Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळकरी मुलांचा जीव टांगणीला; मंगळवेढ्यात 5 दिवसात दोन वेळा ऊसाचे ट्रॅक्टर पलटी

पाच दिवसात ट्रॅक्टर पलटी होण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. दरम्यान या दोन्ही घटना सुट्टीच्या दिवशी व पहाटे घडल्यामुळे सुदैवाने यात कोणतीही हाणी होऊ शकली नाही.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 08, 2024 | 12:35 AM
शाळकरी मुलांचा जीव टांगणीला; मंगळवेढ्यात 5 दिवसात दोन वेळा ऊसाचे ट्रॅक्टर पलटी

शाळकरी मुलांचा जीव टांगणीला; मंगळवेढ्यात 5 दिवसात दोन वेळा ऊसाचे ट्रॅक्टर पलटी

Follow Us
Close
Follow Us:

मंगळवेढा : मंगळवेढा शहरातून ऊस भरुन कारखान्याकडे निघालेला ट्रॅक्टर दामाजी चौकातील इंग्लिश स्कूल गेटच्या समोर पलटी झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली असून, पाच दिवसात ट्रॅक्टर पलटी होण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. दरम्यान या दोन्ही घटना सुट्टीच्या दिवशी व पहाटे घडल्यामुळे सुदैवाने यात कोणतीही हाणी होऊ शकली नाही. प्रशासन दोन घटना घडूनही कोणाच्या मृत्यूची वाट पाहते काय? असा संतापजनक सवाल नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.

मंगळवेढा शहरातून दिवसरात्र ऊसाने भरलेले ट्रॅक्टर व कर्नाटकामधून येणार्‍या अवजड वाहनांची ये- जा सुरु असते. जागरुक नागरिकांनी अवजड वाहतूक थांबविण्यासाठी वेळोवेळी आंदोलन केल्यावर पंढरपूर बायपास रोड जवळ कमान नगरपालिकेने बसविली मात्र ही कमान प्रमाणापेक्षा उंच असल्याने याचा परिणाम अवजड वाहनावर न होता अलगदपणे शहरात जोमाने वाहने येत असल्यामुळे दामाजी चौकात शालेय मुले, नागरिक, वृध्द यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरुन ओलांडावा लागतो. नगरपालिकेने केवळ कमान बसवून रडक्याचे डोळे पुसण्याचे काम केल्याच्या तिखट प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.

पोलीसांनी अवजड वाहनावर दंडात्मक कारवाई केल्यास याला निश्‍चित आळा बसेल मात्र पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासनाकडे बोट दाखवत असल्यामुळे लोकांचे आत्तापर्यंत दहा जणांचे जीव जावूनही तु… तु… मै… मै.. चा प्रकार सुरु असल्याने नागरिकांनी या कामकाजाबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा : रस्ता ओलांडताना जोरात बस आली अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना

रविवारी भर दुपारी मोकळ्या टॅ्रक्टचे ट्रेलर इंग्लिशस्कूलच्या समोर दामाजी चौकात पलटी झाल्याची घटना घडली होती. यानंतरही नगरपालिका व पोलीस प्रशासन तोंडावर बोट ठेवूनच आहे. शुक्रवारी पहाटे ऊसाने भरलेला ट्रेलरच चक्क पलटी झाला. सुदैवाने येथे नागरिकांची वर्दळ नसल्यामुळे दुर्घटना टळली. सध्या नगरपालिकेचा प्रशासन कारभार प्रांत अधिकारी हे पाहत असून, त्यांचीही भूमिका गांधारीची असल्याने नागरिकांना या अवजड वाहनाबाबत मोठा गंभीर प्रश्‍न पडल्याच्या प्रतिक्रीया सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. यापुर्वीही त्यांच्याकडे मनसे तसेच वारी परिवार यांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र या तक्रारीचा शंभर टक्के निपटारा न झाल्याने अद्यापही अवजड वाहतूक शहरामधून सुरु असल्याचे चित्र असून अजून कुणाच्या मरणाची वाट हे पाहतात काय? असा सवालही जेष्ठ नागरिक करीत आहेत.

पादचारी महिलेचा मृत्यू

सातारा रस्त्यावर भरधाव पीएमपीने दिलेल्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नातूबाग परिसरात हा अपघात घडला असून, महिला विवाह सोहळ्यावरून घरी निघाली होती. अपघातात महिलेबरोबर असलेली नात गंभीर जखमी झाली आहे. आशाबाई दत्तात्रय साळुंके (वय ५७, रा. हिराबाग, शुक्रवार पेठ, टिळक रस्ता) असे मृत्यू झालेल्या पादचारी महिलेचे नाव आहे. अपघातात साळुंके यांची नात प्रचिती जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Two sugarcane tractor accidents have occurred in mangalvedha in 5 days nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2024 | 12:35 AM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • maharashtra
  • Mangalvedha

संबंधित बातम्या

Dharashiv News : मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या संपाचा धाराशिवमध्ये परिणाम; शासकीय कामकाज ठप्प
1

Dharashiv News : मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या संपाचा धाराशिवमध्ये परिणाम; शासकीय कामकाज ठप्प

Pratap Sarnaik: रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य; अंमलबजावणीसाठी सरकारची हालचाल, मंत्री प्रताप सरनाईक यांची बैठक
2

Pratap Sarnaik: रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य; अंमलबजावणीसाठी सरकारची हालचाल, मंत्री प्रताप सरनाईक यांची बैठक

Dharashiv News: धारूर शिवारात अवकाळीचा तडाखा; आमदार कैलास पाटील यांच्याकडून नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी
3

Dharashiv News: धारूर शिवारात अवकाळीचा तडाखा; आमदार कैलास पाटील यांच्याकडून नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी

ST Bus News: एसटीतील अकार्यकारी अधिकाऱ्यांबाबत निर्णय घेणारी समिती संभ्रमात; ७६ वर्षांच्या महामंडळाकडे मार्गदर्शक परिपत्रकच नाही
4

ST Bus News: एसटीतील अकार्यकारी अधिकाऱ्यांबाबत निर्णय घेणारी समिती संभ्रमात; ७६ वर्षांच्या महामंडळाकडे मार्गदर्शक परिपत्रकच नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.