Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तब्बल ४ लाख हेक्टर क्षेत्रावर होणार पेरणी! कृषी विभागाकडून नियोजन; शेतकऱ्यांचे सोयाबीनकडे कल

वाशिम जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ४ लाख १ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचे प्रस्तावित पेरणी क्षेत्र ५ हजार १६२ हेक्टरने वाढले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 09, 2026 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

यंदाच्या खरीप हंगामासाठी वाशिम जिल्ह्यात कृषी विभागाने व्यापक नियोजन केले असून तब्बल ४ लाख १ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचे प्रस्तावित क्षेत्र ५ हजार १६२ हेक्टरने वाढले आहे. यंदाही जिल्ह्यात सोयाबीन पेरणीला प्राधान्य राहणार असले तरी काही प्रमाणात क्षेत्र घटण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Sanjay Nirupam: ‘वंदे मातरम’ला विरोध करणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही; संजय निरुपम यांचा ओवैसी आणि काँग्रेसवर घणाघाती वार

खरीप हंगामाच्या तयारीसंदर्भात ३० एप्रिल रोजी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कृषी विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत खत, बियाणे आणि किटकनाशकांच्या उपलब्धतेसह पेरणीपूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. गतवर्षी जिल्ह्यात ३ लाख ८९ हजार ३३३ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली होती, तर यंदा ३ लाख ९४ हजार ४९५ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

यंदाच्या नियोजनानुसार सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक २ लाख ९६ हजार हेक्टर राहणार आहे. त्याखालोखाल तूर ६५ हजार हेक्टर आणि कपाशी ३२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर लागवड अपेक्षित आहे. याशिवाय मूग, उडीद, ज्वारी, तीळ, बाजरी आणि मका या पिकांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार कृषी विभागाने बियाणे, खते आणि किटकनाशकांचा संभाव्य साठा उपलब्ध करून देण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता चांगली असल्याने बहुतांश शेतकरी घरगुती बियाण्यांना प्राधान्य देत आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा यांनी शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी घरच्या घरी बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याचे आवाहन केले आहे. तसेच मुबलक पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

Kalyan News : “मुस्लिम नागरिकांना आम्ही घरं देणार नाही” ; कोनगावात अजब फतवा

मात्र, शेतकऱ्यांकडून खत व किटकनाशकांच्या कृत्रिम तुटवड्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. ऐनवेळी कृषी सेवा केंद्रांकडून अडवणूक होत असल्याच्या तक्रारींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने केवळ नियोजन न करता आवश्यक साहित्य वेळेत उपलब्ध करून देण्यावर भर देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Web Title: Sowing to take place across a massive 400000 hectares planning underway by the agriculture department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 04:15 AM

Topics:  

  • Buldhana
  • Washim

संबंधित बातम्या

Washim News: विकासकामे वेळेत पूर्ण करा, पालकमंत्री भरणे यांचे निर्देश; जिल्हा वार्षिक योजनेची बैठक
1

Washim News: विकासकामे वेळेत पूर्ण करा, पालकमंत्री भरणे यांचे निर्देश; जिल्हा वार्षिक योजनेची बैठक

Buldhana Sarpanch Ends his Life: बीडनंतर आता बुलढाणा हादरले; करमोडा गावच्या सरपंचाची व्हिडिओ बनवून आत्महत्या
2

Buldhana Sarpanch Ends his Life: बीडनंतर आता बुलढाणा हादरले; करमोडा गावच्या सरपंचाची व्हिडिओ बनवून आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.