मुंबई : राज्यात सत्तांतर झाले आहे, महाविकास आघाडी सरकार कोसळून भाजप व एकनाथ शिंदे बंडाळी गट (BJP and Shinde Group) यांचे सरकार आले आहे. आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Vice CM Devendra fadnvis) यांनी पदभार स्विकारला आहे. त्यानंतर शिंदे गटात प्रवेश करण्याचा धडाका सुरुच आहे. आमदारांचा बंडानंतर आता खासदार, पदाधिकारी व नगरसेवक दररोज शिंदे गटात प्रवेश करत आहेत. त्यामुळं शिवसेनेतून फुटून शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे, त्यामुळं शिवसेनेच्या अडचणीत वाढ होत आहे. दरम्यान, दिल्लीत १२ खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर त्याच गटातील खासदार राहुल शेवाळेंनी (Rahul Shewale) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टिकेचे बाण सोडले आहेत.
[read_also content=”सीबीएसई इयत्ता १२ वी पाठोपाठ, इयत्ता १० वी चाही निकाल जाहीर, मुलींचीच बाजी https://www.navarashtra.com/maharashtra/cbse-class-12th-followed-by-class-10th-also-results-announced-girls-win-306911.html”]
दरम्यान, सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे विजय मिळवून देऊ शकत नाहीत. त्यांनी भारतीय जनता पक्षाशी युती करणे आवश्यक आहे, असं बंडखोर खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या अनेक बैठकांमध्ये निवडणुकीत नेतृत्वाचा मुद्दा बंडखोर नेत्यांनी उपस्थित केला होता. त्यामुळं भाजपासोबत युती करण्याशिवाय शिवसेनेला पर्याय नसल्याचं शेवाळेंनी म्हटलंय. त्यामुळं शेवाळेंच्या या टिकेला उद्धव ठाकरे कसे उत्तर देतात हे पाहावे लागेल.