Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

₹ २२.८४ कोटींच्या एसटीपी प्रकल्पाचा भोंगळ कारभार उघड! नदीत गाडलेल्या पाइप वाहून गेल्या, ६५% कामानंतरही प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात

वाई नगरपरिषदेच्या ₹२२.८४ कोटींच्या एसटीपी प्रकल्पातील ६५% काम पूर्ण झाले असले, तरी परवानग्यांचा अभाव, निधीची टंचाई आणि नदीपात्रातील पाइप वाहून गेल्याने हा प्रकल्प भ्रष्ट व भोंगळ कारभारामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 06, 2026 | 10:08 PM
₹ २२.८४ कोटींच्या एसटीपी प्रकल्पाचा भोंगळ कारभार उघड! नदीत गाडलेल्या पाइप वाहून गेल्या, ६५% कामानंतरही प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
Follow Us
Follow Us:

वाई शहरातील ₹२२ कोटी ८४ लाख ३९ हजार ३९३ रुपयांच्या सांडपाणी प्रक्रिया (एसटीपी) प्रकल्पातील कथित भोंगळ नियोजन आणि ठेकेदाराच्या गलथान कारभाराचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी नदीपात्रात तात्पुरत्या स्वरूपात सांडपाणी वळविण्यासाठी गाडण्यात आलेल्या पाइप थेट कृष्णा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याचे दृश्य सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पाहायला मिळाले. एवढ्या कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पात अशा प्रकारे पाइप वाहून जाणे म्हणजे कामाच्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले आहे. याहून गंभीर बाब म्हणजे नदीपात्रात बसविण्यात आलेले कोरीव दगडी बांधकामही वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोट्यवधींचा खर्च करूनही प्रकल्पाची गुणवत्ता आणि सुरक्षितता धोक्यात आल्याचा आरोप होत आहे.
शहरातील सांडपाणी व्यवस्थेचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत मंजूर झालेल्या या प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने ४ मार्च २०२४ रोजी प्रशासकीय मंजुरी दिली होती. जुलै २०२४ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मात्र आजघडीला केवळ सुमारे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित ३५ टक्के काम रखडले आहे.

हा प्रकल्प अहमदाबादस्थित मिरल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमार्फत राबविला जात असून, सोनगीरवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या एसटीपी प्लांटचे फाउंडेशन तब्बल १७ ते १८ फूट खोल करण्यात आले असल्याचे पालिकेच्या बांधकाम विभागाने सांगितले आहे. शहरभर ६ इंच ते ४ फूट व्यासाच्या पाइपलाइनचे जाळे उभारले जाणार असून त्याचे डिझाइन CPHEEO च्या निकषांनुसार तयार करण्यात आल्याचा दावा प्रशासन करत आहे.

FDA ची मोठी कारवाई! राज्यात कृत्रिम दूध भेसळ रॅकेटवर सर्वात मोठा प्रहार; पाच जिल्ह्यांत धाडी, ₹1.48 कोटींचा मुद्देमाल जप्त

मात्र प्रत्यक्ष कामकाजात अनेक गंभीर त्रुटी समोर येत आहेत. मूळ आराखड्यानुसार नावेचीवाडी येथून पाइपलाइनचे काम सुरू होणे अपेक्षित असताना तो भाग ‘खड्ड्यात’ दाखवून कामाचा मार्ग बदलत साठे मंगल कार्यालय परिसरातून काम सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या नियोजनावरच प्रश्न उपस्थित होत आहेत.

