संग्रहित फोटो
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारी आणि वाहतुकीसंदर्भातील प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, शहरातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंद स्थितीत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. बंद कॅमेर्यांमुळे पोलिसांच्या तपासात अडचणी येत असून, नागरिकांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या हाणामार्या, लुटमार, आंदोलने किंवा इतर गुन्ह्यांचे दृश्य पुरावे सीसीटीव्हीमुळे मिळतात. बंद कॅमेर्यांमुळे अशा घटनांमध्ये पोलिसांना न्यायालयात पुरावे सादर करताना अडचणी येत आहेत. वाहतूक अपघातांच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाची भूमिका बजावते. अपघाताची कारणे, दोषी वाहने किंवा नियम तोडणार्या चालकांची माहिती मिळवण्यासाठी कॅमेरे उपयुक्त ठरतात. मात्र, सध्या अनेक कॅमेरे बंद असल्याने वाहतूक पोलिसांनाही तपास प्रक्रिया प्रभावीपणे करता येत नाही. शहरातील बंद कॅमेर्यांच्या समस्येचे मूळ कारण म्हणजे प्रशासनाचे दुर्लक्ष. कॅमेर्यांची वेळोवेळी देखभाल, दुरुस्ती आणि गुणवत्तेची तपासणी करण्यात येत नसल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. काही ठिकाणी कॅमेरे चुकीच्या ठिकाणी बसवले गेले असून, ते महत्त्वाचे भाग कव्हर करत नाहीत.
वेळेवर देखभाल दुरुस्ती नसल्याने कॅमेरे अकार्यक्षम
महापालिका आणि स्मार्ट सिटीअंतर्गत शहरभरात कोट्यवधी रुपयांचा खर्च करून तब्बल पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. मात्र, वेळेवर देखभाल आणि दुरुस्ती न झाल्याने कॅमेरे बंद किंवा अकार्यक्षम असल्याची ओरड होत आहे. याव्यतिरिक्त खासगी कॅमेर्यांची प्रतिमा गुणवत्ता (क्वॉलिटी) खालावल्यामुळे त्यातून मिळणारे फुटेज धूसर आहे. तसेच, काही कॅमेरे चुकीच्या दिशेला बसवले गेल्याने त्याचा पोलिस तपासात काहीही उपयोग होत नाही. पोलिस तपासामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग गुन्हेगार ओळखणे, त्यांच्या हालचालींचा मागोवा घेणे आणि पुरावे गोळा करणे यासाठी होतो. मात्र, शहरातील कॅमेरे बंद असल्याने गुन्हेगारांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. चोरी, खून किंवा अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हेगार कोणत्या दिशेने गेले, त्यांनी कोणत्या वाहनाचा वापर केला, हे समजण्यास मदत होते. बंद कॅमेर्यांमुळे पोलिसांना हे महत्त्वाचे पुरावे मिळत नाहीत, ज्यामुळे तपास प्रक्रियेत उशीर होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
बंद कॅमेर्यांमुळे तपास ठप्प
शहरातील सोन साखळी चोरीसारख्या घटनांमध्ये सीसीटीव्ही फुटेजमुळे गुन्हेगारांचा माग काढणे शक्य होते. एखाद्या गुन्ह्याच्या ठिकाणावरून निघाल्यानंतर गुन्हेगार कोणत्या मार्गाने गेले, त्यांचे वाहन कोणते होते, हे कॅमेर्यांमुळे स्पष्ट होते. बंद कॅमेर्यांमुळे अशा प्रकारचा तपास ठप्प होत आहे.
या उपाययोजनांची गरज