Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाळवण महोत्सव : पालिकेच्या सर्व वॉर्ड ऑफिसमध्ये या तारखेपासून रंगणार उन्हाळी फराळाची मेजवानी

महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईतील सर्व वॉर्ड कार्यालयांमध्ये ‘वाळवण महोत्सव 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसांत घराघरांत तयार केले जाणारे पदार्थ इथे विक्रीसाठी भरवले जातील.

  • By नुपूर भगत
Updated On: May 09, 2026 | 10:42 AM
वाळवण महोत्सव : पालिकेच्या सर्व वॉर्ड ऑफिसमध्ये या तारखेपासून रंगणार उन्हाळी फराळाची मेजवानी

वाळवण महोत्सव : पालिकेच्या सर्व वॉर्ड ऑफिसमध्ये या तारखेपासून रंगणार उन्हाळी फराळाची मेजवानी

Follow Us
Follow Us:
  • मुंबईतील सर्व वॉर्ड ऑफिसमध्ये ‘वाळवण महोत्सव’ भरवला जाणार आहे.
  • पापड, कुरडई, लोणचे, मसाले आणि अनेक घरगुती पदार्थांची विक्री आणि प्रदर्शन होणार आहे.
  • महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देत महिला उद्योजकतेला चालना देण्याचा उपक्रम आहे.
उन्हाळा आला की घराघरांत पापड, कुरडई आणि मसाल्यांचे वेध लागतात. हीच पारंपरिक चव आता थेट मुंबईकरांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागातर्फे विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. महिला सक्षमीकरणाचा भाग म्हणून येत्या ११ आणि १२ मे २०२६ रोजी मुंबईतील सर्व प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्ये वाळवण महोत्सव २०२६-सुगंध उन्हाळ्याचा’ आयोजित करण्यात आला आहे.

तब्बल ४ लाख हेक्टर क्षेत्रावर होणार पेरणी! कृषी विभागाकडून नियोजन; शेतकऱ्यांचे सोयाबीनकडे कल

खास ‘टेस्टिंग काउंटर’ उपलब्ध

महिला आणि बालकल्याण समितीच्या अध्यक्षा मीनल तुर्डे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या महोत्सवात महिला बचत गटांनी तयार केलेल्या घरगुती साठवणीच्या पदार्थाचे प्रदर्शन व विक्री केली जाईल, यामध्ये शेवया, पापड, कुरडई, लोणचे, मेथकूट, तिळकूट, डांगर, सांडगे, सुक्की मच्छी आणि विविध घरगुती मसाले मिळणार आहेत. तसेच, गहू, तांदूळ, नाचणी आणि बटाट्यापासून बनवलेले कुरकुरीत पदार्थ, सांडगी मिरची आणि ताज्या कैरीचे लोणचे हे आकर्षण असणार आहे. तसेच, यावेळी ग्राहकांना पदाथांची चव पाहण्यासाठी खास ‘टेस्टींग काउंटर’ उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मीनल तुर्डे, अध्यक्षा, महिला व बालकल्याण समिती आणि डॉ. प्राची जांभेकर यांनी मुंबईकरांना आपल्या पारंपरिक उन्हाळी खाद्यसंस्कृतीचा आनंद घेण्यासाठी आणि महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी या महोत्सवाला मोठ्या संख्येने भेट द्यावी अशी विनंती केली आहे.

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीची रिक्त जागा कोणाला? भुजबळांच्या माघारीमुळे पेच वाढणार

महिला उद्योजकतेला बळ

दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
या माध्यमातून महिलांच्या हातातील सुगरण चव मुंबईकरांपर्यंत पोहोचणार असून त्यांच्या उद्योजकतेला मोठी चालना मिळणार आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Valvan mahotsav 2026 a feast of summer delicacies set to unfold at all municipal ward offices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai News
  • Summer

संबंधित बातम्या

Mumbai News: सर्पदंशाचे मृत्यू निम्म्यावर आणण्यासाठी रोडमॅप! सर्पदंशापासून उपचारापर्यंतची संपूर्ण साखळी मजबूत करण्यावर भर
1

Mumbai News: सर्पदंशाचे मृत्यू निम्म्यावर आणण्यासाठी रोडमॅप! सर्पदंशापासून उपचारापर्यंतची संपूर्ण साखळी मजबूत करण्यावर भर

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
2

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
3

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
4

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.