Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahadevi Elephant: ‘माधुरी’ परत येणार? वनताराने भेट घेताच CM फडणवीस म्हणाले, “… त्यांनी आश्वस्त केले आहे”

Devendra Fadnavis: कोल्हापूरच्या नांदणी माठातील माधुरी हत्तीणीला वनतारा येथे नेल्यानंतर कोल्हापूरचे नागरिक आक्रमक झाले आहेत. आम्हाला आमची माधुरी परत द्या अशी मागणी केली जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 06, 2025 | 04:24 PM
Mahadevi Elephant: 'माधुरी' परत येणार? वनताराने भेट घेताच CM फडणवीस म्हणाले, "... त्यांनी आश्वस्त केले आहे"

Mahadevi Elephant: 'माधुरी' परत येणार? वनताराने भेट घेताच CM फडणवीस म्हणाले, "... त्यांनी आश्वस्त केले आहे"

Follow Us
Follow Us:

मुंबई: कोल्हापूरच्या नांदणी माठातील माधुरी हत्तीणीला वनतारा येथे नेल्यानंतर कोल्हापूरचे नागरिक आक्रमक झाले आहेत. आम्हाला आमची माधुरी परत द्या अशी मागणी केली जात आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात एक बैठक देखील घेतली. तर आज वनताराच्या टीमने देखील मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

महाराष्ट्र शासन न्यायालयात माधुरी हत्तीणीबाबत पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. दरम्यान आज वनताराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आहे . महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता, असे वनताराने स्पष्ट केले आहे. याबाबत महाराष्ट्र सरकाच्या पुनर्विचार याचिकेत वनतारा देखील सहभागी होणार असल्याचे समजते आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांची पोस्ट काय?

वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत मी आज मुंबईत सविस्तर चर्चा केली. महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मला आश्वस्त केले आहे. या चर्चेदरम्यान त्यांनी मला सांगितले की, आम्ही केवळ मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता.

वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत मी आज मुंबईत सविस्तर चर्चा केली.
महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मला आश्वस्त केले आहे.
या… pic.twitter.com/GOSc9ovVVM
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 6, 2025

 

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनताराने दर्शविली आहे. विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

माधुरी हत्तीणीला वनतारा येथे नेण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार हत्तीणीला तिकडे नेण्यात आले आहे. मात्र यामुळे कोल्हापूरकर आक्रमक झाले आहेत. आम्हाला आमची माधुरी परत द्या अशी ते मागणी करत आहे. कोल्हापूरचे सर्वपक्षीय राजकारणी देखील यासाठी एकत्रित आले आहेत. हजारो नागरिकांनी अंबानी यांच्या जिओवर बॅन घालण्यास सुरुवात केली आहे. हजारोंच्या संख्येने जिओचे सिमकार्ड दुसऱ्या कंपनीत पोर्ट करण्यात आले आहे. तसेच नांदणी गावातील जिओचा तोवर देखील बंद करावा अशी मागणी पत्राद्वारे ग्रामपंचायतीला करण्यात आल्याचे समजते आहे.

Mahadevi Elephant: ‘माधुरी ऊर्फ महादेवी’ हत्तीणीला परत आणण्यासाठी मोहिमेला वेग; वनताराचे CEO कोल्हापुरात दाखल

माधुरीला रवाना करताना नांदणी गावकऱ्यांनी भावनिक निरोप दिला होता. तिला निरोप देताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते. गावकऱ्यांनी माधुरी हत्तीणीला वनतारा अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली. पण यानंतर कोल्हापुरसह राज्यभरात वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यभरातून माधुरी हत्तीणीला परत आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हत्तीणी माधुरीला परत आणण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात मोहीम उभारण्यात आली आहे.

Web Title: Vantara ceo meet cm devendra fadnavis for return mahadevi madhuri elepahnt nandni math kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2025 | 04:22 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • kolhapur
  • Madhuri Elephant
  • vantara

संबंधित बातम्या

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला
1

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी
2

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
3

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

8 वर्षांची प्रतीक्षा संपली; पिंपरी-चिंचवड पोलिसांना मुख्यालयासाठी मिळाली 50 एकर जागा
4

8 वर्षांची प्रतीक्षा संपली; पिंपरी-चिंचवड पोलिसांना मुख्यालयासाठी मिळाली 50 एकर जागा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.