अकलुज : दूध दर कपातीवरून राज्यातला शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 35 रुपयांच्या आत दूध खरेदी करणार नाही, असा जीआर काढून सुद्धा दुधाचे भाव पाडले गेले. दुधाच्या दरासाठी समिती नेमली गेली. दर तीन महिन्यांनी या समितीने बैठक घेऊन दुधाची वाढ करणे, असे ठरले असताना ते दूध दर समिती कुणाच्या ताटाखालची मांजर बनली आहे का ? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. सदर कपातीवरून रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा खरपूस समाचार घेतला.
राज्यामध्ये दुधाचे उत्पादन कमी असताना दुधाचे भाव गगनाला भिडायला पाहिजे होते, मात्र हे सरकारचं उरफाट उलट धोरण दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मानगोटी वरती बसलेला आहे. भीक नको पण कुत्रा आवर अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे. पशुखाद्याच्या किमती वाढल्या चाऱ्याच्या किमती वाढल्या. दवाखान्याचा खर्च वाढला, अशा परिस्थितीमध्ये दूध धंदा कसा काय करायचा कसा ? असं जर दूध दराची कपात होत राहिली तर शेतकरी दूध धंदा बंद करेल मग काय भेसळयुक्त दुध जनता खाणार का ? राज्यामध्ये भेसळीचे प्रमाण वाढेल. यामुळे लहान मुले वयोवृद्ध यांचे आजार वाढतील. याचा फटका सर्वसामान्य माणसाला बसेल सरकारने तातडीने दूध धंद्यामध्ये लक्ष घालावे अन्यथा दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय रहाणार नाही, असे खोत यांनी सांगितले
शेतकऱ्यांची खिल्ली उडवली
गेल्या पाच महिन्यापासून दुधाचे भाव दहा रुपयांनी जाणीवपूर्वक पाडण्यात आले काहीही कारण नसताना कशासाठी दुधाचे भाव कमी केले याचे उत्तर सरकारने द्यावे जे ३५ रुपये दुधाला देणार होता, त्याचं काय झाले दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी खोटा जीआर काढून राज्यातील शेतकऱ्यांची खिल्ली उडवली. चेष्टा केली आहे. परंतु शेतकरी गाई म्हशीच शेण तुमच्या तोंडात घातल्याशिवाय स्वस्त रहाणार नाही, असे राज्य प्रवक्ते राहुल बिडवे यांनी सांगितले.