Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाई शहरात साथीच्या रोगांचे सावट, नगरपरिषदेच्या निष्क्रियतेवर नागरिक संतप्त

वाई शहरात अस्वच्छता आणि तुंबलेल्या गटाऱ्यांमुळे साथीच्या रोगांचा धोका वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. स्वच्छता मोहीम, फॉगिंग आणि प्रतिबंधात्मक उपाय तातडीने राबवावेत, अशी मागणी नागरिकांसह माजी नगरसेवक चरण गायकवाड यांनी केली आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 06, 2026 | 10:01 PM
वाई शहरात साथीच्या रोगांचे सावट, नगरपरिषदेच्या निष्क्रियतेवर नागरिक संतप्त

वाई शहरात साथीच्या रोगांचे सावट, नगरपरिषदेच्या निष्क्रियतेवर नागरिक संतप्त

Follow Us
Follow Us:

वाई : वाई शहरात अनेक वर्षांपासून गटारे तुंबणे, सांडपाणी रस्त्यावर वाहणे आणि अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे साथीच्या रोगांचा धोका सातत्याने वाढत आहे. डेंगू, मलेरिया, चिकुनगुनिया आणि इतर संसर्गजन्य आजारांनी नागरिकांचे जीवन असुरक्षित झाले असताना, वाई नगरपरिषदेची निष्क्रियता आता नागरिकांच्या रोषाचे कारण ठरत आहे.

शहरातील अनेक भागांत गटारे तुंबल्याने सांडपाणी थेट रस्त्यांवर वाहत आहे. ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचल्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होत असून, साथीच्या रोगांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर परिस्थितीकडे नगरपरिषदेचे अधिकारी, नगराध्यक्ष आणि लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

रोगराई रोखण्यासाठी आवश्यक असलेली फॉगिंग, जंतुनाशक औषधांची फवारणी, ब्लीचिंग पावडर टाकणे, गटारांची तातडीने साफसफाई, साचलेले पाणी हटवणे आणि प्रतिबंधात्मक जनजागृती अशा मूलभूत उपाययोजना अद्याप प्रभावीपणे राबविल्या गेल्या नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

Pune: MH-12 ची मालिका संपली! पुण्यात आता वाहनांवर MH-12 1A सिरीज! गाड्यांच्या वाढत्या संख्येमुळे पुण्यात नवीन नंबर सिरीज

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, डेंगूसारख्या प्राणघातक आजारामुळे अनेक कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत. अनेक संसार उद्ध्वस्त झाले, तरीही प्रशासनाला जाग आलेली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया वाईकर व्यक्त करत आहेत.

“प्रत्येक वॉर्डातील नगरसेवकांनी आपल्या भागातील गटारे, स्वच्छता आणि रोगप्रतिबंधक उपायांची जबाबदारी का पार पाडली नाही? नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार लोकप्रतिनिधींना कोणी दिला?” असा संतप्त सवाल आता वाईकर नागरिक विचारू लागले आहेत.

नागरिकांचे स्पष्ट मत आहे की, हजारो नागरिक साथीच्या रोगांच्या विळख्यात सापडण्यापूर्वीच नगरपरिषद प्रशासनाने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवावी. सर्व गटारे तातडीने साफ करावीत, फॉगिंग व औषध फवारणी नियमित करावी, पाण्याची डबकी त्वरित हटवावीत आणि प्रत्येक वॉर्डात विशेष आरोग्य पथके कार्यरत करावीत.

वाई शहराला रोगमुक्त करण्यासाठी प्रशासनाने केवळ बैठका आणि कागदी घोषणा न करता प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करावे. अन्यथा साथीच्या रोगांचा उद्रेक झाल्यास त्याची संपूर्ण नैतिक व प्रशासकीय जबाबदारी वाई नगरपरिषद, संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींवर राहील, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये घुसले अमेरिकेचे कमांडो, सगळेच घाबरले; नेमकं काय घडलं?

दरम्यान, वाई शहराच्या विकासासाठी राज्याचे मंत्री मकरंद पाटील यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून शहरातील मूलभूत सुविधांना प्राधान्य दिल्याचे माजी नगरसेवक आणि वाई नगर परिषदेचे माजी आरोग्य सभापती चरण रमेश गायकवाड यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, साथीच्या रोगांचा प्रसार रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, तसेच पक्षाचे विद्यमान आणि माजी नगरसेवक प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून जनतेसोबत काम करण्यास तयार आहेत.

चरण गायकवाड यांनी नगरपरिषद प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम हाती घ्यावी, गटारे साफ करावीत आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे आवाहन केले. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न हा सर्वांत महत्त्वाचा असून प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

वाई शहरातील सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता, स्वच्छता आणि रोगप्रतिबंधक उपाययोजनांबाबत प्रशासनाकडून पुढील काळात कोणती पावले उचलली जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Wai city dengue malaria sanitation issues municipal council citizens demand action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 10:01 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News
  • Wai News

संबंधित बातम्या

Satara Dolby Free Ganeshotsav: सातारा पोलिसांचा नाद खुळा! साताऱ्यात १२१ गावांत ‘डॉल्बीमुक्त’ गणेशोत्सव
1

Satara Dolby Free Ganeshotsav: सातारा पोलिसांचा नाद खुळा! साताऱ्यात १२१ गावांत ‘डॉल्बीमुक्त’ गणेशोत्सव

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन
2

Satara News : ‘वाघ्या घेवड्याचा पीकविम्यात समावेश करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविणार,’ जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आश्वासन

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित
3

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य
4

Shivendrasinhraje Bhosale: उंब्रज विश्रामगृह भूमिपूजनात शिवेंद्रसिंहराजेंची टोलेबाजी! कराड उत्तरच्या राजकारणावर सूचक भाष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.