Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : वर्ध्यात जलसंकटाची टांगती तलवार; गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा, दमदार पावसाची प्रतीक्षा

वर्धा जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने जलसंकटाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम ११ जलाशयांमध्ये सध्या ६९ टक्केच पाणीसाठा असून खरीप पिकांवरही पावसाअभावी संकट निर्माण झाले आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 20, 2026 | 02:40 PM
वर्ध्यात जलसंकटाची टांगती तलवार; गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा

वर्ध्यात जलसंकटाची टांगती तलवार; गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा

Follow Us
Follow Us:

वर्धा, ब्युरो : यंदा वरुणराजा वर्धा जिल्ह्यावर काहीसा नाराज असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. आतापर्यंत दमदार पाऊस न झाल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. गतवर्षी जुलैच्या सुरुवातीच्या दिवसातच जिल्ह्यातील छोटे-मोठे सर्व जलाशय तुडुंब भरले होते. पण, यंदा अर्धा ऑगस्ट महिना संपला तरी जलाशयात केवळ ६९ टक्के पाणीसाठा आहे. पावसाअभावी वाढीच्या आणि फुलधारणेच्या अवस्थेत असलेली पिके माना टाकत आहे. येत्या काही दिवसात जिल्ह्यात मुरळधार पाऊस न झाल्यास आगामी काळात जिल्ह्यातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.

दीर्घकाळापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकेही संकटात सापडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात जिल्ह्याला भीषण जलसंकटाचा सामना करावा लागू शकतो. जिल्ह्यात मोठे व मध्यम ११ जलाशय आहे. वर्ष २०२५ मध्ये १७आणि १८ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीदरम्यान सर्व जलाशय १०० टक्के भरली होती. याउलट यंदाची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. यंदा जिल्ह्यात मान्सूनने आगमन झाले.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा जलाशयांमध्ये अत्यल्प पाणीसाठा

पण काही मोजके दिवस सोडले तर पावसाने दमदार बॅटिंग जिल्ह्यात केली नाही. जुलैच्या सुरुवातीला आणि मध्यावर काही प्रमाणात पाऊस जिल्ह्यात झाला. त्यामुळे जलाशयातील काही प्रमाणात पाणी पातळी वाढली. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा जलाशयांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. पावसाला झालेल्या विलंबामुळे खरीप पिकांच्या पेरण्यांवरही यंदा परिणाम झाला. कशीतरी शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली; मात्र आता पावसाअभावी पिकांवर संकट ओढवले आहे.

Wardha News : वर्ध्यात ३२ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; पालकमंत्री पंकज भोयर यांची माहिती

जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम असून पिकांवर रोग व अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. लवकर पाऊस न झाल्यास शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहे.

जून, जुलै, ऑगस्टमध्ये पावसाची कमतरता

  • जिल्ह्यात यंदा आतापर्यंत दमदार पाऊस झालेला नाही. तिन्ही महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत पावसाची आकडेवारी कमी राहिली आहे.
  • जूनमध्ये सरासरी १३२.२ मिमी पाऊस झाला असून तो सरासरीच्या ७५.९ टक्के आहे.
  • जुलैमध्ये सरासरी २९९.८ मिमी पावसाची नोंद झाली असून, हे प्रमाण सरासरीच्या १०९.६ टक्के आहे.
  • तर ऑगस्टमध्ये आतापर्यंत केवळ १६.२ मिमी पाऊस झाला असून, हे प्रमाण सरासरीच्या अवघ्या ६ टक्के असल्याचे सांगण्यात आले.
Wardha News: दीड लाख शेतकऱ्यांच्या पिकांना विमाकवच; कापूस, सोयाबीन, तुरीसह भुईमूग, ज्वारीचा समावेश
पाणी पातळीची टक्केवारी जलाशय २०२६ २०२५
बौर प्रकल्प ७१.८२ ६२.३०
निम्न वर्धा ७८.०२ ७०.४२
घाम प्रकल्प ६६.६२ ९५.७५
पोथरा प्रकल्प ७५.४७ १००
पंचधारा प्रकल्प ३४.९७ १००
डोंगरगाव प्रकल्प ४६.१५ ८९.१९
मदन प्रकल्प ३१.८८ ९०.०६
मदन उन्नई ४८.५० ८६.७४
वर्धा कार नदी ७३.६४ ८८.७१
सुकळी लघू २१.६७ १००
– – –

Web Title: Wardha water crisis 69 percent water storage rain shortage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • wardha
  • wardha News
  • Water Shortage

संबंधित बातम्या

Wardha News : वर्ध्यात दुष्काळाचं संकट! पीक नुकसानीचे पंचनामे सुरू, १० ऑक्टोबरला अहवाल
1

Wardha News : वर्ध्यात दुष्काळाचं संकट! पीक नुकसानीचे पंचनामे सुरू, १० ऑक्टोबरला अहवाल

Mira Bhayandar News: रुग्णालयात उपचारासाठी आले, पण लिफ्टच बंद! पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील गैरसोयींमुळे नागरिक हैराण
2

Mira Bhayandar News: रुग्णालयात उपचारासाठी आले, पण लिफ्टच बंद! पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील गैरसोयींमुळे नागरिक हैराण

Wardha News : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण पुन्हा तापलं; नियुक्तीच संशयाच्या भोवऱ्यात, १३ शिक्षक-कर्मचाऱ्यांची चौकशी
3

Wardha News : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण पुन्हा तापलं; नियुक्तीच संशयाच्या भोवऱ्यात, १३ शिक्षक-कर्मचाऱ्यांची चौकशी

Wardha Farmer : सिंचन विहिरीचे अनुदान २७ महिन्यांपासून रखडले; शेतकऱ्याचा आत्महत्येचा इशारा, प्रशासनाची धावपळ
4

Wardha Farmer : सिंचन विहिरीचे अनुदान २७ महिन्यांपासून रखडले; शेतकऱ्याचा आत्महत्येचा इशारा, प्रशासनाची धावपळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.