Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP Merger News Update: दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? विलीनीकरणाच्या चर्चेवर जय पवारांचे सूचक वक्तव्य

बारामतीच्या पोटनिवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवार न दिल्यास काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवेल असा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 04, 2026 | 05:39 PM
NCP Merger News 2026, Jai Pawar on NCP Unity, Ajit Pawar Death Aftermath,

NCP Merger News 2026, Jai Pawar on NCP Unity, Ajit Pawar Death Aftermath,

Follow Us
Follow Us:
  •  अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चा
  • विलीनीकरण हा पूर्णपणे राजकारणातील भाग आहे
  • एकच राष्ट्रवादी’ असावी, अशी मागणी वारंवार केली जात आहे.
Jay Pawar on NCP Merger: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चा जोर धरु लागल्या होत्या. पण काही दिवसांतच या चर्चां बंदही झाल्या. अजित पवार यांच्या निधनाला आता दोन महिने उलटल्यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का? या प्रश्नाने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. या विलीनीकरणाच्या संदर्भात अजित पवार गटातील वरिष्ठ नेत्यांनी आतापर्यंत मौन पाळले असताना, अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. “आम्ही कुटुंब म्हणून सर्व एकत्र राहावं,” अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

विलीनीकरण’ हा वरिष्ठ नेत्यांचा आणि राजकारणाचा भाग

विलीनीकरणाच्या तांत्रिक आणि राजकीय प्रक्रियेवर बोलताना जय पवार यांनी अत्यंत सावध पवित्रा घेतला. ते म्हणाले, “विलीनीकरणासंदर्भात माझी वैयक्तिक अशी कोणतीही भूमिका नाही. मी अजून लहान आहे. यावर सुनेत्रा वहिनी (आई), पार्थ दादा आणि पक्षातील इतर ज्येष्ठ नेते निर्णय घेतील. विलीनीकरण हा पूर्णपणे राजकारणातील भाग आहे, त्यामुळे त्यावर मी जास्त बोलणे योग्य ठरणार नाही.”

Satara ZP Politics: साताऱ्यात लोकशाहीचा गळा घोटला? जिल्हा परिषदेत काळ्या फिती लावून महाविकास आघाडीचा एल्गार

राजकीय मतभेद असूनही कौटुंबिक संवाद कायम

जय पवार यांनी राजकीय संघर्षापेक्षा कौटुंबिक एकोप्यावर अधिक भर दिला आहे. ते म्हणाले की, जेव्हा (अनंतराव) दादा आपल्याला सोडून गेले, तेव्हा पूर्ण पवार कुटुंब एकत्र होते. तो एकीचा काळ आम्ही पाहिला आहे.आजही आम्ही एकमेकांशी बोलतो. आमच्यात संवाद थांबलेला नाही. राजकारण आपल्या जागी असले तरी, एक कुटुंब म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र राहावे, असे मनापासून वाटते.

कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आणि भविष्यातील राजकीय पेच

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांकडून ‘एकच राष्ट्रवादी’ असावी, अशी मागणी वारंवार केली जात आहे. काही ज्येष्ठ नेत्यांनीही विलीनीकरणाची शक्यता पूर्णपणे नाकारलेली नाही. अशा परिस्थितीत जय पवार यांच्या या विधानाने, राजकीय विलीनीकरण तांत्रिकदृष्ट्या कधी होईल हे सांगता येत नसले तरी, पवार कुटुंब मानसिकदृष्ट्या एकत्र येण्यासाठी सकारात्मक असल्याचे संकेत मिळत आहेत.

Satara Politics: साताऱ्यात भाजपचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! राष्ट्रवादीला मोठे खिंडार; सभापती निवडीत ‘बॅकूम स्ट्रॅटेजी’ यशस्वी

बारामती पोटनिवडणूक

बारामती लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवार न दिल्यास काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवेल असा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे. तर सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनीही बारामतीच्या पोटनिवडणुकीत उडी घेतली आहे. यावरुन बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे मानले जात आहे. पण जय पवार (Jay Pawar) यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. केवळ पवार कुटुंबच नव्हे, तर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सर्व बारामतीकरांचीही हीच भावना आहे. अशी प्रतिक्रीया दिली आहे.

 

बारामतीकरांच्या मनात ‘बिनविरोध’ निवडणूक

पोटनिवडणुकीच्या चर्चेवर बोलताना जय पवार म्हणाले, “बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा आग्रह शरद पवार साहेबही करत आहेत. अजितदादांचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सर्वांनी पाहिले आहे. संपूर्ण बारामती हे दादांचे कुटुंब असून, ही निवडणूक बिनविरोध व्हावी असेच सर्वांना वाटते.” आता जय पवार यांच्या या विधानानंतर बारामतीत पुन्हा एकदा राजकीय समझोता होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

Web Title: Jay pawar makes suggestive statement on the merger of the two ncp factions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 05:39 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Baramati Politics
  • Breaking News
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Shiv Sena Candidates: जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! शिवसेनेने उतरवले उमेदवार; सहकारातील राजकीय समीकरणांना नवे वळण
1

Shiv Sena Candidates: जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! शिवसेनेने उतरवले उमेदवार; सहकारातील राजकीय समीकरणांना नवे वळण

Breaking News:जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत
2

Breaking News:जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत

Baramati Politics: दादा नसताना अशी सभा घ्यावी लागेल, असे कधीच वाटले नव्हते; जय पवार भावूक
3

Baramati Politics: दादा नसताना अशी सभा घ्यावी लागेल, असे कधीच वाटले नव्हते; जय पवार भावूक

South Korea AI : चीन-अमेरिकेला टक्कर देण्यासाठी दक्षिण कोरियाचा मोठा प्लॅन; AI क्षेत्रात ९०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
4

South Korea AI : चीन-अमेरिकेला टक्कर देण्यासाठी दक्षिण कोरियाचा मोठा प्लॅन; AI क्षेत्रात ९०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.