Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RSS आणि BJP हे खोटारडं संघटन; प्रकाश आंबेडकरांचे सरसंघचालकांना दिले ऑपन चॅलेंज

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप व भाजपची मातृसंस्था असलेल्या आरएसएसवर निशाणा साधला आहे. नागपूरमध्ये माध्यामांशी संवाद साधताना सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर देखील प्रकाश आंबेडकर यांनी परखड भाष्य केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 04, 2024 | 05:08 PM
Prakash Ambedkar targets BJP and RSS

Prakash Ambedkar targets BJP and RSS

Follow Us
Follow Us:

नागपूर : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी पार्टी देखील ॲक्शन मोडमध्ये आली आहे. निवडणूक आयोगाने अद्याप कार्यक्रम जाहीर केला नसला तरी दिवाळीनंतर राज्याची विधानसभा निवडणूक होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नेत्यांचे दौरे वाढले आहेत. पक्षांतर आणि आरोप प्रत्यारोप देखील वाढले आहेत. आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप व आरएसएस हे खोटारडे संघटन असल्याचा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

कोर्टातील याचिका मागे घेतली का?

नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर जातीय जनगणनेवरुन महायुती व भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, “भाजप व आरएसएस यांच्यासारखे खोटारडे संघटन कुठेच नाही. त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही जातीय जनगणना करुच शकत नाही. करणार नाही, या आशयाची याचिका दाखल केली आहे. आता झारखंड, हरियाणा, महाराष्ट्रातील निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन ओबीसी समाजाला जवळ करण्यासाठी आम्ही जातीय जनगणना करण्यास तयार आहोत. मात्र, त्याचा राजकारणासाठी वापर होऊ नये असं म्हणत आहेत, असा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला. यावरुन त्यांनी मोहन भागवत यांना देखील निशाण्यावर धरलं. प्रकाश आंबेडकर म्हणाले, माझं मोहन भागवतांना चॅलेंज आहे की, तुम्ही कोर्टात दिलेली याचिका मागे घेतली का? याचा खुलासा आधी करावा,” असे ऑपन चॅलेंज प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे.

आम्ही सांगितलेले चूक असेल तर…

राज्यामध्ये सध्या एसटीचा संप सुरु आहे. आज संपाचा दुसरा दिवस असून सणासुदीचा काळ असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “या आंदोलनाचा मोठा फटका प्रवाशांना बसतो आहे. मागच्यावेळी काय मागायला पाहिजे हा तोडगा आम्ही त्यांच्यापुढे मांडला होता. पण एसटी कामगारांना तो तोडगा मान्य नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवशाही बसेस चालविल्या त्यावेळी डिझेल 56 रुपयांच्यावर झालं तर एसटी महामंडळ भरेल, असा करार झाला होता. त्या विरोधात तुम्ही आवाज उठवा, आज डिझेल 90 रूपये आहे. मालक 56 भरतो त्याचं बजेट सांगा. एसटी महामंडळात चाललेलं भ्रष्टाचार हे बाहेर काढत नसतील. त्यामुळे त्यांच्याच नोकऱ्यावर गदा येणार, हे तेव्हा ही मी सांगितले होते. आम्ही सांगितलेले चूक असेल तर चूक आहे म्हणा,” असे मत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मांडले आहे.

Web Title: Vba leader prakash ambedkar targets bjp and rss over caste wise census

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 05:08 PM

Topics:  

  • BJP
  • Prakash Ambedkar
  • RSS

संबंधित बातम्या

२४x७ पाणीपुरवठ्यावर १,६०० कोटी खर्च, तरी पाणीगळती सुरु; अमोल बालवडकरांचा भाजपवर निशाणा
1

२४x७ पाणीपुरवठ्यावर १,६०० कोटी खर्च, तरी पाणीगळती सुरु; अमोल बालवडकरांचा भाजपवर निशाणा

Sangli District Bank: २७ वर्षांनंतर जिल्हा बँकेवर काँग्रेसचा अध्यक्ष; महेंद्र लाड यांची बिनविरोध निवड
2

Sangli District Bank: २७ वर्षांनंतर जिल्हा बँकेवर काँग्रेसचा अध्यक्ष; महेंद्र लाड यांची बिनविरोध निवड

Ramdas Athawale : रामदास आठवलेंची महायुतीवर नाराजी! ‘काँग्रेससोबत असताना जागा मिळत होत्या, आता भाजपकडून दुर्लक्ष’
3

Ramdas Athawale : रामदास आठवलेंची महायुतीवर नाराजी! ‘काँग्रेससोबत असताना जागा मिळत होत्या, आता भाजपकडून दुर्लक्ष’

Congress on Ashish Shelar : ‘राहुल गांधींवर बोलण्याआधी SIR समजून घ्या! आशिष शेलारांना SIR चा कारभारच माहिती नाही?’ काँग्रेसची टीका
4

Congress on Ashish Shelar : ‘राहुल गांधींवर बोलण्याआधी SIR समजून घ्या! आशिष शेलारांना SIR चा कारभारच माहिती नाही?’ काँग्रेसची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.