वर्धा : ग्रामीण भागातही अनेक क्रीडा प्रकारातील खेळाडू तयार होतात. परंतु, त्यांना त्यासाठी योग्य त्या सोयी सुविधा मिळणे फारच आवश्यक आहेत. अशीच उणीव वर्ध्याच्या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये लांब उडी या क्रीडा प्रकारासाठी जाणवत आहे. गरजेच्या असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध नसल्याने क्रीडा प्रशिक्षकाने मदतीचा हात मागितला आहे. क्रीडा विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे या निषेधाकडे लक्ष वेधल्या गेले आहे. चक्क हातात पोस्टर घेत लांब उडीच्या मैदानाला लागणाऱ्या रेतीसाठी पैसे गोळा करण्याची वेळ येथील खेळाडूवर आली आहे. ग्रामीण भागात देखील खेडाळू निर्माण व्हावे तर, त्यासाठी क्रीडांगणाचाही विकास व्हावा यासाठी मोठा खर्च केला जातो. परंतु, वर्धा जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी दिवस – रात्र तयारी करून मेहनत घेणाऱ्या खेळाडूंचा येथे भ्रमनिरास होताना दिसतो आहे.