Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“प्रत्येक कुटुंबासोबत ठामपणे उभा राहणार”, आंबेनळीतील दुःखद दुर्घटनेनंतर उदयनराजेंकडून पीडित कुटुंबीयांना आधार

आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातामुळे सातारा जिल्ह्यावर दुःखाचे सावट पसरले असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी मृत तरुणांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

  • By विवेक
Updated On: May 26, 2026 | 09:27 PM
Udayanraje Meets families of Ambenali Accident victims, Udayanraje Bhosale, Ambenali Accident, Satara News,

Udayanraje Meets families of Ambenali Accident victims, Udayanraje Bhosale, Ambenali Accident, Satara News,

Follow Us
Follow Us:

सातारा, दि. २६ : प्रतिनिधी: आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातामुळे सातारा जिल्ह्यावर दुःखाचे सावट पसरले असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी मृत तरुणांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांचे सांत्वन केले. या दुर्घटनेत आठ युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मर्ढे, आसगाव आणि खटाव परिसरात शोककळा पसरली आहे.

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या युवकांच्या घरी जाऊन उदयनराजेंनी कुटुंबीयांशी संवाद साधला. अचानक कोसळलेल्या या दुःखामुळे हतबल झालेल्या नातेवाईकांना त्यांनी धीर देत भावनिक शब्दांत आधार दिला. “कुटुंबावर ओढवलेली ही वेळ अत्यंत कठीण आहे. या दुःखात मी त्यांच्या सोबत कायम उभा राहीन,” असे त्यांनी सांगितले.

रविवारी मध्यरात्री आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ वाहन खोल दरीत कोसळल्याने ही दुर्घटना घडली होती. या अपघातात उत्कर्ष शिंगटे, प्रवीण शिंगटे, महेश पवार, आदित्य साळुंखे, रितेश लोखंडे, सुहास लोखंडे, अंश चव्हाण आणि संदीप काटकर या आठ जणांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण जिल्हा सुन्न झाला असून गावागावांतून हळहळ व्यक्त होत आहे.

Karjat News : पनवेल कर्जत प्रवास आता होणार आणखी सोपा; रेल्वे मार्गिकेच्या कामाची श्रीरंग बारणे यांनी केली पाहणी

सांत्वन भेटीदरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवंगत युवकांना श्रद्धांजली वाहिली. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर वातावरणात प्रचंड हळहळ दिसून येत होती. गावकऱ्यांनीही या दुर्घटनेनंतर आंबेनळी घाटातील सुरक्षेचा प्रश्न गंभीरपणे हाताळण्याची मागणी केली.

यावेळी उदयनराजे भोसले यांनीही घाटातील अपघातांच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली. “अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

या घटनेनंतर आंबेनळी घाटातील सुरक्षा, संरक्षण भिंती, इशारा फलक आणि धोकादायक वळणांवरील उपाययोजनांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

आंबेनळी दुर्घटनेतील आठ तरुणांना अश्रुपूर्ण निरोप, आसगाव, मर्ढे आणि खटाव गावांमध्ये शोककळा; मध्यरात्री अंत्यसंस्कारावेळी हंबरडा

Web Title: Udayanraje meets families of ambenali accident victims

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 09:27 PM

Topics:  

  • Accident Case
  • Ambenali Ghat
  • Satara
  • Udayanraje Bhosale

संबंधित बातम्या

इंग्रजांच्या कैदेतून सातारा जेलच्या तटावरून क्रांतिवीर नागनाथ अण्णांची ‘ती’ धाडसी उडी; स्मरणार्थ साताऱ्यात १० सप्टेंबरला शौर्य दिन
1

इंग्रजांच्या कैदेतून सातारा जेलच्या तटावरून क्रांतिवीर नागनाथ अण्णांची ‘ती’ धाडसी उडी; स्मरणार्थ साताऱ्यात १० सप्टेंबरला शौर्य दिन

Deur Vitthal Temple: ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध देऊरचे पुरातन विठ्ठल मंदिर धोक्यात; ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना साकडे
2

Deur Vitthal Temple: ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध देऊरचे पुरातन विठ्ठल मंदिर धोक्यात; ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना साकडे

Satara News : वाई डाक उपविभागाची कामगिरी अभिमानास्पद; PLI-RPLI महालॉगिन डेमध्ये ₹1.58 कोटींचा विमाहप्ता, कर्मचाऱ्यांचा गौरव
3

Satara News : वाई डाक उपविभागाची कामगिरी अभिमानास्पद; PLI-RPLI महालॉगिन डेमध्ये ₹1.58 कोटींचा विमाहप्ता, कर्मचाऱ्यांचा गौरव

Satara Half Marathon: धावण्याच्या शर्यतीत हृदय थांबले; डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही पुण्याच्या धावपटूचा मृत्यू
4

Satara Half Marathon: धावण्याच्या शर्यतीत हृदय थांबले; डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही पुण्याच्या धावपटूचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.