Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंत्रिपद मिळाले नसले तरीदेखील हिवाळी अधिवेशनाला हजेरी; वळसे पाटलांकडून सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन

नागपुरच्या अधिवेशनात वळसे पाटील यांनी सहभाग घेऊन आपल्या गेल्या ३५ वर्षातील राजकारणातील सुसंस्कृतपणा जोपासला आणि इतर नवोदित आमदारांना सुसंस्कृतपणाचे दर्शनही घडवले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 18, 2024 | 02:40 PM
मंत्रिपद मिळाले नसले तरीदेखील हिवाळी अधिवेशनाला हजेरी; वळसे पाटलांकडून सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन

मंत्रिपद मिळाले नसले तरीदेखील हिवाळी अधिवेशनाला हजेरी; वळसे पाटलांकडून सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन

Follow Us
Follow Us:

रांजणी/ रमेश जाधव : नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात महायुतीतील अनेक ज्येष्ठ माजी मंत्र्यांना मंत्रीमंडळात डावलल्याने सध्या महायुतीत नाराजी नाट्य चालू आहे. काही ज्येष्ठ नेत्यांनी हिवाळी अधिवेशनाला दांड्या मारल्या, तर काहींनी बंडाचे अस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र आंबेगाव तालुक्याचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली. मंत्रिपद मिळाले नसले तरी देखील त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता आपण नाराज नाही असे अप्रत्यक्षरित्या दाखवून दिले. नागपुरच्या अधिवेशनात वळसे पाटील यांनी सहभाग घेऊन आपल्या गेल्या ३५ वर्षातील राजकारणातील सुसंस्कृतपणा जोपासला आणि इतर नवोदित आमदारांना सुसंस्कृतपणाचे दर्शनही घडवले.

महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार दोन दिवसापूर्वी नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पार पडला. या अधिवेशनामध्ये महायुतीतील अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना आणि आमदारांना मंत्रीपदासाठी डावलण्यात आले. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ तसेच पुरंदरचे आमदार विजय शिवतारे आणि कोकणातील माजी मंत्री दीपक केसरकर भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार त्याचबरोबर आंबेगावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ आणि विजय शिवतारे तसेच भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहिरपणे नाराजी व्यक्त केली. या नेत्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टिकेची झोड उठवली.

कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही

दरम्यान सलग २५ वर्ष राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदाची विविध पदे सांभाळलेल्या दिलीप वळसे पाटील यांचा देखील आत्ताच्या महायुतीच्या मंत्रिमंडळात पत्ता कट झाला. मात्र वळसे पाटील यांनी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही. उलट त्यांनी नागपूर येथे सध्या चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सलग दोन दिवस हजेरी लावून आपण मंत्रिपद मिळाले नसल्याने नाराज नसल्याचे दाखवून दिले आणि राजकारणातील सुसंस्कृतपणा त्यांनी जोपासला.

‘पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार’

महायुती सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी न दिल्याने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीतील नेत्यांना टार्गेट केले तर पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी महाराष्ट्राचा बिहार झालाय असे जाहिर वक्तव्य करून शिवसेनेच्या नेत्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. तर सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मंत्रिपदासाठी विचार न झाल्याने पक्षातील वरिष्ठ नेत्यांना टार्गेट करण्याचा अप्रत्यक्षरीत्या प्रयत्न केला. मात्र या सर्वांना दिलीप वळसे पाटील अपवाद ठरले. मंत्रीपद न मिळाल्याने वळसे पाटील यांनी प्रसार माध्यमे अथवा इतर पक्षातील नेत्यांकडे कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही. तसेच पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

हे सुद्धा वाचा : पालिकेच्या ‘पुस्तक घरा’तून बेघर, बेवारस होण्याची पुस्तकांवर वेळ; कर्वेनगरातील करुण घटना

सामाजिक हित जोपासण्याचा प्रयत्न

राज्याच्या राजकारणात राजकारण आणि समाजकारण करत असताना वळसे पाटील यांनी सातत्याने सामाजिक हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. बोलणे कमी मात्र कामाप्रति निष्ठा ठेवुन आणि सामाजिक कामे करून देण्यात त्यांचा सातत्याने हातखंडा राहिला आहे. आंबेगाव तालुक्यातून सलग आठ वेळा विधानसभेचे आमदार म्हणून वळसे पाटलांनी विजय मिळवला आणि जनतेही गेली ३५ वर्षे त्यांचे नेतृत्व स्विकारले. आगामी काळातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वळसे पाटलांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या कामाची योग्य ती पोचपावती देईल, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे.

Web Title: Walse patil is attending the winter session even though he did not get the ministerial post nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 02:40 PM

Topics:  

  • ajit pawar
  • maharashtra
  • Nagpur
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Dharashiv Farmers : धाराशिवच्या ७,६२९ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ५३.१६ कोटींच्या कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा
1

Dharashiv Farmers : धाराशिवच्या ७,६२९ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ५३.१६ कोटींच्या कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा

UP Gangster Act : गँगस्टर विजय मिश्राला मोठा दणका; महाराष्ट्रातील १००.२५ कोटींची मालमत्ता कुर्क, उमरग्यात कारवाई
2

UP Gangster Act : गँगस्टर विजय मिश्राला मोठा दणका; महाराष्ट्रातील १००.२५ कोटींची मालमत्ता कुर्क, उमरग्यात कारवाई

Pratap Sarnaik : RTO तील भ्रष्टाचारावर सरकारचा दणका; तीन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा
3

Pratap Sarnaik : RTO तील भ्रष्टाचारावर सरकारचा दणका; तीन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची घोषणा

साताऱ्यात ‘स्मार्ट मीटर’वरून ठिणगी! महावितरण कार्यालयावर उद्या शरद पवार गटाचा हल्लाबोल; ‘या’ नेत्याकडे आंदोलनाचे नेतृत्व
4

साताऱ्यात ‘स्मार्ट मीटर’वरून ठिणगी! महावितरण कार्यालयावर उद्या शरद पवार गटाचा हल्लाबोल; ‘या’ नेत्याकडे आंदोलनाचे नेतृत्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.