Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : सिंचनासाठी २४ तास वीजपुरवठ्याची मागणी, माजी आमदार तिमांडे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना साकडे

वर्धा जिल्ह्यात पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. सिंचनाच्या उपलब्ध पाण्याचा वापर करून पिके वाचविण्यासाठी २४ तास अखंडित वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली.

  • By विवेक
Updated On: Aug 20, 2026 | 03:06 PM
सिंचनासाठी २४ तास वीजपुरवठ्याची मागणी, माजी आमदार तिमांडे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना साकडे

सिंचनासाठी २४ तास वीजपुरवठ्याची मागणी, माजी आमदार तिमांडे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना साकडे

Follow Us
Follow Us:
  • पावसाच्या लांब खंडामुळे खरीप पिकांची अवस्था गंभीर झाली आहे.
  • सिंचनासाठी शेतकऱ्यांना २४ तास अखंड वीजपुरवठ्याची मागणी.
  • आर्वी नाका येथे ३१५ केव्ही रोहित्र व आरएमयूचे लोकार्पण.
 

हिंगणघाट : खरीप हंगामात पावसाने दिलेल्या लांब खंडामुळे पिके मरणासन्न अवस्थेत आहे. शेतकऱ्यांना उपलब्ध सिंचनाच्या पाण्याचा उपयोग करून पिके वाचविता यावीत, यासाठी शासनाने सिंचनासाठी २४ तास अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी केली. याबाबत त्यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेत शेतकऱ्यांच्या विविध समस्यांचे निवेदन सादर केले.

पावसाच्या अनियमिततेचा पिकांना फटका

खरीप हंगामात जून महिन्यात सुरुवातीला पाऊस लांबणीवर गेला. तर नंतर झालेल्या पावसामुळे पेरणीच्या कामाला शेतकऱ्यांनी गती दिली. मात्र, जुलै महिन्यात पावसाने लपंडाव केल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी करावी लागली. पावसाच्या खंडामुळे कपाशीची लागवडही अपेक्षेप्रमाणे होऊ शकली नाही. तुरीच्या पिकालाही पावसाच्या अनियमिततेचा फटका बसला असून आता पुन्हा पावसाचा खंड कायम आहे. ऑगस्ट महिन्यातही १५ दिवसांपासून पावसाचा खंड कायम आहे. त्यामुळे पिकांची अवस्था गंभीर झाली आहे.

Wardha News : वर्ध्यात जलसंकटाची टांगती तलवार; गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा, दमदार पावसाची प्रतीक्षा

विशेषतः पठारी व मुरमाड जमिनीवरील पिके शेवटच्या घटका मोजत आहे. सोयाबीन पिकात फुलगळ होत आहे. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना केली आहे.

३१५ केव्ही रोहित्राचा श्रीगणेशा

वर्धा. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते आर्वी नाका येथे नवीन उभारण्यात आलेले ३१५ केव्हीचे रोहित्र व आरएमयूचे लोकार्पण करण्यात आले. तसेच म्हाडा कॉलनी येथे सुरू करण्यात आलेल्या शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे उ‌द्घाटन करण्यात आले.

Wardha News : वर्ध्यात ३२ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; पालकमंत्री पंकज भोयर यांची माहिती

यावेळी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता स्मिता पारखी, कार्यकारी अभियंता नरेश पारधी, नगर परिषदेच्या बांधकाम सभापती राखी पांडे, नगरसेवक सतीश मिसाळ, उज्ज्वला पेठे, नीलेश किटे, वीज कंपनीचे कनिष्ठ अभियंता क्षितिज अंबाडकर तसेच आरोग्यवर्धिनी केंद्राच्या उ‌द्घाटनाप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी माधुरी दिघेकरी आदी उपस्थित होते,

नवीन सुरू करण्यात आलेल्या रोहित्रामुळे म्हाडा कॉलनी व परिसरातील रोहित्रावर येणारा ताण कमी होऊन नागरिकांना अखंड वीजपुरवठा करणे सोईचे होणार असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.

Web Title: Wardha 24 hours electricity supply irrigation raju timande sunetra pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Sunetra Pawar
  • wardha
  • wardha News

संबंधित बातम्या

सोमेश्वर कारखाना कोणा एकाची प्रॉपर्टी नाही, अजितदादांचा फोटो का वापरता? सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा
1

सोमेश्वर कारखाना कोणा एकाची प्रॉपर्टी नाही, अजितदादांचा फोटो का वापरता? सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा

Wardha News : वर्ध्यात दुष्काळाचं संकट! पीक नुकसानीचे पंचनामे सुरू, १० ऑक्टोबरला अहवाल
2

Wardha News : वर्ध्यात दुष्काळाचं संकट! पीक नुकसानीचे पंचनामे सुरू, १० ऑक्टोबरला अहवाल

Wardha News : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण पुन्हा तापलं; नियुक्तीच संशयाच्या भोवऱ्यात, १३ शिक्षक-कर्मचाऱ्यांची चौकशी
3

Wardha News : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण पुन्हा तापलं; नियुक्तीच संशयाच्या भोवऱ्यात, १३ शिक्षक-कर्मचाऱ्यांची चौकशी

Wardha Farmer : सिंचन विहिरीचे अनुदान २७ महिन्यांपासून रखडले; शेतकऱ्याचा आत्महत्येचा इशारा, प्रशासनाची धावपळ
4

Wardha Farmer : सिंचन विहिरीचे अनुदान २७ महिन्यांपासून रखडले; शेतकऱ्याचा आत्महत्येचा इशारा, प्रशासनाची धावपळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.