Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar News: रुग्णालयात उपचारासाठी आले, पण लिफ्टच बंद! पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील गैरसोयींमुळे नागरिक हैराण

Mira Bhayandar News: पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील चारपैकी तीन लिफ्ट महिनाभराहून अधिक काळ बंद असल्याची तक्रार समोर आली आहे. त्यामुळे रुग्ण, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून संपूर्ण रुग्णालयाचा भार एकाच लिफ्टवर पडला आहे. त्यातच रुग्णालयातील पाणीटंचाईचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 03, 2026 | 12:35 PM
रुग्णालयात उपचारासाठी आले, पण लिफ्टच बंद! पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील गैरसोयींमुळे नागरिक हैराण

रुग्णालयात उपचारासाठी आले, पण लिफ्टच बंद! पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील गैरसोयींमुळे नागरिक हैराण

Follow Us
Follow Us:
  • महिनाभरापासून तीन लिफ्ट बंद!
  • पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील चारपैकी तीन लिफ्ट बंद
  • रुग्णांसह गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांचे हाल
विजय काते, मीरा-भाईंदर: भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील चारपैकी तब्बल तीन लिफ्ट गेल्या महिनाभराहून अधिक काळापासून बंद असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची तक्रार समोर आली आहे. रुग्णालयात सध्या केवळ एकच लिफ्ट सुरू असल्याने तिच्यावर मोठा ताण निर्माण झाला असून, रुग्णांना तसेच नातेवाइकांना अनेक वेळा जिन्याचा आधार घ्यावा लागत आहे. विशेषतः गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना याचा सर्वाधिक त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे.(Mira Bhayandar News)

चारपैकी तीन लिफ्ट बंद

पंडित भीमसेन जोशी रुग्णालय हे मीरा-भाईंदर शहरासह वसई-विरार आणि पालघर परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे सरकारी रुग्णालय आहे. रुग्णालयात दररोज ५०० हून अधिक रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे सांगितले जाते, तर सुमारे १०० रुग्ण विविध विभागांमध्ये दाखल असतात. अशा मोठ्या रुग्णालयातील चार लिफ्टपैकी तीन लिफ्ट दीर्घकाळ बंद असल्याने रुग्णालयाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकमेव सुरू असलेल्या लिफ्टवर रुग्ण, डॉक्टर, कर्मचारी आणि नातेवाइकांचा भार पडत असल्याने लिफ्टसाठी गर्दी होत असल्याची तक्रार आहे.

Mira Bhayandar News: ‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरून मनसे आक्रमक, सचिन पोपळेंचा नरेंद्र मेहतांवर निशाणा

गर्भवती महिलांना जिन्याचा वापर

रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर महिला विभाग आहे. लिफ्ट बंद असल्यामुळे गर्भवती महिला आणि महिला रुग्णांना जिन्याचा वापर करावा लागत असल्याची तक्रार आहे. आजारपण किंवा शस्त्रक्रियेनंतर अशक्त असलेल्या रुग्णांसाठीही जिन्याचा वापर करणे त्रासदायक ठरत आहे.
दुसऱ्या मजल्यावर अतिदक्षता विभागासह इतर उपचार विभाग आहेत. या विभागांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नातेवाइकांनाही लिफ्टअभावी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.

पाणीटंचाईचाही फटका

लिफ्टच्या समस्येबरोबरच रुग्णालयातील पाणीपुरवठ्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. महापालिकेकडून रुग्णालयाला पाणीपुरवठा केला जात असला तरी गेल्या काही दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला टँकरद्वारे पाणी मागवावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण दाखल असताना पाणी अपुरे पडल्याने स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रुग्णालयातील स्वच्छता ही थेट रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने पाणीपुरवठ्याची समस्या तातडीने सोडवण्याची मागणी होत आहे.

२०० खाटांचे रुग्णालय

राज्य शासनाच्या अखत्यारीतील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयाची क्षमता २०० खाटांची असून, तळमजला अधिक चार मजली अशी इमारत आहे. येथे प्राथमिक उपचारांसह विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि इतर वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे या रुग्णालयावर परिसरातील मोठ्या लोकसंख्येचा भार आहे. अशा परिस्थितीत मूलभूत सुविधांपैकी लिफ्ट आणि पाणीपुरवठ्यासारख्या सुविधांमध्ये अडथळे निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होण्याची शक्यता आहे.

रुग्ण कल्याण समितीकडून तातडीच्या बैठकीची मागणी

रुग्णालयातील लिफ्ट बंद असणे, अस्वच्छता, सुरक्षाविषयक त्रुटी, पाणीपुरवठा आणि इतर समस्यांबाबत रुग्ण कल्याण समितीकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. रुग्ण कल्याण समितीचे सदस्य ओमप्रकाश गरोडिया यांनी या विविध समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची गरज व्यक्त केली आहे. या समस्यांबाबत ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे तातडीची बैठक आयोजित करण्याची मागणी करण्यात आल्याचे गरोडिया यांनी सांगितले.

देखभाल-दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह

चारपैकी तीन लिफ्ट दीर्घकाळ बंद असताना त्यांची दुरुस्ती अद्याप का करण्यात आलेली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. रुग्णालयासारख्या अत्यावश्यक सेवांच्या ठिकाणी लिफ्टची नियमित देखभाल आणि वेळेवर दुरुस्ती होणे आवश्यक असताना याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, संबंधित पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून लिफ्ट दुरुस्ती आणि पाणीपुरवठ्याबाबतची अधिकृत भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे तीन लिफ्ट नेमक्या कधीपर्यंत सुरू होणार आणि रुग्णालयातील पाणीपुरवठ्याची समस्या कधी सुटणार, याकडे आता रुग्ण आणि नातेवाइकांचे लक्ष लागले आहे.

Mira-Bhayandar News: घंटागाड्या खरेदी करून वर्षानुवर्षे वापराविना; घोडबंदर डेपोत दुरवस्था

Web Title: Pandit bhimsen joshi hospital three of four lifts shut patients pregnant women senior citizens suffer sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 12:35 PM

Topics:  

  • Hospital
  • mira bhayandar
  • Water Shortage

संबंधित बातम्या

MBMC Land Deal: टीडीआरमध्ये मोफत मिळालेल्या जागेसाठी २० कोटींचा मोबदला? मीरा-भाईंदर महापालिकेवर गंभीर आरोप
1

MBMC Land Deal: टीडीआरमध्ये मोफत मिळालेल्या जागेसाठी २० कोटींचा मोबदला? मीरा-भाईंदर महापालिकेवर गंभीर आरोप

Mira Bhayandar News: ‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरून मनसे आक्रमक, सचिन पोपळेंचा नरेंद्र मेहतांवर निशाणा
2

Mira Bhayandar News: ‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरून मनसे आक्रमक, सचिन पोपळेंचा नरेंद्र मेहतांवर निशाणा

Mira-Bhayandar News: घंटागाड्या खरेदी करून वर्षानुवर्षे वापराविना; घोडबंदर डेपोत दुरवस्था
3

Mira-Bhayandar News: घंटागाड्या खरेदी करून वर्षानुवर्षे वापराविना; घोडबंदर डेपोत दुरवस्था

Mira Bhayandar News: मिरा-भाईंदरमध्ये नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी? १० घंटागाड्या वर्षांपासून वापराविना
4

Mira Bhayandar News: मिरा-भाईंदरमध्ये नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी? १० घंटागाड्या वर्षांपासून वापराविना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.