
एफडीएचा दणका; मुदतबाह्य बेसनच्या रि-पॅकिंगप्रकरणी ब्लिंक इट आणि कांचन फूड्सचा परवाना निलंबित
अन्न व औषध प्रशासनाकडून जिल्ह्यात खाद्य व्यवसाय करणाऱ्या विविध प्रतिष्ठानांची तपासणी सुरू आहे. खाद्य सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत ही मोहीम राबवली जात आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या तपासणीदरम्यान २० जुलै रोजी अन्न सुरक्षा अधिकारी रविराज धाबर्डे यांनी ब्लिंक कॉमर्सची पाहणी केली.
या तपासणीत प्रतिष्ठानात आवश्यक स्वच्छता मानकांचे पालन होत नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्रुटी दूर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देत नोटीस बजावण्यात आली. मात्र, निर्धारित कालावधीत अनुपालन अहवाल सादर करण्यात आला नाही. १४ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीतही समाधानकारक स्पष्टीकरण अथवा अनुपालन अहवाल सादर न झाल्याने प्रतिष्ठानाला सुधारणा करण्यासाठी आणखी वेळ देण्यात आला.
Wardha News : एसएनसीयूमध्ये एकच व्हेंटिलेटर, जिल्हा रुग्णालयातील प्रकार; रेफर आऊटवर दिला जातोय भर
कारवाईदरम्यान एफडीएच्या पथकाने तब्बल ११,३९४ किलो खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला. या साठ्याची एकूण किंमत ९ लाख ९५ हजार ५१२ रुपये असल्याचे सांगण्यात आले. जप्त केलेल्या मालामध्ये बेसन तसेच पिवळ्या वाटाण्याच्या डाळीचा समावेश आहे.
जप्त करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांच्या अहवालानंतर खाद्य सुरक्षा नियमांनुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.
Wardha News : ९,१२१ गॅस ग्राहक वांध्यात, वेळीच केली नाही ई-केवायसी तर सबसिडी होणार बंद
दरम्यान, परवाना निलंबित असताना संबंधित प्रतिष्ठानाला कोणत्याही खाद्यपदार्थाचे उत्पादन, विक्री, वितरण किंवा साठवणूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रयोगशाळेचा अहवाल आणि पुढील प्रशासकीय कारवाईकडे आता लक्ष लागले आहे.