Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

…तर कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंना सोलापूर जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही; युवा सेनेचा इशारा

15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पोहोचले नाहीत तर, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना सोलापूर जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 07, 2025 | 03:46 PM
...तर कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंना सोलापूर जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही; युवा सेनेचा इशारा

...तर कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंना सोलापूर जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही; युवा सेनेचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान
  • कृषिमंत्री भरणेंना जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही
  • युवा सेनेचा इशारा
अकलूज : अतिवृष्टीमुळे माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. अद्यापही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित आहेत. जर येत्या 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पोहोचले नाहीत तर, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना सोलापूर जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा ठाकरेंच्या युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी दिला आहे.

युवा सेनेच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग माळीनगर (दोन नंबर गट) येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. दीपावलीच्या काळात काही मोजक्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. अद्यापही नुकसानग्रस्त अनेक शेतकरी सरकारी मदतीची वाट पाहात आहेत. येत्या पंधरा दिवसात सर्व शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा निषेध करून त्यांना सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

या रास्ता रोकोमध्ये युवा सेना उपतालुका प्रमुख दत्ता साळुंखे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख आशा टोणपे, शहर प्रमुख शेखर खिलारे, गणेश कदम, संजय पोळ, सचिन भोसले, पोपट जमदाडे, धनाजी मस्के, रज्जाक मुलाणी, आप्पा महाडिक, पप्पू पाटील, अशोक चव्हाण, सचिन मिसाळ, ओम पराडे, विकास भोई, प्रशांत पराडे, अक्षय पराडे, दयानंद इंगळे, रोहित इंगळे, किरण पराडे, गणेश काळे, गोरख पराडे, बंशीलाल भोई, शुभम भोई, मुकुंद गायकवाड आदी उपस्थित होते.

राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही

राज्यात महापुराने शेतकऱ्यांची दैना केली असतानाच तसेच मराठवाड्यामध्ये अवघी जमीन खरडून गेली असताना हतबल शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. पण अनेक शेतकऱ्यांना काहीच पैसे मिळाले नाहीत. शेतकऱ्यांचा मदतीसाठी आक्रोश सुरू आहे. केंद्र सरकारनेच दिलेल्या लेखी माहितीमध्ये राज्य सरकारकडून अजूनही मदतीसंदर्भात कोणताच प्रस्ताव गेला नसल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय कृषिमंत्री यांनी संसदेमध्येच ही माहिती दिली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीचे काय? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Web Title: Uddhav thackerays shiv sena has warned agriculture minister datta bharne

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 03:46 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Dattatray Bharne
  • Dattatray Vithoba Bharne
  • Farmers

संबंधित बातम्या

गिरीष महाजनांच्या वक्तव्यावरुन हर्षवर्धन सपकाळ आक्रमक; मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी
1

गिरीष महाजनांच्या वक्तव्यावरुन हर्षवर्धन सपकाळ आक्रमक; मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी

Nashik Farmers : शेतकरी चिंतेत ! पूर्वमान्सूनची साथ नाही; येवला तालुक्यात खरीप हंगामावर संकटाची छाया
2

Nashik Farmers : शेतकरी चिंतेत ! पूर्वमान्सूनची साथ नाही; येवला तालुक्यात खरीप हंगामावर संकटाची छाया

महायुतीची कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक! मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी; विजय वडेट्टीवार यांची मागणी
3

महायुतीची कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक! मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी; विजय वडेट्टीवार यांची मागणी

Farmers News: दुष्काळाच्या छायेत मराठवाडा; मराठवाड्यातील ४३ लाख एकर शेती संकटात; अनियमित मान्सूनमुळे कृषी अर्थव्यवस्थेला फटका
4

Farmers News: दुष्काळाच्या छायेत मराठवाडा; मराठवाड्यातील ४३ लाख एकर शेती संकटात; अनियमित मान्सूनमुळे कृषी अर्थव्यवस्थेला फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.