोरी प्रकरणात दोघांना अटक; चोरट्याने सांगितलं खरं कारण…

रस्त्यावर दिसणाऱ्या मॅनहोलमुळे (Manhole in Mumbai) अनेक दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. म्हणूनच त्यावर झाकण लावण्याची व्यवस्था केली जाते. पण याच मॅनहोलच्या झाकणांची चोरी होत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यात आता दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 28, 2023 | 07:49 AM
मॅनहोलच्या झाकणांच्या चोरी प्रकरणात दोघांना अटक; चोरट्याने सांगितलं खरं कारण…
Follow Us
Follow Us:

मुंबई : रस्त्यावर दिसणाऱ्या मॅनहोलमुळे (Manhole in Mumbai) अनेक दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. म्हणूनच त्यावर झाकण लावण्याची व्यवस्था केली जाते. पण याच मॅनहोलच्या झाकणांची चोरी होत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यात आता दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

बोरीवलीत एमएचबी कॉलनी पोलिसांनी 15 झाकणांची चोरी करणाऱ्यास अटक केली आहे. कमलेश ऊर्फ बंटी सोलंकी (29) असे त्याचे नाव असून, तो अब्दुल नजीर शहा (51) यास चोरीच्या झाकणांची विक्री करायचा. त्यासही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोलंकी याला जेव्हा पोलिसांनी अटक करून अधिक चौकशी केली असता तेव्हा त्याने नशेसाठी झाकणांची चोरी करत असल्याचे सांगितले.

उच्च न्यायालयाचे कडक निर्देश

उच्च न्यायालयाने मॅनहोलवरून फटकारल्यानंतर मुंबई महापालिका जागी झाली आहे. महापालिकेने भुयारी गटारांच्या मॅनहोलच्या झाकणांची चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर आता याप्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.

मध्यभागी असलेले झाकण चोरीला

आयसी कॉलनी येथील डांबरी रस्त्यावर मध्यभागी असलेले लोखंडी झाकण चोरीला गेले होते. पालिकेच्या आर विभागाकडून 20 जून रोजी प्राजक्ता दवंगे यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार परिमंडळ 11 चे पोलिस उपायुक्त अजयकुमार बन्सल यांच्या पथकाने तांत्रिक तपास सुरू केला.

332 मॅनहोल झाकणांची चोरी

मुंबईत जानेवारी ते मे दरम्यान एकूण 332 मॅनहोल्सच्या झाकणाची चोरी झालीय. मुंबई महापालिकेच्या पाहणीत हे आढळून आलय. ही सर्व झाकणं ओतीव लोखंडापासून बनवलेली होती.

2020 मध्ये किती झाकणांची चोरी झालेली?

2020 मध्ये मुंबईत एकूण 458 मॅनहोल झाकणांची चोरी झाली होती. मागच्यावर्षी हाच आकडा वाढून 836 झाला. चालू वर्षात पहिल्या पाच महिन्यात चोरी झालेल्या झाकणांची सरासरी पाहिली, तर 2021 पेक्षा हा आकडा जास्त असू शकतो.

Web Title: Two peoples arrested who theft manhole cap in mumbai nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2023 | 07:49 AM

Topics:  

  • BMC
  • maharashtra
  • manhole
  • Mumbai

संबंधित बातम्या

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन
1

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी
2

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा
3

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा

Jalgaon News: ‘शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार!’ दुष्काळ पाहणीनंतर बावनकुळेंचा मोठा इशारा
4

Jalgaon News: ‘शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार!’ दुष्काळ पाहणीनंतर बावनकुळेंचा मोठा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.