Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati News: ‘काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, नाहीतर…’;अजित पवारांचा रोख नेमका कुणाकडे?

जेव्हा मी पहिल्यांदा कृष्णा खोरे महामंडळाचा मंत्री झालो, तेव्हा पुरंदर उपसा योजना राबवली होती. पुरंदर योजनेमुळे आपल्याला बाराही महिने पाणी उपलब्ध होणार आहे. तलावात थेट पाईप टाकू नका

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 13, 2025 | 03:10 PM
Baramati News: ‘काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, नाहीतर…’;अजित पवारांचा रोख नेमका कुणाकडे?
Follow Us
Close
Follow Us:

बारामती:  उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या विनोदी स्वभावामुळे आणि वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी बीड दौऱ्यावर युवा संवाद मेळाव्यात बोलताना चुलत्याच्या कृपेने सगळं बरं चाललंय असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळातही त्यांच्या या वक्तव्याची चर्चा रंगली होती. यानंतर आता थेट बारामतीत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा,” काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, असं वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे.

बारामतीमधील एका रस्त्याच्या कामासंदर्भात बोलताना अजित पवार यांनी “काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे काही चालत नाही,” असं वक्तव्य केलं. अजित पवार म्हणाले, “या रस्त्यांबाबत मी काका कुतवळ यांना सांगितलं आहे की आम्हाला सहकार्य करा, यासोबतच मी तहसीलदार, बीडीओ आणि स्थानिक पोलीस निरीक्षकांनाही आदेश दिलेत. मी त्यांना म्हटलं आहे की काकांनाही विश्वासात घ्या, लोकांना विश्वासात घ्या, त्याशिवाय पुढे जाता येत नाही. काका लोक म्हणजे काका कुतवळ यांना… नाहीतर ही माध्यमं लगेच चर्चा सुरू करतात, अजितदादा घसरले.. कोणावर घसरले यावर चर्चा होईल.”

Maharashtra Politics : मुंबईत ठाकरे गटाला खिंडार, प्रवक्त्याने सोडला पक्ष, या पक्षात करणार प्रवेश

पुढे बोलताना ते म्हणाले, “मी इथं अधिकाऱ्यांना घेऊन येण्यामागे एक कारण आहे. मुंबईत जर कुठला अधिकारी काही बोलला असेल तर मी ठामपणे सांगू शकतो की मी त्या ठिकाणी जाऊन आलोय. तुम्ही एअर कंडिशनमध्ये बसून निर्णय घेऊ नका. पूर्वी या भागात कुणालाही पाणी मिळत नव्हतं. तेव्हा तुम्ही म्हणाले होते की ‘आम्ही जमिनी देतो, आम्हाला पैसे नकोत, फक्त पाणी द्या.’ पण आता मात्र तुम्ही जमिनीचे पैसे मागत आहात. आम्ही आता बंद पद्धतीने पाईपलाइन टाकणार आहोत. जमिनीखाली तीन ते पाच फूट खोलीवर पाईपलाइन जाईल. त्यामुळे त्यावर शेती करणे शक्य होईल,” असंही अजित पवार यांनी पुढे स्पष्ट केलं.

अजित पवार म्हणाले, “जेव्हा मी पहिल्यांदा कृष्णा खोरे महामंडळाचा मंत्री झालो, तेव्हा पुरंदर उपसा योजना राबवली होती. पुरंदर योजनेमुळे आपल्याला बाराही महिने पाणी उपलब्ध होणार आहे. तलावात थेट पाईप टाकू नका, परकुलेशन झालेलं पाणी वापरा. काल छत्रपती शिवाजी महाराजांची ३४५ वी पुण्यतिथी होती. त्यानिमित्ताने आम्ही त्यांना अभिवादन केलं. फुले वाड्यात, जिथे सावित्रीबाई आणि महात्मा फुले वास्तव्यास होते, तिथेही मी भेट दिली. स्मारकासाठी मी महापालिकेला २०० कोटी रुपये दिले आहेत. नवीन नोकरी मिळाल्यानंतर त्या स्मारकाला भेट द्यायलाच हवी.

दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला विटाने मारहाण करून ऐवज लांबवला; पोलिसांना माहिती मिळताच…

काटेवाडीत राहत असताना मी स्वतः शेती करत होतो.पण खासदार झाल्यानंतर मुंबईला गेलो. प्रत्येक आमदाराला ५ वर्षांत २५ कोटी रुपये निधी मिळतो. पण मी १०० दिवसांत दीड हजार कोटींचा निधी आणला होता. जनावरांसाठी डॉक्टर असलेला दवाखाना उपलब्ध करून दिला आहे. एकजण मला म्हणाला, ‘दादा, आमचं कुत्रं आजारी पडलं होतं, आणि त्यावर खूप खर्च झाला.’ मी विचारलं, ‘किती?’ तर तो म्हणाला, ‘दीड लाख रुपये.’ मोठी माणसं असे खर्च करतात,” असंही अजित पवारांनी सांगितलं.

 

Web Title: Uncle you have to trust people otherwise who exactly does ajit pawars cash belong to

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2025 | 03:10 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Baramati Politics
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा
1

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले शुभसंकेत; दोन उमेदवारांची बिनविरोध निवड
2

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले शुभसंकेत; दोन उमेदवारांची बिनविरोध निवड

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
3

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

PMC Elections 2025 : पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून गुन्हेगारांना उमेदवारी; अजित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका
4

PMC Elections 2025 : पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून गुन्हेगारांना उमेदवारी; अजित पवारांनी स्पष्टपणे मांडली भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.