Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : वर्ध्यात दुष्काळाचं संकट! पीक नुकसानीचे पंचनामे सुरू, १० ऑक्टोबरला अहवाल

Wardha News : वर्धा जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. कारंजा वगळता सात तालुक्यांचा दुष्काळ ट्रिगर-१ मध्ये समावेश करण्यात आला असून आतापर्यंत ८,८८३ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

  • By विवेक
Updated On: Oct 03, 2026 | 05:46 PM
Maharashtra Drought

Maharashtra Drought

Follow Us
Follow Us:
  • वर्धा जिल्ह्यातील सात तालुके दुष्काळ ट्रिगर-१ मध्ये.
  • आतापर्यंत ८,८८३ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण.
  • १० ऑक्टोबरपर्यंत जिल्हा प्रशासन शासनाला अहवाल पाठवणार
 

Wardha News : यंदाच्या खरीप हंगामात ऐन पावसाळ्यात पावसाने दडी मारल्याने वर्धा जिल्ह्यावर दुष्काळजन्य परिस्थिती ओढावली आहे. पावसाचा खंड आणि अल्प पर्जन्यमानाचा थेट फटका शेतपिकांना बसला असून शासनाने कारंजा वगळता जिल्ह्यातील उर्वरित सात तालुक्यांचा दुष्काळ ट्रिगर-१ मध्ये समावेश केला आहे.

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानंतर महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संयुक्तपणे युद्धपातळीवर पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ८,८८३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत.

सात तालुक्यांमध्ये दुष्काळाची स्थिती

सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिल्यानंतर काही प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांची अवस्था बिकट झाली.

Wardha News : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण पुन्हा तापलं; नियुक्तीच संशयाच्या भोवऱ्यात, १३ शिक्षक-कर्मचाऱ्यांची चौकशी

कृषी विभागाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १४ सप्टेंबरपर्यंतचे पर्जन्यमान, पावसाचा खंड, पिकांची परिस्थिती आणि उत्पादनातील संभाव्य घट यासह विविध निकषांचा अभ्यास केला. या अभ्यासानंतर वर्धा जिल्ह्यातील सात तालुक्यांचा दुष्काळ ट्रिगर-१ मध्ये समावेश करण्यात आला.

४.१९ लाख हेक्टरवर खरीप पिकांची लागवड

कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा जिल्ह्यात ४ लाख ६ हजार ५५५ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड अपेक्षित होती. प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त म्हणजे सुमारे ४ लाख १९ हजार ५७५ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड झाली आहे.

यामध्ये सोयाबीन, कपाशी आणि तूर या प्रमुख पिकांचा समावेश आहे. सोयाबीनचे १,१९,७३३ हेक्टर, कपाशीचे २,३२,३५३ हेक्टर, तर तुरीचे ६०,४१३ हेक्टर क्षेत्र आहे.

१० ऑक्टोबरपर्यंत शासनाला अहवाल

अल्प पर्जन्यमान आणि पावसाच्या खंडामुळे झालेल्या नुकसानीची माहिती प्रशासनाकडून गोळा केली जात आहे. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाकडून संयुक्त पंचनामे पूर्ण करून त्याचा अहवाल तयार केला जाणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचा संपूर्ण अहवाल १० ऑक्टोबरपर्यंत शासनाला सादर केला जाणार आहे.

‘शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतपिकांच्या नुकसानीचे संयुक्त पंचनामे युद्धपातळीवर केले जात आहेत. जिल्ह्यातील नुकसानीची माहिती गोळा करून ती १० ऑक्टोबरपर्यंत शासनाला पाठविली जाणार आहे,’ अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरिकर यांनी दिली.

Wardha Farmer : सिंचन विहिरीचे अनुदान २७ महिन्यांपासून रखडले; शेतकऱ्याचा आत्महत्येचा इशारा, प्रशासनाची धावपळ

Web Title: Wardha news drought crop damage report vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • drought news
  • Maharashtra Drought 2026
  • wardha News

संबंधित बातम्या

Maharashtra Drought 2026: दुष्काळाचा आणखी एक बळी! 34 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या; मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात
1

Maharashtra Drought 2026: दुष्काळाचा आणखी एक बळी! 34 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या; मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात

‘विघ्नहर्त्या दुष्काळ दूर कर’! अंगारकीला गणपतीपुळ्यात भाविकांचे ‘श्रीं’च्या चरणी साकडे
2

‘विघ्नहर्त्या दुष्काळ दूर कर’! अंगारकीला गणपतीपुळ्यात भाविकांचे ‘श्रीं’च्या चरणी साकडे

Wardha News : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण पुन्हा तापलं; नियुक्तीच संशयाच्या भोवऱ्यात, १३ शिक्षक-कर्मचाऱ्यांची चौकशी
3

Wardha News : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण पुन्हा तापलं; नियुक्तीच संशयाच्या भोवऱ्यात, १३ शिक्षक-कर्मचाऱ्यांची चौकशी

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित
4

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.