
Washim low Rabi Crop Sowing Due to Water Scarcity:
त्यामुळे रब्बी हंगामावर पाणीटंचाईचे संकट अधिक जाणवू लागले. त्यामुळेच शेतकरी कमी पाण्यामुळे रब्बी शेतकऱ्यांचा कल हरभरा या पिकाकडे वळला. बोरवेल व विहीर खोदण्यावर प्रशासनाने निर्बंध घातल्याने शेतकऱ्यांनी आहे त्याच विहिरींना फोडून मंजबुतीकरण सुरू केले. मात्र, पाण्याचे क्षेत्र वाढणे कठीण झाले. सध्या प्रकल्पाचे पाणी आटू लागले आहे. त्यामुळे आहे ते पाणी नागरिकांच्या पिण्यासाठी राखीव आहे. तर काही शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनासाठी गहू, हरभऱ्यापेक्षा चारा पिकाला पसंती दिली.
सिंचन प्रकल्प हिवाळ्यातच तळाला गेल्यामुळे परिणाम रब्बी लागवडीवर होत आहे. कृषी विभागाने नियोजन केले असले तरी पाण्याअभावी बहुतांश जिल्ह्यात १० ते २० टक्के क्षेत्रातच लागवड झाली. त्यामुळे रब्बी हंगामसुद्धा १० टक्केच झाले. मात्र, आता ही टक्केवारी वाढणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रब्बी हंगामाचे ६ हजार हेक्टरवर नियोजन करण्यात आले होते. सध्या पाणीटंचाई असल्यामुळे पाटबंधारे विभागाला जिल्हा प्रशासनाने आदेशीत केले. कारण, दिवसेंदिवस प्रकल्पातील पाणीसाठा खलावत आहे.
वाशिमचे शेतकरी, किसन ईरतकर म्हणाले की शेतात पेरलेल्या हरभ-याला एक ते दोन पाणी लागते. त्यामुळे सध्या पाण्यासाठी भटकंती करण्याची गरज नाही. मात्र, त्यानंतर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे आहे ते पाणी कसे वाचवता येईल, तसे नियोजन केले.
वाशिमचे शेतकरी, रवी राऊत म्हणाले की, खरीप हंगाम निराशाजनक झाला आता रब्बी हंगाम जोमाने होऊन संकटातून वाचता येईल. मात्र, सध्या पाणीटंचाईचे चटके लागत असल्यामुळे रब्बी हंगामसुद्धा संकटातून तारणार काय? असा प्रश्न पडला आहे.
वाशिमचे, जिल्हा कृषी अधीक्षक आरीफ शहा, म्हणाले की,जिल्ह्यात १ लाख हेक्टरच्या वर रब्बीचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, सध्या पाणीटंचाई असल्यामुळे केवळ सध्या जिल्हयात १० टक्केच रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत, मात्र, त्यानंतर पिकाला पाणी कसे पुरवावे, याबाबत शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे.
Ans: जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १० टक्के पेरणी झाली आहे.
Ans: अपुरा पाऊस आणि सिंचन प्रकल्पांतील घटता पाणीसाठा हे प्रमुख कारण आहे.
Ans: शेतकरी हरभरा आणि चारा पिकांना पसंती देत आहेत.