Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वसंत मोरे यांचे राजकारण आयाराम-गयाराम; पक्ष सोडल्याने प्रकाश आंबेडकर आक्रमक

पुण्याचे नेते वसंत मोरे हे लवकरच शिवसेना ठाकरे गटामध्ये जाणार आहेत. त्यांच्या येत्या मंगळवारी शिवबंधन बांधून जाहीर प्रवेश होणार आहे. त्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोरेंवर निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 05, 2024 | 03:12 PM
शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे वसंत मोरेंवर प्रकाश आंबेडकर यांच्यावर आक्रमक

शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे वसंत मोरेंवर प्रकाश आंबेडकर यांच्यावर आक्रमक

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुण्यातील नेते वसंत मोरे यांच्या राजकारणामुळे चर्चा रंगल्या आहेत. वसंत मोरे यांनी वंचित बहुजन पक्षाला रामराम ठोकत शिवसेना ठाकरे गटाची साथ धरली आहे. वसंत मोरे व ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट झाली. यानंतर ते लवकरच ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. येत्या मंगळवारी वसंत मोरे यांचा शिवसेना ठाकरे गटामध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. त्यामुळे पूर्वी वंचित पक्षामध्ये असणाऱ्या वसंत मोरेंवर प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर वसंत मोरे यांनी वंचितच्या कार्यकर्त्यांवर निशाणा साधला. वसंत मोरे म्हणाले होते की, वंचित आघाडीच्या लोकांनी मला स्वीकारले नाही. अनेक लोकांनी निवडणुकीत माझे काम देखील केले नाही. लोकसभा निवडणुकीत सर्वांनी काम केले असते तर लोकसभेच्या निवडणुकीचे चित्र वेगळे असते. प्रकाश आंबेडकर यांना अपेक्षित असा पक्ष ते उभा करू शकले नाहीत, असा आरोप वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीवर केला होता. यावर प्रत्युत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, वसंत मोरे यांचे राजकारण आयाराम गयाराम असे आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

वसंत मोरे यांचे राजकारण

लोकसभा निवडणूकीपूर्वी वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर महाविकास आघाडीसोबत त्यावेळी बोलणी केली होती. मात्र ती बोलणी फिस्कटली. यानंतर लोकसभा निवडणुकीला वसंत मोरे अपक्ष म्हणून उभे राहिले होते. वंचितने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी वंचितचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. लोकसभेमध्ये मात्र वसंत मोरे यांचा दारुण पराभव झाला आणि डिपॉझिट देखील जप्त झाले. यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वसंत मोरे यांनी वंचितची साथ सोडत शिवबंधन हाती बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे पुण्यातील वंचित कार्यकर्ते आक्रमक देखील झाले आहेत.

Web Title: Vba leader prakash ambedkar angree on vasant more for joining shivsena thackeray group nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2024 | 03:12 PM

Topics:  

  • Pune Politics
  • Uddhav Thackeray
  • Vasant more

संबंधित बातम्या

Ajit Pawar News: अजित पवार अनपेक्षित निर्णय घेण्याच्या तयारीत; पुण्यातल्या बैठकीत नेमकं झालं काय?
1

Ajit Pawar News: अजित पवार अनपेक्षित निर्णय घेण्याच्या तयारीत; पुण्यातल्या बैठकीत नेमकं झालं काय?

“आरक्षणाची न्यायालयीन लढाई हरणाऱ्यांना मराठ्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही”, एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती टीका
2

“आरक्षणाची न्यायालयीन लढाई हरणाऱ्यांना मराठ्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही”, एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती टीका

Uddhav Thackeray News: ‘मी आज देवेंद्र फडणवीसांना फोन करणार’; उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंचे सूचक विधान
3

Uddhav Thackeray News: ‘मी आज देवेंद्र फडणवीसांना फोन करणार’; उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंचे सूचक विधान

“ठाकरे हे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत…फडणवीस नाहीत; खासदार संजय राऊत स्पष्टच म्हणाले
4

“ठाकरे हे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत…फडणवीस नाहीत; खासदार संजय राऊत स्पष्टच म्हणाले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.