Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आम्ही कुठे आहाेत आम्हालाच माहित नाही; रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचे वक्तव्य

भरणेमामा तुमच्या व हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांची राज्यात युती आहे. मात्र आम्ही कुठे आहोत आम्हालाच माहिती नाही. असं वक्तव्य रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 11, 2023 | 08:01 AM
आम्ही कुठे आहाेत आम्हालाच माहित नाही; रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचे वक्तव्य
Follow Us
Follow Us:

इंदापूर : भरणेमामा तुमच्या व हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांची राज्यात युती आहे. मात्र आम्ही कुठे आहोत आम्हालाच माहिती नाही. तुम्ही दोघे आज मांडीला मांडी लावून बसला आहात. मी शेजारी बसलोय तरीपण दोघांनाही हाताला धरुन मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे घेऊन जाईन व बाबीर देवस्थानला निधी कमी पडू देणार नाही, अशी राजकीय टोलेबाजी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली.

इंदापूर तालुक्यातील राजकीय आखाड्यात विळ्या-भोपळ्याचे वैर असलेले आमदार दत्तात्रेय भरणे, व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, माजी सभापती प्रवीण माने हे बाबीर मंदिराच्या भूमीपूजन कार्यक्रमादरम्यान एकाच व्यासपीठावर आले होते. मंदिराच्या कामासाठी देणगी जाहीर करण्यावरून या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला.

यावेळी जानकर म्हणाले, ‘हर्षवर्धन पाटील यांचे थेट दिल्लीत चांगले संबंध आहेत. आता ते मोदी, शहांच्या जवळ जाऊन बसतात. तर भरणे यांचा फोन गेला की अजितदादा लगेच फाईलवर सही करतात. अशा या दोन्ही मोठ्या नेत्यांकडून मंदिर कामासाठी जास्तीच्या निधीची गरज आहे.’

हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘आमची राज्यात युती असली तरी मी स्वतः सत्तेत नाही, भरणे सत्तेत आहेत. कोणाचेही सरकार आले तरी ते सत्तेत असतात त्यामुळे त्यांची जबाबदारी जास्त आहे. बाबीर देवाचा इतिहास भाविकांना कळला पाहिजे. बाबीर देव हे महादेवाचे रूप आहे व येथे सभेत महादेव उपस्थित आहेत. म्हणून आता निधीची कमतरता जाणवणार नाही. परंतु मंदिराच्या कामासाठी राजकारण बाजूला ठेवून प्रयत्न करण्याची गरज आहे. वैयक्तिक पंधरा लाखांचा निधी देणार आहे.’

आमदार भरणे म्हणाले, ‘सध्याची सभा राजकीय नसून देणगीदारांची देणगी जमा करण्यासाठी आहे. मंदिराच्या विकासासाठी निधी उपलब्ध केला जाईल.’ या परिसराचा विकास करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले असून मंदिरासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. येथील रस्ता, सभामंडप, कुस्ती आखाडा सभापती असताना मी पूर्ण केला असून, मंदिरासाठी भरघोस निधी उपलब्ध करणार असल्याचे सांगितले.

Web Title: We do not know where we are statement of rsp president mahadev jankar nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2023 | 08:01 AM

Topics:  

  • BJP
  • maharashtra
  • Nationalist Congress Party
  • RSP

संबंधित बातम्या

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
1

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
2

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
3

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
4

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.