'मुंबई आमचीच राहणार, ठाकरे ब्रँड संपवायला गेला तर...' ; वर्धापनदिन कार्यक्रमातून ठाकरे कडाडले
मराठी माणूस मुंबईत एकत्र येऊ नये म्हणून प्रयत्न केले जात आहेत. मात्र मुंबई आमचीच राहणार. ठाकरे ब्रँड संपवायला गेला तर याद राखा, तुमचं नामोनिशाण ठेवणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपचं नाव न घेता लगावला आहे. तसंच राज्याच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात जे आहे तेच करणार. पण हे सर्व होऊ नये यासाठी यांच्या मालकाचे लोक इकडे तिकडे, हॉटेलमध्ये भेटी घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
आता वातावरण जे आहे, ते वातावरण मला नाही वाटत की कुणाच्या नशिबात असेल. तसंच भाग्यात असं प्रेम लिहिलं असेल. खरंतर ही माझी पुण्याई नसून माझ्या पूर्वजांची पुण्याई आहे. ते तुमच्या सगळ्यांचं अतोनात प्रेम आहे. मी भाषण न करताही तुम्ही जयघोष करत आहात. हा जयघोष विरोधकांनी नुसता पाहिला तरी त्यांचे नॅपकीनसह सगळे कपडे ओले होतील.
आता त्यांना एक प्रश्न पडेल की एवढं सगळं केलं. त्यांनी माणसे फोडली, पक्ष फोडला, चिन्ह चोरली तरी उद्धव ठाकरे संपत कसा नाही. कारण त्यांना कल्पना नाही की शिवसेनाप्रमुखांनी रक्त आटवून विचार पेरून शिवसेना नावाचं वादळ निर्माण केलंय. आम्ही पैसे फेकून जमवलेली माणसे नाहीत. त्यांचे विचार अंगात भिनवून कट्टर हिंदूनिष्ठ आणि महाराष्ट्र धर्म पाळणारे शिवसैनिक आहेत.
शिवसेना आजही तरूण असून नेहमी तरूणच राहणार. शिवसेनेचा पहिला मेळावा शीवतीर्थावर झाला, तेव्हा शिवाजी पार्क भरलं होतं. आता त्यांचा पैसा फेको तमाशा देखो सुरु आहे. आता चोरांचा बाजार आहे. तसं काही नव्हतं. त्यांनी एकदम शिवाजी पार्कात सभा घेण्याचा मोठेपणा करू नये. त्यावेळी शिवसेनाप्रमुख म्हणाले की एकदाच काय ते होऊ द्या. शिवाजी पार्क तुडुंब भरलं होतं. दाढीवाले, ते त्यावेळी कुठे असतील याची कल्पना नाही.
Shiv Sena : मुंबईत शिवसेनेचा उबाठा गटाला धक्का, तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
उंची पेग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा आणि डोळे कुणासारखे आहेत ते माहिती नाही. अरे तुझी उंची किती. तुझा जीव किती, तू बोलतो किती? तुझ्या बापाची पार्श्वभूमी काय? एक कुणीतरी बाप ठरवं आणि मग बोल असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यावर नाव न घेता बोचरी टीका केली आहे.