Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवबंधन बांधताच वसंत मोरेंचा ठाकरेंना शब्द; ’25 नगरसेवक निवडून आणून दाखवतो’

लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेतून वंचितमध्ये गेलेल्या वसंत मोरेंनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर वसंत मोरेंचा पक्षप्रवेश पार पडला. वसंत मोरेंनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर पहिली प्रतिक्रीया दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 09, 2024 | 03:03 PM
शिवबंधन बांधताच वसंत मोरेंचा ठाकरेंना शब्द; ’25 नगरसेवक निवडून आणून दाखवतो’
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेतून वंचितमध्ये गेलेल्या वसंत मोरेंनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर वसंत मोरेंचा पक्षप्रवेश पार पडला. वसंत मोरेंनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर पहिली प्रतिक्रीया दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करुन वसंत मोरेनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

25 नगरसेवक निवडून आणणार

1992 मध्ये शिवसेनेत सामील झालो. वयाच्या 31 व्या वर्षापर्यंत विभाग प्रमुख झालो. नंतर मनसेत गेलो. आता शिवसेनेत आलोय. पुणे शहरात भविष्यात किमान 25 नगरसेवक निवडून आणणार, असा शब्द वसंत मोरेंनी उद्धव ठाकरेंना दिला. मनसे पदाधिकारी माझ्या सोबत आल्याचे वसंत मोरे म्हणाले.

शिवसेनेची ताकद वाढणार – राऊत

वसंत मोरे आता खूप पुढे आले आहेत. ते मातोश्री पर्यंत पोहचले आहेत. त्यांना आहेत तिथेच थांबवू. तात्या लोकसभा निवडणूक लढले. मातोश्री हे त्यांचे शेवटचं डेस्टिनेशन आहे. ते जुने शिवसैनिक आहेत, असे यावेळी शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. वसंत मोरेंना उद्धव ठाकरेंनी आशीर्वाद दिले आहेत. ते शिवसेनेत आल्यामुळे पुणे खडकावसला येथे शिवसेनेची ताकद वाढणार आहे. आपण सर्वांनी मिळून पुण्यातली शिवासेना पुढे नेऊया, असे आवाहन त्यांनी केले.

वसंत मोरेंचा पदाधिकाऱ्यांसोबत प्रवेश

दरम्यान वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला रामराम केला. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न केले होते. शरद पवार यांची भेटही घेतली होती. मात्र, ही जागा कॉंंग्रेसकडे गेल्याने येथून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली. पण, त्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आज वसंत मोरेंसोबत मनसेचे १७ शाखाअध्यक्ष, ५ उपविभाग अध्यक्ष, १ शहराध्यक्ष, पर्यावरण सेनेचे अनेक पदाधिकारी, वाहतूक सेनेचे पदाधिकारी, माथाडीचे पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यामुळे पुण्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे.

Web Title: Vasant mores words to thackeray as soon as shivbandhan was tied nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2024 | 03:02 PM

Topics:  

  • maharashtra
  • shivsena
  • Uddhav Thackeray
  • Vasant more

संबंधित बातम्या

गणेश नाईक अडचणीत! ‘बिबट्याची आणि हरणाची पिल्ले पाळली होती’ या वक्तव्यावरून शिंदे गटाचे किशोर पाटकर संतप्त
1

गणेश नाईक अडचणीत! ‘बिबट्याची आणि हरणाची पिल्ले पाळली होती’ या वक्तव्यावरून शिंदे गटाचे किशोर पाटकर संतप्त

मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबत काँग्रेसची भूमिका काय? ‘या’ बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं
2

मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबत काँग्रेसची भूमिका काय? ‘या’ बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं

SSC-HSC exam 2026 Schedule: पोरांनो तयारीला लागा! दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर; एका क्लिकवर पाहा वेळापत्रक
3

SSC-HSC exam 2026 Schedule: पोरांनो तयारीला लागा! दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर; एका क्लिकवर पाहा वेळापत्रक

“राष्ट्रीय आपत्ती – शेतकऱ्यांची पराधीनता”, शेतकरी आत्महत्या कधी सुरु झाल्या? वाचा सविस्तर
4

“राष्ट्रीय आपत्ती – शेतकऱ्यांची पराधीनता”, शेतकरी आत्महत्या कधी सुरु झाल्या? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.