Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : एसएनसीयूमध्ये एकच व्हेंटिलेटर, जिल्हा रुग्णालयातील प्रकार; रेफर आऊटवर दिला जातोय भर

अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूच्या घटनेनंतर वर्धा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयूच्या सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विभागात केवळ एक व्हेंटिलेटर असून मनुष्यबळाअभावी गंभीर बालकांना सेवाग्राम आणि सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयात रेफर केले जात असल्याची माहिती आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 27, 2026 | 02:40 PM
एसएनसीयूमध्ये एकच व्हेंटिलेटर, जिल्हा रुग्णालयातील प्रकार

एसएनसीयूमध्ये एकच व्हेंटिलेटर, जिल्हा रुग्णालयातील प्रकार

Follow Us
Follow Us:
  • वर्धा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयूमध्ये केवळ एक व्हेंटिलेटर
  • मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे गंभीर नवजात बालकांना रेफर करण्याची वेळ
  • अमरावतीतील घटनेनंतर शासकीय आरोग्य सुविधांची तपासणी महत्त्वाची
 

वर्धा : गरजू व गरिबांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील एसएनसीयूत नवजात बालकांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात उपचार केले जातात. अमरावती येथील घटनेनंतर जिल्हा रुग्णालयातील या एसएनसीयूतील आरोग्य सेवेची माहिती जाणून घेतली असता तेथे केवळ एकच व्हेंटिलेटर असल्याचे सांगण्यात आले. तर मनुष्यबळाची कमतरता असल्याने बहुदा गंभीर नवजात बालकांना सेवाग्राम व सावंगी (मेघे) वैद्यकीय महाविद्यालयात रेफर आऊट केले जात आहे.

जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय, आठ ग्रामीण रुग्णालय व ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या शासकीय आरोग्य संस्थांच्या नागरिकांना माध्यमातून शासकीय आरोग्यसेवेचा लाभ दिला जात आहे. पण या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये अनेक तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे बहुदा आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्यांनाही खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते.

०३ नवजात बालकांचा अमरावतीत मृत्यू

अमरावती येथील स्त्री सोमवारी ‘शिल्लर’ रुग्णालयात कंपनीच्या व्हॉटलेटरचा स्फोट होत ३ नवजात बालकांचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सध्या अलर्ट मोडवर आली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील एसएनसीयू विभागातील आरोग्य सेवा व सुविधांची माहिती जाणून घेतली असता या विभागात केवळ ‘विस्टा’ कंपनीचे एकच व्हेंटिलेटर कार्यरत असल्याचे सांगण्यात आले, पण संबंधित ‘व्हेंटिलेटर’ हाताळण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ याठिकाणी नसल्याने या व्हीटलेटरचा पाहिजे तसा वापर होत नसल्याचे सांगण्यात आले.

Wardha News : ९,१२१ गॅस ग्राहक वांध्यात, वेळीच केली नाही ई-केवायसी तर सबसिडी होणार बंद

शिवाय तेथील गंभीर नवजात बालकांना सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील वैद्यकीय महाविद्यालयात रेफर आऊट केले जात आहे. नव्याने रुजू झालेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजसिंग पवार हे स्वतः बालरोग तज्ज्ञ आहेत. त्यामुळे या विभागाला आणखी सक्षम करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न करावे, अशी अपेक्षा वर्धेकरांना आहे.

शासकीय रुग्णालयात ‘शिल्लर’चे व्हेंटिलेटर नाही

जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये ५० व्हेंटिलेटर असून त्यापैकी निम्मे अडगळीत तर काही सुस्थितीत व वापरात असल्याचे आरोग्य यंत्रणेतील खात्रिदायक सूत्रांकडून नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगण्यात आले. तर या व्हेंटिलेटरमध्ये शिल्लर कंपनीच्या व्हेंटिलेटरचा समावेश नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

वर्ध्यात 31.77 लाखांचा स्वस्त धान्य घोटाळा; निलंबनानंतर SIO आणि रेशन दुकानदारावर गुन्हा दाखल

Web Title: Wardha district hospital sncu single ventilator newborn referral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • wardha
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha News : वर्ध्याच्या 209 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला ब्रेक, 14 गावांच्या पाणीपुरवठा योजनेचं पुढे काय?
1

Wardha News : वर्ध्याच्या 209 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला ब्रेक, 14 गावांच्या पाणीपुरवठा योजनेचं पुढे काय?

Wardha News : जिल्ह्यावर दुष्काळाचे ढग गडद, आठही तालुके दुष्काळी यादीमध्ये, आगामी काळात पाणीटंचाई वाढण्याची चिंता
2

Wardha News : जिल्ह्यावर दुष्काळाचे ढग गडद, आठही तालुके दुष्काळी यादीमध्ये, आगामी काळात पाणीटंचाई वाढण्याची चिंता

Wardha News : सोयाबीनचा भाव वाढला, पण शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही! वर्ध्यातील बाजारभावामुळे चर्चेला उधाण
3

Wardha News : सोयाबीनचा भाव वाढला, पण शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही! वर्ध्यातील बाजारभावामुळे चर्चेला उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.