Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उदयनराजेंचा छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकाला थेट फोन; केली ‘ही’ सूचना

'छावा' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या नृत्याविष्कारावर अनेक शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनाच फोन लावून सूचना केल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 26, 2025 | 12:02 PM
उदयनराजेंचा छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकाला थेट फोन; केली 'ही' सूचना

उदयनराजेंचा छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकाला थेट फोन; केली 'ही' सूचना

Follow Us
Follow Us:

सातारा : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित ऐतिहासिक छावा चित्रपट प्रदर्शनाला तयार आहे मात्र त्या चित्रपटात छत्रपती संभाजीराजे हे एका दृश्यामध्ये नृत्य करताना दिसले आहेत. या संदर्भात येसूबाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा दिला होता. आता खासदार उदयनराजे भोसले यांनी लक्ष्मण उतेकर यांना फोन करुन सदर दृश्याविषयी इतिहास तज्ञांची आपण चर्चा करावी अशी सूचना केली, या सूचनेला उतेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आहे

मराठीतील ख्यातनाम सिनेमाटोग्राफर आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा हिंदी चित्रपट “छावा” येत्या १४ फेब्रुवारीला रिलीज होत आहे.या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणारा अभिनेता विकी कौशल याला नृत्य करताना दाखविले आहे. या चित्रपटातील दृश्यांवर इतिहास प्रेमींनी काही आक्षेप घेतले आहेत. या चित्रपटातील दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी इतिहास संशोधक आणि आमच्याशी चर्चा करायला हवी होती. तसेच चित्रपटातील काही दृश्यांना हटविण्याची मागणी त्यांनी केली होती.

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ‘छावा ‘ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना फोन केला. आणि चित्रपटातील छत्रपती संभाजी राजांचे लेझीम गाण्यावर असणारे आक्षेपार्ह सीन हटवण्याच्या सूचना केल्या आहेत. यानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी संबंधित सिन हटवण्याची ग्वाही दिली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी लक्ष्मण उतेकर यांना फोन करून या चित्रपटात काही आक्षेपार्ह घटना जर दाखवल्या गेल्या असतील तर त्या हटविण्यात याव्यात असे म्हटले आहे. लोकांपर्यंत चांगला चित्रपट घेऊन जावा आणि आजच्या पिढीसमोर आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी देशासाठी आणि धर्मासाठी केलेले योगदान चांगल्या पद्धतीने जगाच्या समोर यावे अशी सूचना देखील केली आहे.

हे सुद्धा वाचा : गुन्हेगारांना खुली सूट! पिंपरी-चिंचवड शहरात अनेक CCTV कॅमेरे फक्त टांगलेलेच

या चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलेल्या काही घटना इतिहास तज्ज्ञ आणि अभ्यासक यांना हा चित्रपट दाखवावा. चित्रपटाची व्यवस्थित मांडणी करूनच हा चित्रपट रिलीज करावा जेणेकरून समाजामध्ये यावरुन वाद निर्माण होणार नाहीत असे यावेळी त्यांनी सांगितले.यावेळी छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच दुरुस्तीसह हा चित्रपट प्रदर्शित करू असा विश्वास व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा : धक्कादायक! पुण्यात डंपर पलटी होऊन 2 विद्यार्थिनींचा मृत्यू, शरीराचे तुकडे फावड्याने…

Web Title: Udayanaraje has called the director of chhava film laxman utekar and informed him nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2025 | 12:02 PM

Topics:  

  • maharashtra
  • Udayanraje Bhosale

संबंधित बातम्या

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
1

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे
2

Monsoon Trip : जिथे ढग डोंगररांगांच्या कुशीत विसावतात… पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 6 अप्रतिम ठिकाणे

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!
3

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा
4

नवी मुंबई पोलीस बदल्यांमध्ये ट्विस्ट! उरण पोलीस ठाण्यात अखेर जगदीश शेलकरांची नियुक्ती, निर्णयामागील कारणांबाबत चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.