मुंबईत ठाकरे गटाला खिंडार, प्रवक्त्याने सोडला पक्ष, या पक्षात करणार प्रवेश
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. महायुतीने लोकसभेचा वचपा काढत घवघवीत यश मिळवलं. मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांना गळती लागली असून अद्यापही सावरता आलेलं नाही. विशेषत: शिवसेनेला (ठाकरे गट) गेल्या काही महिन्यांपासून धक्क्यावर धक्के बसत आहेत. आता मुंबईच्या प्रवक्त्या संजना घाडी यांनी पक्षाला रामराम ठोकला असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. महापालिका निवडणुकांआधी शिंदे गटाने मुंबईत खिंडार पाडल्यामुळे हा ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
संजना घाडी शिवसेनेच्या उपनेत्या होत्या. तसंच माजी नगरसेविका राहिलेल्या संजना घाडी ठाकरे गटाच्या महत्त्वाच्या नेत्या मानल्या जात होत्या. काही दिवसांपूर्वी पक्षाने प्रवक्त्यांची यादी जाहीर केली होती. मात्र या यादीतून संजना घाडी यांना वगळण्यात आलं होतं. शेवटच्या क्षणी त्यांचं नाव यादीत सवाविष्ट करण्यात आलं. त्यामुळे त्या नाराज असल्याचं सांगितलं जात होतं.
दरम्यान ठाकरे गटाला राम राम ठोकल्यानंतर संजना घाडी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तसा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यांचे पती संजय घाडी यांनीही ठाकरे गटातून बाहेर पडले असून तेही शिंदे गटात प्रवेश करणात आहेत.