Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim: सोयाबीनला सोन्याचा भाव! वाशिमच्या चारही बाजार समितीत गाठला उच्चांक; क्विंटलमागे तब्बल ‘इतके’ रुपये

Washim Market Soybean MSP Hike: वाशिम जिल्ह्यातील चारही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनने ८ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला असून, कमाल दर ८ हजार ५३९ रुपयांवर पोहोचला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 21, 2026 | 06:06 PM
Washim Market Soybean MSP

Washim Market Soybean MSP

Follow Us
Follow Us:
  • सोयाबीनला मिळतोय विक्रमी भाव
  • वाशिम, कारंजा, रिसोड, मानोऱ्यात दरवाढीचा धमाका
  • क्विंटलमागे ८ हजारांवर भाव
वाशिम: जिल्ह्यातील चारही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाली असून, सोयाबीनने ८ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पादनात घट आणि बाजारपेठेत आवक कमी असल्याने दरवाढीला चालना मिळत असल्याचे चित्र आहे. शुक्रवारी वाशिम, कारंजा, रिसोड आणि मानोरा बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ७ हजार ८०० ते ८ हजार ५३९ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाल्याची नोंद झाली. (Washim News)

Mumbai Book Festival: मुंबईकरांसाठी पुस्तकांची मेजवानी! २४ नोव्हेंबरपासून मुंबई पुस्तक महोत्सव; २०० प्रकाशक, ६०० हून अधिक स्टॉल

वाशिम आणि कारंजा बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा कमाल दर ७ हजार ७८० रुपयांपर्यंत पोहोचला. तर सीड क्वालिटीच्या सोयाबीनला आठ हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळत आहे. गेल्या महिनाभरापासून सोयाबीनच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी घाई न करण्याची भूमिका घेतली आहे. आणखी दरवाढ होण्याच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी घरातच सोयाबीनचा साठा ठेवला आहे. यंदा उत्पादन कमी झाल्याने तसेच मागील हंगामातील शिल्लक साठ्यात घट झाल्याने बाजारात दर्जेदार सोयाबीनची उपलब्धता कमी आहे.

दुसरीकडे प्रक्रिया उद्योगांकडून सोयाबीनला मागणी वाढली आहे. सोयापेंड आणि खाद्यतेलाच्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणीचाही दरवाढीवर परिणाम होत आहे. त्यामुळे सोयाबीन खरेदीसाठी विविध कंपन्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने २०२६-२७ हंगामासाठी सोयाबीनचा हमीभाव ५ हजार ७०८ रुपये प्रतिक्विंटल निश्चित केला आहे. मात्र, खुल्या बाजारात सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा दोन हजार रुपयांहून अधिक वाढले आहेत.

विठोली खाजगीचे संचालक शेतकरी कृषी बाजार, अनिल चांडक म्हणाले की, सध्या सोयाबीन या शेतमालाला चांगला भाव मिळत असून शेतकरी हित लक्षात ठेवून बाजारात शेतकऱ्यांच्या मालाला अधिकचा दर देण्याचा प्रयत्न करीत असून शेतक-यांनी आपला शेतमाल बाजारात विक्री करिता आणावा असे आवाहन यांनी केले आहे.

वाशिम बाजार समितीचे सचिव, वामनराव सोळंके म्हणाले की, जिल्ह्यातील शेतक-यांनी आपला शेतमाल बाजार समितीमध्येच आणावा सध्या शेतमालाचे भाव अधिक वाढत असल्यामुळे शेतमालाला योग्य भाव मिळेल आणि मोबदला सुद्धा त्वरित मिळेल यासाठी शेतक-यांनी शेतमाला वाशिम बाजार समितीमध्ये आणावा.

Mumbai Tourism: पवई तलावावर साकारणार देशातील भव्य म्युझिकल फाउंटन; ४० मीटर उंच उसळणार पाण्याचे कारंजे, मराठ्यांचा इतिहासही उलगडणार

💡

Frequently Asked Questions

  • Que: वाशिम जिल्ह्यात सोयाबीनचा कमाल दर किती झाला आहे?

    Ans: वाशिम जिल्ह्यात सोयाबीनचा कमाल दर ८ हजार ५३९ रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला आहे.

  • Que: कोणत्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ८ हजारांवर भाव मिळाला?

    Ans: वाशिम, कारंजा, रिसोड आणि मानोरा या चारही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ८ हजार रुपयांहून अधिक दर मिळाला आहे.

  • Que: सोयाबीनच्या दरात वाढ होण्यामागचे कारण काय आहे?

    Ans: दुष्काळामुळे उत्पादनात घट, बाजारातील कमी आवक आणि प्रक्रिया उद्योगांकडून वाढलेली मागणी यामुळे सोयाबीनचे दर वाढले आहेत.

Web Title: Washim soybean price hike 8539 per quintal four market committees pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • Crisis on farmers
  • Soyabean Rate
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim: वाशिममध्ये रब्बी हंगामाला पाणीटंचाईचा फटका; हरभरा अन् चारा पिकांना पसंती, जिल्ह्यात पेरणी केवळ १० टक्के
1

Washim: वाशिममध्ये रब्बी हंगामाला पाणीटंचाईचा फटका; हरभरा अन् चारा पिकांना पसंती, जिल्ह्यात पेरणी केवळ १० टक्के

Farmer News: खरीपने रडवले, रब्बीची आशाही धूसर! पाण्याअभावी तूर पीकही संकटात; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले
2

Farmer News: खरीपने रडवले, रब्बीची आशाही धूसर! पाण्याअभावी तूर पीकही संकटात; शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

Washim News: रिसोड एसटी आगारात अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये जुंपली, शिवीगाळ अन् धमकीचे आरोप; पोलिसांकडे केली कारवाईची मागणी
3

Washim News: रिसोड एसटी आगारात अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये जुंपली, शिवीगाळ अन् धमकीचे आरोप; पोलिसांकडे केली कारवाईची मागणी

Buldhana: शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट! खरीपने दिला फटका,आता रब्बीचा हंगामही अडचणीत; ९० हजार हेक्टरवरच पेरणी
4

Buldhana: शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट! खरीपने दिला फटका,आता रब्बीचा हंगामही अडचणीत; ९० हजार हेक्टरवरच पेरणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.