Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे

IAS Tukaram Mundhe: महाराष्ट्रातील चर्चित IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या प्रशासकीय कारवायांसोबतच सोशल मीडियावरील लोकप्रियताही चर्चेत आली आहे. ऑगस्ट 2026 मधील दिलेल्या आकडेवारीनुसार, इन्स्टाग्रामवर मुंढे यांचे सुमारे 37 लाख फॉलोअर्स आणि 20.35 टक्के एंगेजमेंट रेट असल्याचा दावा करण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 05, 2026 | 04:08 PM
IAS तुकाराम मुंढे सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर तुकाराम मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे

IAS तुकाराम मुंढे सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर तुकाराम मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे

Follow Us
Follow Us:
  • IAS तुकाराम मुंढे सोशल मीडियावरही ‘सिंघम’
  • 37 लाख फॉलोअर्स, एंगेजमेंट रेटनेही आघाडी
  • फडणवीस-शिंदेंपेक्षाही अधिक फॉलोअर्सचा दावा
IAS Tukaram Mundhe : महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि आक्रमक भारतीय प्रशासकीय तुकारम मुंढेना पाहील जातं. कडक प्रशासकीय कार्यशैलीमुळे सातत्याने चर्चेत राहणारे IAS अधिकारी तुकाराम मुंढे आता सोशल मीडियावरही मोठी लोकप्रियता मिळवत असल्याचे दिसत आहे. खाद्यपदार्थांची गुणवत्ता, रेस्टॉरंटमधील स्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातील FDAच्या कारवायांमुळे तुकाराम मुंडे यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (IAS Tukaram Mundhe)

ऑगस्ट 2026 मधील दिलेल्या आकडेवारीनुसार, तुकाराम मुंढे यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सुमारे 3.7 मिलियन म्हणजेच 37 लाख फॉलोअर्स असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांचा एंगेजमेंट रेट सुमारे 20.35 टक्के असल्याचा दावा आहे.

FDA चे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या अंतर्गत कोणकोणती कार्ये आणि विभाग येतात? सविस्तरपणे जाणून घ्या

दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सुमारे 2.9 मिलियन फॉलोअर्स आणि 0.50 टक्क्यांच्या आसपास एंगेजमेंट रेट असल्याचे संबंधित आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अकाउंटवर सुमारे 3 मिलियन फॉलोअर्स असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या आकडेवारीनुसार फॉलोअर्सच्या बाबतीत मुंढे हे दोन्ही प्रमुख राजकीय नेत्यांपेक्षा पुढे असल्याचा दावा केला जात आहे.

FDAच्या कारवायांमुळे चर्चेत

तुकाराम हरिभाऊ मुंढे हे महाराष्ट्र केडरचे 2005 बॅचचे IAS अधिकारी आहेत. नियमांची कठोर अंमलबजावणी, अचानक पाहणी आणि प्रशासकीय शिस्तीसाठी ते ओळखले जातात. मे 2026 पासून महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनात (FDA) आयुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेशी संबंधित कारवायांवर विशेष भर दिल्याचे सांगण्यात आले आहे.

रेस्टॉरंट, खाद्यपदार्थ विक्री केंद्रे आणि इतर आस्थापनांमध्ये अचानक तपासणी करत स्वच्छता, खाद्यपदार्थांची गुणवत्ता, एक्सपायरी डेट आणि अन्नसुरक्षा नियमांची अंमलबजावणी तपासण्याच्या त्यांच्या कारवाया विशेष चर्चेत आल्या आहेत.

तपासणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंढे यांच्या लोकप्रियतेमागे त्यांच्या कारवायांचे सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओही महत्त्वाचे कारण मानले जात आहे. विविध खाद्य आस्थापनांमध्ये ते स्वतः जाऊन स्वयंपाकघरातील स्वच्छता, खाद्यसामग्रीची गुणवत्ता आणि मुदतबाह्य उत्पादनांची तपासणी करत असल्याचे व्हिडिओंमध्ये दिसते. अस्वच्छता किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यानंतर अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना देतानाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर पाहिले आणि शेअर केले जात आहेत. त्यामुळे एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या दैनंदिन कारवाया थेट सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचे चित्र आहे.

दोन दशकांत 25 वेळा बदली झाल्याचा उल्लेख

कडक प्रशासकीय भूमिकेमुळे मुंढे यांच्या बदल्याही कायम चर्चेचा विषय ठरल्या आहेत. गेल्या दोन दशकांच्या कारकिर्दीत त्यांची 25 वेळा बदली झाल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या संभाव्य बदलीचा मुद्दा महाराष्ट्र विधानसभेतही चर्चेला आला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंढे यांच्या बदलीसाठी कथितरीत्या 250 कोटी रुपये जमा केले जात असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंढे यांची बदली केली जाणार नसल्याचे सभागृहात स्पष्ट केल्याचे वृत्त होते.

दरम्यान, सोशल मीडिया फॉलोअर्स आणि विशेषतः एंगेजमेंट रेट हे सतत बदलणारे आकडे आहेत. त्यामुळे संबंधित आकडेवारी कोणत्या तारखेला आणि कोणत्या विश्लेषण पद्धतीने मोजण्यात आली, यानुसार त्यात फरक पडू शकतो.

Nagpur FDA Actoin: तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर नागपुरच्या मेयोतील ‘बालाजी’उपहारगृहावर कारवाई; परवाना नसल्याने केले बंद

Web Title: Tukaram mundhe instagram followers engagement devendra fadnavis eknath shinde social media popularity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • FDA
  • maharashtra
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
1

Rain Update: गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

FDA Action : रुग्णांच्या ताटात झुरळ; एफडीएची धडक कारवाई, राम कॅटरर्सचे उपाहारगृह सील
2

FDA Action : रुग्णांच्या ताटात झुरळ; एफडीएची धडक कारवाई, राम कॅटरर्सचे उपाहारगृह सील

Gokulashtami 2026: कला अन् कृष्णभक्तीचा सुंदर संगम; वसईच्या कलाकाराने बासरीवर रेखाटले श्रीकृष्ण
3

Gokulashtami 2026: कला अन् कृष्णभक्तीचा सुंदर संगम; वसईच्या कलाकाराने बासरीवर रेखाटले श्रीकृष्ण

भेसळखोरांनो सावधान ! सणासुदीतील ‘या’ पदार्थांवर असणार आता FDA ची नजर; तुकाराम मुंढेंकडून कॅलेंडरच जारी
4

भेसळखोरांनो सावधान ! सणासुदीतील ‘या’ पदार्थांवर असणार आता FDA ची नजर; तुकाराम मुंढेंकडून कॅलेंडरच जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.