Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज ६ राज्यात विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी मतदान

  • By Pooja Pawar
Updated On: Nov 03, 2022 | 08:43 AM
आज ६ राज्यात विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी मतदान
Follow Us
Close
Follow Us:

आज ३ नोव्हेंबर रोजी देशातील सहा राज्यांतील विधानसभेच्या ७ जागांसाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील मुंबई अंधेरी पूर्व मतदारसंघाची पोटनिवडणूकीचा देखील समावेश आहे.

महाराष्ट्राच्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मागील काळात अनेक घडामोडी घडल्या होत्या. ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. तर त्यांच्या विरोधात ६ उमेदवार रिंगणात असून त्यापैकी चार उमेदवार अपक्ष आहेत. या जागेवर भाजपने देखील उमेदवार जाहीर केला होता. त्यानंतर राज्याच्या राजकारणासह अंधेरी पोटनिवडणुकी संदर्भात अनेक नाट्यमयी घडामोडी पाहायला मिळाल्या. या पोटनिवडणुकीत मुख्य लढत ही ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजप-शिंदे गट महायुतीचा उमेदवार मुरजी पटेल यांच्यात होती. मात्र राजकीय समजुती दाखवत भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली.

बिहारमध्ये भाजपची थेट लढत नितीश-तेजस्वी यांच्या महाआघाडीशी आहे. त्यानंतर तेलंगणात केसीआरच्या टीआरएसपासून आपली जागा वाचवण्याचं सर्वात मोठं आव्हान भाजपसमोर आहे. इतर राज्यांमध्येही प्रादेशिक पक्ष भाजपला अडचणीत आणणार आहेत. हरियाणातील आदमपूर विधानसभा मतदारसंघ हा पाच दशकांपासून भजनलाल घराण्याचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे भाजप हा गड आपल्या ताब्यात घेण्यात यशस्वी होणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. आज होणाऱ्या पोटनिवडणूकीत उत्तर प्रदेशमधील गोळा गोकर्णनाथ, हरियाणातील आदमपूर , बिहारमधील मोकाम आणि गोपाळगंज, महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व , तेलंगाणातील मुनुगोडे आणि ओदिशातील धामनगर इत्यादी मतदार संघांचा देखील समावेश आहे.

उत्तर प्रदेशातील गोळा गोकर्णनाथ विधानसभा मतदारसंघ भाजपचे आमदार अरविंद गिरी यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. अरविंद गिरी हे तीन वेळा समाजवादी पक्षाचे आमदारही होते. भाजपमध्ये येताना ते दोनदा विधानसभेवर निवडून गेले होते. कुलदीप बिश्नोई यांनी हरियाणाच्या आदमपूर मतदारसंघातून राजीनामा दिला होता. काँग्रेस सोडून ते भाजपमध्ये गेले, त्यानंतर ही जागा रिक्त झाली. आरजेडीचे अनंत सिंह हे बिहारमधील मोकामा मतदारसंघातून आमदार होते पण एके- ४७ बाळगल्याच्या आरोपावरून त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे.

 

Web Title: Voting for assembly by elections in 6 states today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2022 | 08:43 AM

Topics:  

  • BJP
  • Rutuja Latke
  • shivsena

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.