Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाईत रोडरोमिओंवर पोलिसांचा कडक वॉच; गैरप्रकार करणाऱ्यांची गय नाही प्रदीप सूर्यवंशी

Wai Police Road Romeo Action : वाई शहरातील शाळा-महाविद्यालये, एसटी स्टँड आणि शैक्षणिक परिसरात विनाकारण टोळके करून फिरणाऱ्या, दहशत निर्माण करणाऱ्या तसेच रोडरोमिओगिरी करणाऱ्या युवकांवर पोलिसांकडून कडक कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 24, 2026 | 08:57 PM
photo- Ai generated

photo- Ai generated

Follow Us
Follow Us:
  • वाईत रोडरोमिओंवर पोलिसांचा कडक वॉच
  • गैरप्रकार करणाऱ्यांची गय नाही प्रदीप सूर्यवंशी
  • विद्यार्थिनींना रोडरोमिओंचा त्रास
वाई : वाई शहरातील शाळा, महाविद्यालये, वाई एसटी स्टँड तसेच शैक्षणिक परिसरात विनाकारण मोकाट फिरणाऱ्या, टोळक्याने दहशत निर्माण करणाऱ्या आणि भांडण करणाऱ्या युवकांसह रोडरोमिओंवर आता पोलिसांकडून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. असा स्पष्ट आणि कडक इशारा सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी दिला आहे शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात काही युवकांकडून विनाकारण घोळक्याने थांबणे, मुलींची छेड काढणे, विद्यार्थिनींचा पाठलाग करणे, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणे तसेच सुसाट वेगाने दुचाकी चालवून ध्वनीप्रदूषण करणे, असे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

Mhada Pune: स्वप्नातले घर आता सत्यात येणार! म्हाडाच्या लॉटरीचा बिगुल वाजला; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

या प्रकारांमुळे विद्यार्थिनी, पालक आणि नागरिकांमध्ये चिंता व नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर वाई पोलिसांनी अशा रोडरोमिओंवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली असून, शैक्षणिक परिसरात विनाकारण फिरणाऱ्या टोळक्यांवर तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. “कायदा हातात घेणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. कारवाई करताना कोणाचीही गय केली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे आणि पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी दिला विद्यार्थिनींची छेडछाड,  शेरेबाजी, विनाकारण पाठलाग, टोळक्याने दहशत निर्माण करणे, बेदरकार वाहनचालक तसेच ध्वनीप्रदूषण करणाऱ्या दुचाकीस्वारांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या युवकांनी वेळीच आपले वर्तन सुधारावे, अन्यथा कायद्याचा दणका बसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे दरम्यान, शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात संशयास्पद हालचाली, रोडरोमिओंचा त्रास किंवा विद्यार्थिनींची छेडछाड होत असल्यास पालक, शिक्षक आणि नागरिकांनी तातडीने वाई पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. विद्यार्थिनींची सुरक्षितता आणि शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रोडरोमिओंविरोधात पोलिसांची कारवाई आता अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे म्हणाले की, अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देणाऱ्या पालकांवरती ही गुन्हे दाखल करणार अल्पवयीन मुले वाहन चालवताना बेधारकपणे वाहन चालवतात त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो तसेच स्टॅन्ड परिसरात मोठ्या प्रमाणात युवकांची किरकोळ बाचाबाची भांडणे चालू असता त्यावर आम्ही रोज कारवाया करत असून जर त्यामध्ये फरक पडला नाही तर संबंधित राडा करणाऱ्या युवकांवर गुन्हे दाखल करणार.

Buldhana News: जिल्हा बँक निवडणुकीचा फैसला; ९४ टक्के मतदान; अनेक मान्यवरांनी बजावला आपला मताधिकार

Web Title: Wai police action road romeos student safety minor driving

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 08:57 PM

Topics:  

  • Marathi School
  • Police Action
  • Wai
  • Wai News

संबंधित बातम्या

वाईत ९६ लाखांचा डेकोरेटिव्ह पोल प्रकल्प रखडला; दीड वर्षांत ३२ पैकी फक्त ५ पोल, प्रशासनावर प्रश्नचिन्ह
1

वाईत ९६ लाखांचा डेकोरेटिव्ह पोल प्रकल्प रखडला; दीड वर्षांत ३२ पैकी फक्त ५ पोल, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!
2

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी
3

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.