Photo Credit- Social Media
वणी : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रोज नवनव्या गोष्टी समोर येत आहे. रोज कोणत्या ना कोणत्या मुद्द्यांवरून महाविकास आघाडी आणि महायुतीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच आज उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासणीच्या मुद्द्यावरून नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वणी येथे सभा पार पडली, या सभेसाठी येत असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी केली. मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांनाही इशारा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे हे वणी येथे सभा घेण्यासाठी दाखल झाले. त्यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगेची तपासणी केली. त्यावरून सभेत बोलताना निवडणूक अधिकाऱ्यांना इशारा देत उद्धव ठाकरेंनी काही प्रश्नही विचारले. तुम्ही जशी माझी बॅग तपासली तशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याही बॅगा तपासल्या का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच जर निवडणूक अधिकाऱी त्यांच्या बॅगा तपासणार नसतील तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते त्यांच्या बॅगा तपासतील असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.
उद्धव ठाकरे म्हणाले, मला जास्त भाषणे करण्याची गरज नाही, आम्ही तुम्हाला विजय दिला, असं लोक सांगत आहेत. फक्त 20 तारखेला कोणालाही डोळ्यावर पट्टी बांधून देऊ नका. आपल्या न्यायदेवतेच्या डोळ्यांवरची पट्टीदेखील काढली आहे. त्यामुळे तुमच्याही डोळ्यांवर पट्टी असण्याची गरज नाही, तुम्ही डोळसपणे मतदान करा., मी कोणत्याही माणसांना दोष देत नाही. मी यंत्रणेला दोष देतोय मी हेलिकॉप्टरने आले तेव्हा माझ्या स्वागतासाठी 8-10 जण उपस्थित होते. मी विचारलं काय करायंच आहे. त्यांनी माझी बॅग तपासायची असल्याचे सांगितले. मी त्यांना माझी बॅग तपासू दिली. ज्यांनी तुमची तपासणी केली आता तुम्हीही त्यांची ओळखपत्रे तपासून घ्या. ते जसे तुमचे खिसे तपासतात तसे त्यांचेही खिसे तपासून बघा. हा तुमचाबही अधिकार आहे. जरे तपासणी अधिकाऱ्यांनी अडवलं तर त्या अधिकाऱ्यांची ओळखपत्रे तपासणे हाही तुमचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.
पण यंत्रणेलाही मला काही सांगायचं आहे. जशी तुम्ही माझी बॅग तपासली तशी नरेंद्र मोदी, अमित शाहा यांचीही बॅग तपासली का, ती तपासायला हवी की नको, दाढीवाल्या शिंदेंची बॅग तपासायला हवी की नको,गुलाबी जॅकेटवाले, देवेंद्र फडणवीस यांची बॅग तपासायला हवी की नको, असे अनेक प्रश्नही उद्धव ठाकरेंनी तपासणी अधिकाऱ्यांना विचारले.
हेही वाचा : एशियन पेंट्सचा शेअर 9.50 टक्क्यांनी घसरला, 2020 नंतर स्टॉकने पहिल्यांदा गाठली निच्चांकी
नरेंद्र मोदी महाराष्ट्रात सभेसाठी आल्यावर सर्व रस्ते बंद केले जातात, मग हे रस्त्याने सुसाट जातात. पण मोदी असो वा अमित शाह, फडणवीस असोत वा अजित पवार यांच्या बॅगा कधी तपासल्या का, त्या तपासल्या जाणार नसतील तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आता त्यांच्या बॅगा तपासतील.पण इथे पोलिसांनी मध्ये यायचं नाही. निव़डणूक अधिकाऱ्यांनी मध्ये मध्ये यायच नाही, आमच्या बॅग तपासण्याचा जसा तुम्हाला अधिकार आहे तसाच प्रचाराला जो कोणी येईन, त्याची बॅग तपासण्याच अधिकारही मतदारांना आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. म्हटलं आहे.






