Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उबाठा आणि शरद पवार गट काँग्रेसला एकट पाडणार – आमदार नितेश राणे

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर खरे प्रेम असेल तर वंचित पक्षाला मागत असलेल्या १२ जागा द्या, भाजप नाही तर आदित्य ठाकरे तडीपार होणार

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 04, 2024 | 04:50 PM
उबाठा आणि शरद पवार गट काँग्रेसला एकट पाडणार – आमदार नितेश राणे
Follow Us
Close
Follow Us:

उबाठा आणि शरद पवार गट महाविकास आघाडीत लढणार नाहीत. काँग्रेसला एकट पडण्याचा प्रयत्न करत आहेत. इंडिया आघाडीत काय काय चालले आहे त्याचे लवकरच चित्र पाहायला मिळेल, हे लोक प्रकाश आंबेडकर यांना धोका देणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबीयांबद्दल या लोकांना काडीचेही प्रेम नाही. फक्त कॅमेरा समोर इलुईलू करू चॉकलेट दाखवण्याचे काम करतात. आंबेडकरांवर खरे प्रेम असेल तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला ते मागत असलेल्या १२ जागा द्या, असा टोला भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे

कणकवलीत आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषद

देशाच्या पंतप्रधानांवर बोललं की, दिवसभर चर्चेत राहायला मिळत ही संजय राऊत यांची सवय झाली आहे. सकाळच्या पत्रकार परिषदमुळे यांच्या मित्रपक्षांचे नेते सोडून जात आहेत. ज्या व्यक्तीला स्वतःच घर सांभाळता आलं नाही. पक्ष गेला त्या अतिरेकीं सोबत संबंध असलेल्या संजय राऊतने मोदींजींना सल्ले देवू नयेत. उद्धव ठाकरेंनी दिलेले किती शब्द पूर्ण केले आहेत? ते आधी सांगा. कोकणातील शेतकऱ्यांना किती सबसीडी, नुकसान भरपाई मिळाली ते सांगा. बांधावर जाऊन शेतकऱ्यांना काय काय सांगितले होते ते आठवा, असा सवाल आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

कर्जत येथील फार्महाऊस सुशांत सिंग राजपूत बाबत प्रश्न विचारणाऱ्या एका पत्रकाराला रस्त्यात अटक केली गेली. आंदोलन जीवींचा दुसरा भाऊ म्हणजे संजय राऊत आहे. त्यांना त्याच्यातील कमिशन येत असावे म्हणून त्याची तशी भाषा आहे. संजय राऊतने तयारी दाखवावी मोदींनी सुरू केलेले देशातील ५० प्रकल्प मी फिरवून दाखवतो. त्यासाठी लागणारा सगळा खर्च माझा असेल. माझं आव्हान स्वीकारायला तयार आहात का? आणि हे प्रकल्प दाखविले की मोदी है तो मुमकिन है… हे मान्य करा. संजय राऊत यांनी देशाच्या न्याय व्यवस्थेवर टिपणी करू नये. राऊत यांची भूमिका ही अर्बन नक्षलची भूमिका आहे, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.

दुसऱ्यांच्या घरातल्या बारशाला जाऊन वडापाव खाण ही राऊत यांची सवय आहे. नितीन गडकरी यांचे सोडा तुम्ही तुमच्या जुन्या सैनिकांना किती न्याय दिला? श्रीधर पाटणकर यांच्याकडे १० हजार कोटी कसे आले. उद्धव ठाकरे दिशा सालीयन व सुशांतसिंगच्या आईवडिलांना भेटणार आहेत का? असा सवाल एका प्रश्नांवर बोलताना केला.

जरांगे पाटील यांच्यावर बोलताना ते म्हणाले, त्यांना मराठा समाज गांभीर्याने घेत नाही. जरांगे समाजाबद्धल कमी आणि राजकारण जास्त बोलतात. त्यांच्या बोलण्याकडे आम्ही जास्त लक्ष देत नाही. मराठा समाजाला न्याय फडणवीस यांनीच दिला आहे. विनायक राऊत यांना पडण्याची एवढी घाई लागली असेल. देवीकडे साकडे घातले असेल तर त्यांनी बॅग भरून ठेवावी. गुलाबराव पाटील बरोबर बोलले भाजपा तडीपार होणार नाही. तर आदित्य ठाकरे तडीपार होणार आहे. त्यामुळेच आईला घेऊन इकडे तिकडे पाय धरत फिरत असल्याचा टोला नितेश राणे यांनी लगावला.

Web Title: Ubatha and sharad pawar group will isolate congress mla nitesh rane maharashtra political party sanjay raut aditya thackeray bjp shivsena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2024 | 04:50 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • BJP
  • Congress
  • MLA Nitesh Rane
  • sanjay raut
  • Sharad Pawar Group
  • shivsena

संबंधित बातम्या

Mumbai BJP Office: भाजपाची कार्यालयासाठी मरीन लाईन्स येथील जागा जोरजबरदस्तीने; संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप
1

Mumbai BJP Office: भाजपाची कार्यालयासाठी मरीन लाईन्स येथील जागा जोरजबरदस्तीने; संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप

Sindhudurg ZP Election: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल; निलेश राणेंचा ३२ जागांवर दावा!
2

Sindhudurg ZP Election: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल; निलेश राणेंचा ३२ जागांवर दावा!

सगळं सत्य बाहेर येत आहे, रणजितसिंह चिंता करु नका, आम्ही…; फलटणमधून मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितल
3

सगळं सत्य बाहेर येत आहे, रणजितसिंह चिंता करु नका, आम्ही…; फलटणमधून मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितल

Khed: भरणे-दापोली रस्ता कामाला विलंब! काँग्रेसचा इशारा; “महिनाभरात काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडू”
4

Khed: भरणे-दापोली रस्ता कामाला विलंब! काँग्रेसचा इशारा; “महिनाभरात काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडू”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.