Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कणकवलीत उद्धव ठाकरेंची 3 मे रोजी प्रचारसभा, राणेंचा तिसऱ्यांदा पराभव निश्चित?

कुडाळ मालवण मतदारसंघात पहिल्यांदा आमदार वैभव नाईक यांनी आणि नंतर बांद्रा पोटनिवडणूकीत तृप्ती सावंत यांनी राणेंचा पराभव केला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 30, 2024 | 11:56 AM
कणकवलीत उद्धव ठाकरेंची 3 मे रोजी प्रचारसभा, राणेंचा तिसऱ्यांदा पराभव निश्चित?
Follow Us
Close
Follow Us:

कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात शुक्रवार 3 मे रोजी सायंकाळी 6 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा होणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली. आज कणकवलीत शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची पत्रकार परिषद पार पडली यामध्ये त्यांनी प्रचार सभेची माहिती दिली आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेला कणकवली विधानसभा आणि कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील 5 तालुक्यातील इंडिया आघाडी मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील 2200 गावे 23 हजार वाड्यांतील प्रत्येक घरात विनायक राऊत यांनी दांडगा जनसंपर्क ठेवला आहे. मागील 10 वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1 लाखापेक्षा अधिक मताधिक्याने राऊत विजयी होणार आहेत. विरोधी उमेदवार नारायण राणे यांचा याआधी दोन वेळा पराभव शिवसेनेने केला आहे. कुडाळ मालवण मतदारसंघात पहिल्यांदा आमदार वैभव नाईक यांनी आणि नंतर बांद्रा पोटनिवडणूकीत तृप्ती सावंत यांनी राणेंचा पराभव केला. राणेंचा जनाधार आता संपला असल्याचे संदेश पारकर यांनी सांगितले.

त्यामुळेच राणेंचा तिसऱ्यांदा पराभव करून विनायक राऊत हे विजयाची हॅट्ट्रिक करतील. राणेशाही आता संपली असून सामंत शाही अस्तित्वात येईल म्हणून राणेंनी किरण सामंत यांच्या उमेदवारीला विरोध करून स्वतः साठी उमेदवारी मिळवली. कोकण ही परशुरामाची भूमी असून अति तिथे माती करणारी ही भूमी आहे. मोदींच्या कारभाराविरुद्ध जनतेत प्रचंड रोष आहे. 7 मे रोजी निवडणूक निकालात हा रोष दिसून येईल. विनायक राऊत यांच्या खळा बैठक, जाहीर सभांना मतदारसंघात जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. मोदींच्या काळात बेरोजगारी वाढली असून महागाईने जनता त्रासली आहे. जनतेत भाजपा आणि मोदींविरोधात संतापाची लाट आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासासाठी झुकते माप दिले. शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करून त्यासाठी अब्जावधी निधी दिला. चिपी विमानतळ पूर्ण केले. जनतेच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती असून विनायक राऊत यांना मतदान करून जनता विरोधकांना चितपट करेल. उद्धव ठाकरे यांच्या सभेला हजारोंच्या संख्येने जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन संदेश पारकर यांनी केले.

Web Title: Uddhav thackerays campaign meeting in kankavli on may 3 ranes defeat for the third time is certain maharashtra political party kankavali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2024 | 11:08 AM

Topics:  

  • kankavali
  • loksabha elections 2024
  • Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Shivsena : आता काय असेल शिवसेनेची पुढची दिशा? की होणार राजकीय दुर्दशा?
1

Shivsena : आता काय असेल शिवसेनेची पुढची दिशा? की होणार राजकीय दुर्दशा?

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?
2

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?

Maharashtra Politics: मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण केली उद्धव ठाकरेंची ती इच्छा; एकनाथ शिंदे गटाला बसला जोरदार धक्का
3

Maharashtra Politics: मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण केली उद्धव ठाकरेंची ती इच्छा; एकनाथ शिंदे गटाला बसला जोरदार धक्का

Maharashtra Politics : नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; माजी नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश
4

Maharashtra Politics : नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; माजी नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.