कृष्णा नदीच्या दोन्ही तीरांवर म्हणजे सोनगीरवाडी आणि रविवार पेठ स्मशानभूमी परिसरात एसटीपी प्रकल्पासाठी आरक्षण आहे. सोनगीरवाडी येथील वनारसे यांच्या जागेचा ताबा पालिकेला मिळाला असला तरी रविवार पेठ येथील नेवसे यांच्या जागेचा ताबा अद्याप तांत्रिक कारणांमुळे मिळालेला नाही. त्यामुळे भुयारी गटार योजना आणि दुसरा एसटीपी प्रकल्पही रखडल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार ही जागा मिळाल्यास भविष्यात सांडपाणी उचलण्याचा अतिरिक्त खर्च वाचणार असून संपूर्ण व्यवस्था अधिक कार्यक्षम होईल. दरम्यान, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधीच उपलब्ध नसल्याचे वास्तवही समोर आले आहे. पालिकेकडे सुमारे साडेआठ कोटी रुपयांची तरतूद झाल्याशिवाय उर्वरित काम पूर्ण होणे कठीण असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे निधीअभावी प्रकल्प अर्धवट राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Kalyan News : टिटवाळा-बल्ल्यानी रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड; मुसळधार पावसाने वाहतूक धोक्यात, प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप

“एनओसी नाही, टाउन प्लॅनिंगची परवानगी नाही; फक्त प्लांट उभारून बिले काढायची का?” नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात. नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी एसटीपी प्रकल्पावर गंभीर आरोप करत प्रशासनाच्या निर्णयांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “प्रशासकीय काळात झालेल्या चुकीच्या निर्णयांची चौकशी करण्यासाठी सीए नेमला असून त्यावर कार्यवाही सुरू आहे. एसटीपी प्रकल्पासाठी आम्ही हरित लवादापर्यंत गेलो. सर्व विभागांच्या आवश्यक एनओसी घेतलेल्या नाहीत. टाउन प्लॅनिंग विभागाची परवानगीही घेतलेली नाही. उभारण्यात येणाऱ्या एसटीपी प्लांटला भक्कम बेस नसल्याचा आमचा आरोप आहे. नावेचीवाडी खड्ड्यात दाखवून तेथून पाइपलाइन न नेता साठे मंगल परिसरातून काम सुरू करण्यात आले. फक्त प्लांट उभारून बिले काढायची का? ठेकेदाराकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळत नाही. पालिकेकडे साडेआठ कोटी रुपयांची तरतूद झाल्याशिवाय हा प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही. प्रशासकीय काळात कन्सल्टंटला ६० लाख रुपये देण्यात आले, मग उर्वरित सात कोटींचा निधी मंजूर करून का आणला नाही? यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयाचेही मार्गदर्शन घेतले आहे.”
नगराध्यक्षांच्या या आरोपांमुळे एसटीपी प्रकल्पाच्या दर्जा, निधी, परवानग्या आणि नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, कोट्यवधी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अखेर शहराला दिलासा देणार की भ्रष्ट व भोंगळ कारभाराचे आणखी एक उदाहरण ठरणार, याकडे आता वाईकरांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Vaai nagarparishad stp project fraud marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 10:08 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

Cyber Crime: सायबर फसवणुकीला बळी पडू नका! ‘डिजिटल अरेस्ट’बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
1

Cyber Crime: सायबर फसवणुकीला बळी पडू नका! ‘डिजिटल अरेस्ट’बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Shrikant Shinde: Gen Z साठी शिवसेनेचा नवा प्लॅन! स्पर्धा परीक्षा केंद्रांसह लोकप्रतिनिधींकडे फेलोशिपची संधी
2

Shrikant Shinde: Gen Z साठी शिवसेनेचा नवा प्लॅन! स्पर्धा परीक्षा केंद्रांसह लोकप्रतिनिधींकडे फेलोशिपची संधी

SIR Voter List: SIRमध्ये मोठी तफावत! तब्बल ४.६४ लाख मतदारांचा पत्ता नाही! ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी होणार जाहीर
3

SIR Voter List: SIRमध्ये मोठी तफावत! तब्बल ४.६४ लाख मतदारांचा पत्ता नाही! ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी होणार जाहीर

Dombivli News: डोंबिवलीतील माणगावमध्ये चाळींवर जेसीबी; रहिवासी-विकासक आमनेसामने, मालकी हक्कावरून वाद
4

Dombivli News: डोंबिवलीतील माणगावमध्ये चाळींवर जेसीबी; रहिवासी-विकासक आमनेसामने, मालकी हक्कावरून वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.