Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim: वाशिमच्या मतदारांसाठी महत्त्वाची बातमी! दावे-हरकतींच्या निपटाऱ्याला मुदतवाढ; जिल्हाधिकारी कुंभेजकरांची माहिती

Washim SIR Update Revision List Deadline Extended: वाशिममध्ये SIR अंतर्गत दावे-हरकतींवरील कार्यवाहीसाठी २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अंतिम मतदारयादी ३० नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 21, 2026 | 08:34 PM
SIR Update Revision List Deadline Extended

SIR Update Revision List Deadline Extended

Follow Us
Follow Us:
  • वाशिममध्ये मतदारयादी पुनरीक्षणाला वेग
  • दावे-हरकतींसाठी २५ नोव्हेंबरपर्यंत मुदत
  • अंतिम मतदारयादी ३० नोव्हेंबरपर्यंत
वाशिम: मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत प्राप्त दावे व हरकतींवरील कार्यवाही पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाने २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे प्रलंचित नोटीसांवरील कार्यवाही निर्धारित वेळेत पूर्ण करून मतदारयाद्यांची अचूकता सुनिश्चित करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले आहेत. आता अंतिम मतदार यादी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक त्यांनी दिली. (Washim News)

Baramati News : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! माळेगाव कारखान्याची पहिली उचल जाहीर, किती दर देणार? अखेर आकडा समोर

जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा सभागृहात यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी वीरेंद्र जाधव, निवडणूक नायब तहसीलदार एस. एम. पढवे, महसूल अधिकारी रवी महाले उपस्थित होते. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजू चौधरी, सरचिटणीस उज्ज्वल देशमुख, सचिव सुरेश रत्नपारखी, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा समन्वयक डॉ. विशाल सोमटकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय बाजड आणि प्रतिनिधी सतीश देशमुख उपस्थित होते.

बैठकीत मतदार याद्यांचे विशेष पुनरीक्षण, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ते (बीएलए) यांच्या नियुक्त्या तसेच दावे व हरकतींच्या निपटाऱ्याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. यापूर्वी दावे व हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत १३ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर प्राप्त दावे व हरकतींवर नोटीस बजावून कार्यवाही पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती.

मतदारयादीतील त्रुटी दूर करण्याची संधी

दरम्यान, मतदारांना पुनरीक्षण प्रक्रियेची माहिती घेता यावी आणि प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करता यावा, यासाठी कार्यवाहीची मुदत आता २५ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित यंत्रणेने निर्धारित वेळेत कार्यवाही पूर्ण करावी. अंतिम मतदारयादी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध केली जाणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी वीरेंद्र जाधव यांनी कळविले आहे.

Nashik Politics : नाशिक महापालिकेत स्वीकृत सदस्य निवडीचा वाद; नवीन शहराध्यक्षांच्या नियुक्तीची चर्चा

💡

Frequently Asked Questions

  • Que: वाशिममध्ये SIR अंतर्गत दावे आणि हरकतींच्या निपटाऱ्याला किती मुदतवाढ मिळाली आहे?

    Ans: दावे आणि हरकतींवरील कार्यवाही पूर्ण करण्यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

  • Que: वाशिमची अंतिम मतदारयादी कधी प्रसिद्ध होणार आहे?

    Ans: अंतिम मतदारयादी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत प्रसिद्ध होणार आहे.

  • Que: मतदारयादी पुनरीक्षणासाठी बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती?

    Ans: ही बैठक वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

Web Title: Washim sir update voter list revision deadline extended 2026 pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 08:32 PM

Topics:  

  • SIR
  • Voting Rights
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim: सोयाबीनला सोन्याचा भाव! वाशिमच्या चारही बाजार समितीत गाठला उच्चांक; क्विंटलमागे तब्बल ‘इतके’ रुपये
1

Washim: सोयाबीनला सोन्याचा भाव! वाशिमच्या चारही बाजार समितीत गाठला उच्चांक; क्विंटलमागे तब्बल ‘इतके’ रुपये

Washim: वाशिममध्ये रब्बी हंगामाला पाणीटंचाईचा फटका; हरभरा अन् चारा पिकांना पसंती, जिल्ह्यात पेरणी केवळ १० टक्के
2

Washim: वाशिममध्ये रब्बी हंगामाला पाणीटंचाईचा फटका; हरभरा अन् चारा पिकांना पसंती, जिल्ह्यात पेरणी केवळ १० टक्के

Farmer News: खरीपने रडवले, रब्बीची आशाही धूसर! पाण्याअभावी तूर पीकही संकटात; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले
3

Farmer News: खरीपने रडवले, रब्बीची आशाही धूसर! पाण्याअभावी तूर पीकही संकटात; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

Washim News: रिसोड एसटी आगारात अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये जुंपली, शिवीगाळ अन् धमकीचे आरोप; पोलिसांकडे केली कारवाईची मागणी
4

Washim News: रिसोड एसटी आगारात अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये जुंपली, शिवीगाळ अन् धमकीचे आरोप; पोलिसांकडे केली कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.