Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलेच्या तक्रारीवरून पाच सावकारांवर गुन्हा दाखल; दोघांना ४ दिवसांची पोलिस कोठडी

पतीने व्यवसायासाठी खाजगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची बहुतांश रक्कम परत करूनही पुन्हा व्याजाच्या पैशांसाठी वारंवार तगादा लावल्याने महिलेचा पती घरातून निघून गेला. तरीदेखील या महिलेला तिच्या घरी जाऊन पैशासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाच खाजगी सावकारांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 21, 2022 | 02:47 PM
महिलेच्या तक्रारीवरून पाच सावकारांवर गुन्हा दाखल; दोघांना ४ दिवसांची पोलिस कोठडी
Follow Us
Follow Us:

बारामती : पतीने व्यवसायासाठी खाजगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची बहुतांश रक्कम परत करूनही पुन्हा व्याजाच्या पैशांसाठी वारंवार तगादा लावल्याने महिलेचा पती घरातून निघून गेला. तरीदेखील या महिलेला तिच्या घरी जाऊन पैशासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाच खाजगी सावकारांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय प्रल्हाद बोरकर, पोपट सिताराम थोरात, प्रवीण बेदमुथा, दिलीप कोठारी, (रा. बारामती) व अळणुरे साहेब (रा.परभणी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे असून, यातील पोपट थोरात व संजय बोरकर या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, तिचे पती बबन सातपुते (रा. रिया अपार्टमेंट, भिगवन रोड बारामती) यांनी २०२१ मध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये बायोमास ब्रिक्वेट्स बनवण्याची कंपनी सुरू केली. कंपनी सुरू करताना तिच्या पतीने संजय प्रल्हाद बोरकर, पोपट सिताराम थोरात, प्रवीण बेदमुथा, दिलीप कोठारी (रा. बारामती) व अळणुरे साहेब (रा.परभणी) या सावकारांकडून दर महिना पाच टक्के व्याजाने १ कोटी ९ लाख रुपये घेतले होते. या सर्वांची बरीचशी रक्कम व्याजासह कारखाना चालू असताना परत केली आहे. परंतु, दुर्दैवाने त्यांच्या कारखान्याला तीन मे २०२१ ला आग लागली.

यामध्ये त्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे बाकीची रक्कम ते परत देऊ शकले नाहीत. त्यानंतर वरील सर्व सावकारांनी त्यांना व्याजासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. इन्शुरन्स मिळाल्यानंतर राहिलेली रक्कम देतो, अशी विनंती करून सुद्धा ते सातपुते यांना त्रास देत आहेत. त्यांच्या त्रासापोटी १७ एप्रिल रोजी बबन सातपुते घरातून निघून गेलेले आहेत. ते घरातून निघून गेलेले असताना सुद्धा यातील आरोपी पोपट थोरात हा तक्रारदार महिला घरात असताना बूट घालून तक्रारदार महिलेच्या घरात जाऊन तिला व्याजाच्या पैशासाठी शिवीगाळ करून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून व्याजासाठी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे सदर महिलेने शेवटी पोलिसात तक्रार दाखल केली.

तक्रारदार महिलेचे पती अद्याप घरी आलेले नाही. सदर बाबत पोलिसांनी खातरजमा करून वरील सर्व आरोपींच्या विरोधात सावकारी अधिनियम कलमप्रमाणे गुन्हे दाखल करून यातील आरोपी पोपट थोरात व संजय बोरकर यांना तात्काळ अटक केली. बुधवारपासून (दि.२०) चार दिवसाची पोलीस कोठडी यातील दोघांना न्या. वागडोळे यांनी देण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत सरकारी अभियोक्ता किरण सोनवणे यांनी पोलिसांच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे पोलीस उपनिरीक्षक घोडके तसेच पोलीस नाईक संजय जाधव, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, शिंदे इंगोले यांच्या मदतीने करत आहेत.

यापुढे कोणालाही सावकारीचा त्रास होत असेल, त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार करावी, तक्रारीची खातरजमा करून कारवाई केली जाईल कुणीही बेकायदेशीर सावकारांची भीती बाळगू नये. फक्त तक्रारची खातरजमा केली जाईल. नंतरच गुन्हा दाखल होईल, असे पोलिस निरिक्षक सुनिल महाडिक यांनी सांगितले.

Web Title: Two peoples got police custody for 4 in baramati nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2022 | 02:47 PM

Topics:  

  • baramati
  • maharashtra
  • बारामती

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात
1

Devendra Fadnavis: ऊस उत्पादकांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामाला सुरुवात

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
2

Dharashiv News: धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात विनापरवानगी वृक्षतोड? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती
3

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू
4

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.